मुक्तपीठ टीम
मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्गाचा २ किमी लांबीचा भाग अवघ्या २४ तासांत पूर्ण करण्यात आला आहे. या बांधकामासाठी ५ हजार टन सिमेंट आणि ५०० टन बर्फाचा वापर करण्यात आला. हा एक जागतिक विक्रम आहे.
मुंबई व दिल्लीला जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेवरील गुजरातमधील बडोदा शहरात चार जागतिक विक्रम नोंदले गेले आहेत. गुजरातमध्ये सध्या वडोदरा ते भरुच दरम्यान एक्सप्रेसवेचे काम सुरू आहे. २ फेब्रुवारी रोजी २ किमी लांबीचा आणि १८.७५ मीटर रुंदीचा महामार्ग फक्त २४ तासात पूर्ण झाला. यासाठी १.१० लाख सिमेंट पोती आणि ५०० टन बर्फ वापरण्यात आले. यासाठी ३ कोटी रुपये खर्च आला आहे.
महामार्ग बांधणीतील चार विक्रम
- १२ हजार टन सिमेंट काँक्रिटचे उत्पादन करणे
- कमी वेळात वेगाने काँक्रिट टाकणे
- एक फूट जाड आणि १८.७५ मीटर रुंदीचे बांधकाम
- रिजिड पेव्हमेंटचा दर्जा कायम राखणे
ही सर्व कामे अवघ्या २ तासात झाली आणि अशा प्रकारे या एक्स्प्रेसवेने एकाचवेळी चार जागतिक विक्रम आपल्या नावावर केले.
या विक्रमाबाबत पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी अरविंद पटेल म्हणाले की, भारताच्या रस्ते बांधकामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. आम्ही एक विक्रम केला आहे. जो लवकर मोडणे सहजशक्य नाही. हे फक्त विक्रम बनवण्याबद्दल नाही तर ते आधुनिक भारताचे चित्र आहे. आता द्रुतगती मार्गाच्या बांधकामाला आणखी वेग देण्यात येईल, कारण आता दर तासाला या प्लांटमध्ये ८४० घनमीटर सिमेंट काँक्रिट तयार होत आहे.
काँक्रीट लेयर मशीन्सचा वापर जगभरात एकाच वेळी १६ मीटर रुंद एक्सप्रेसवे तयार करण्यासाठी केला जातो. परंतु हा एक्सप्रेसवे १८.७५ मीटर रुंद आहे आणि यामुळे पटेल इन्फ्रास्ट्रक्चरने जर्मनीकडून २० कोटी रुपयांच्या तीन मशीन्स विकसित केल्या आहेत.
या महामार्गाच्या निर्मितीमध्ये त्याच्या क्षमतेची विशेष काळजी घेतली गेली आहे. यामुळे, प्रत्येक ४.५ मीटरच्या अंतरावर सिमेंट काँक्रीटसह ३२ मिलीमीटर लोखंडी रॉड टाकला जात आहे. दोन्ही बाजूंच्या लांबी आणि रुंदी दरम्यान ४.५ मीटर अंतरावर लोखंडी रॉड टाकले जात आहेत.
पाहा व्हिडीओ: