गौरव संतोष पाटील / मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील पालघर जिल्हा म्हणजे राजधानी मुंबईजवळ असूनही विकासापासून खूपच दूर फेकला गेलेला भाग. त्यातही जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, डहाणू आणि तलासरी हे तालुके तर कायमच दुर्लक्षित असे. आता मात्र पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारामुळे राज्य सरकारचा कृषी विभाग काही वेगळे प्रयोग करत आहे. त्यातून स्थानिकांच्या रोजगारासाठीच्या स्थलांतराची समस्या सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. पारंपरिक भात शेती आणि नाचणी पिकासोबतच जव्हार, मोखाडा येथील शेतकरीही पर्यायी लागवडीकडे वळताना पाहायला मिळतोय. पाचगणी महाबळेश्वर या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड आता येथेही सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत होण्यास मदत होणार आहे. खरंतर जीवनाला प्रथमच चव येणार आहे.
मोखाडा तालुक्यात भगीरथ भुसारा हे शेतकरी प्रयोगशील म्हणून ओळखले जातात. ते पूर्वी पारंपरिक शेती करायचे. मात्र या उत्पादनातून फक्त प्राथमिक गरजाच त्याही कशाबशा भागायच्या. त्यांना सतत रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागायचं मात्र त्यानंतर त्यांनी सरकारच्या कृषी विभागाच्या योजना प्राप्त करण्याकडे भर दिला पहिल्यांदा भुसारा यांनी मोगरा लागवड करून उत्पादन घ्यायला सुरुवात केली. मात्र गेल्या वर्षापासून कृषी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अभ्यास सहलीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी लागवडीचे धडे घेतले. त्यांनी आपल्या साडेपाच एकर असलेल्या माळरान शेतीत मोगरा लागवडीबरोबरच स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला. सध्याच्या घडीला त्यांना या स्ट्रॉबेरी उतदनातून चांगला फायदा होत असून स्ट्रॉबेरी असून चांगली बाजारपेठ प्राप्त झाली या उत्पादनातून भुसारा यांना एका सीझनमध्ये खर्च वजा जाता साधारणता अडीच लाखाचा नफा होईल अशी आशा आहे.
तसेच प्रयोग इतरही शेतकरी करू लागले आहेत. जव्हार आणि मोखाडाची ओळख मिनी महाबळेश्वर अशी आहे. याठिकाणी वातावरण हे जानेवारीच्या अखेरपर्यंत अतिथंड असतं. येथील स्थलांतरण आणि बेरोजगारी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकी शेतकऱ्याला स्ट्रॉबेरीची रोपे देण्यात आली आहेत. प्रायोगिक लागवडीला चांगले यश आले आहे. त्यामुळे मागासलेपण जावून नव्या विकासाची गोडी जीवनात येण्याची शक्यता आहे.
जव्हार मोखाडा येथील आदिवासी समाजातील बहुतेक नागरिक हे पावसाळ्यानंतर रोजगारासाठी स्थलांतरण करतात. हाताला काम नसल्याने येथील गावच्या गाव रोजगारासाठी शहरांकडे जात असून हेच स्थलांतरण रोखण्यासाठी कृषी विभागाकडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी मिळणारे स्ट्रॉबेरी आता जव्हार मोखाड्यात ही सहज होत आहे. जव्हार आणि मोखाडा येथील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. यामुळे येथील रोजगार वाढून स्थलांतर संपुष्टात येण्यास मदत होईल अशी आशा वाटते.
जव्हार आणि मोखाडा ची ओळख हे मिनी महाबळेश्वर अशी आहे. याठिकाणी वातावरण हे जानेवारीच्या अखेरपर्यंत अतिथंड असतं. येथील स्थलांतरण आणि बेरोजगारी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकी शेतकऱ्याला स्ट्रॉबेरीची रोपे देण्यात आली आहेत प्रायोगिक तत्त्वावर ही लागवड करण्यात आली आहे. इतर ठिकाणी रासायनिक खतांचा वापर जास्त होतो मात्र या भागातील मातीत अशी आहे की या भागात सेंद्रिय पद्धती प्रमाणे हे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळाले. आता ही लागवड व्यावसायिक दृष्टीने केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ :