मुक्तपीठ टीम
कचऱ्याचं करायचं काय? सध्या प्रत्येक महानगरांचा कारभार पाहणाऱ्या यंत्रणेचं डोकं खाणारा हा प्रश्न. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेनं त्यावर एक भन्नाट तोडगा काढला आहे. त्यांनी घनकचऱ्यापासून मजबूत रस्ते बांधण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्यामुळे रस्ते मजबूत असतीलच पण बऱ्याचशा कचऱ्याचीही आपोआपच विल्हेवाट लागण्याची शक्यता.
दिल्लीतील कल्याणपुरीमध्ये घनकचऱ्यातून रस्तेबांधणीचा रोड पायलट प्रकल्प राबवला जाईल. कचऱ्यापासून रस्ते तयार करण्यात येतील. पूर्व दिल्ली महानगरपालिका व केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या वरिष्ठ प्रतिनिधींची एक टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या संपर्कात असेल. कल्याणपुरीत सुमारे एक किलोमीटर लांबीचा एक रस्ता बांधला जाईल. या बांधकामासाठी गाझीपूर लँडफिल साइटवरील सुमारे २५ हजार मॅट्रिक टन घनकचरा वापरला जाईल.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तंत्रज्ञानाची ओळख पटविण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी कचरा वेल्थ मिशन आहे. मिशनने दिल्लीतील गाझीपूर डम्पिंग साइटला प्राधान्य म्हणून निवडले आहे. या पायलट प्रोजेक्ट रोडच्या बांधकामासाठी पूर्व दिल्ली महानगरपालिका रस्ते भरण्यासाठी, रस्ते निर्मितीसाठी लँडफिल साइट कचरा उपलब्ध करेल. ज्याद्वारे लँडफिल बाजूच्या कचऱ्याची मात्रा कमी करत त्याची उंची कमी करता येते आणि कचऱ्याचे रस्ते बांधले जाऊ शकतात. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट रोड पायलट डिझाईन देऊन तांत्रिक सहाय्य करेल.
पाहा व्हिडीओ: