मुक्तपीठ टीम
नेट झीरो कार्बन उत्सर्जन करण्याचं भारतीय रेल्वेचं लक्ष्य आहे. त्याचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने बीना सोलर प्लांट बनवलाय. त्यामुळे पश्चिम रेल्वेला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. आता मुंबई मेट्रोच्या २ आणि ७ मार्गिंकांच्या स्थानक छतांवर सोलर पॅनलने वीज निर्मिती सुरु झालीय. या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये रेल्वेने सौर उर्जेपासून ३८ लाख युनिट वीज निर्मिती केली आहे.
भारतीय रेल्वे म्हणजे जगातील एक अवाढव्य असं रेल्वे जाळं मानलं जातं. स्वाभाविकच या अजस्त्र यंत्रणेत इंधनाचा वापरही तसाच होतो आणि त्यामुळे प्रदूषणही. आता मात्र रेल्वे प्रदूषणमुक्त रेल्वे वाहतुकीचं लक्ष्य समोर ठेवून काम करत आहे. त्यातीलच एक पाऊल म्हणजे सौर ऊर्जा निर्मिती. या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये रेल्वेने सौर उर्जेपासून ३८ लाख युनिट वीज निर्मिती केली आहे.
रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. सौरऊर्जेपासून ३८ लाख ४० हजार युनिट वीज निर्मिती केली. त्यामुळे तीन महिन्यांत १ कोटी रुपयांच्या महसुलाची बचत केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत ३२०० मेट्रिक टन कार्बनची तूट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी सौरऊर्जेचा वापर करून १२४ लाख युनिट ऊर्जा निर्माण करून ५ कोटी १ लाख रुपयांची बचत झाली होती.
रेल्वेचे सोलर प्लांट
रेल्वेने अनेक स्थानके, कार्यालये, कार्यशाळा, प्रशिक्षण शाळा, जीएम कार्यालये, डीआरएम कार्यालयांसह प्रमुख ठिकाणी रूफ टॉप सोलर प्लांट बसवले आहेत. सध्या या संख्येत वाढ करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत.
भारतीय रेल्वेच्या सौर ऊर्जा उपक्रमाचे जागतिक कौतुक
भारतीय रेल्वेच्या सौरऊर्जा उपक्रमाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक आणि पुरस्कार मिळत आहेत.
जर्मनीच्या बर्लिन शहरात ०१ जून रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय शाश्वत रेल्वे पुरस्कारांतर्गत, पश्चिम मध्य रेल्वे भोपाळ विभागाच्या बीना सोलर प्लांटला प्लॅनेट श्रेणीतील शून्य कार्बन तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे.
बीना येथे सोलर एनर्जीकडून २५ एसी ट्रॅक्शन सिस्टीम थेट फीड केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणे ही पश्चिम मध्य रेल्वे तसेच भारतीय रेल्वेसाठी अभिमानाची बाब आहे. या यशाबद्दल पश्चिम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुधीर कुमार गुप्ता यांनी भोपाळ विभागासह WCR चे सर्व रेल्वे अधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
UIC इंटरनॅशनल नावाची संस्था रेल्वे क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्रदान करते. इनोव्हेशन इन मोबिलिटीसाठी पुरस्कार दिले जातात जे सामाजिक (लोक), पर्यावरण (प्लॅनेट) आणि अर्थव्यवस्था (समृद्धी) इ. सो पाउलो मेट्रो रेल्वे, पूर्व जपान रेल्वे कंपनी आणि भारतीय रेल्वे प्लॅनेट श्रेणी अंतर्गत शून्य कार्बन तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्याच्या शर्यतीत होते. ज्यामध्ये भारतीय रेल्वेने इतर दोन स्पर्धकांना मागे टाकले आहे आणि बीना, पश्चिम मध्य रेल्वे, भोपाळ विभाग येथे असलेल्या सोलर प्लांटमधून थेट 25 KV AC ट्रॅक्शन सिस्टम फीड केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे.
मुंबईतील मेट्रोचाही सौरऊर्जेवर भर!
एकीकडे रेल्वे ही कामगिरी बजावत असतानाच मुंबईतील मेट्रोही आतापासूनच सौरऊर्जेवर भर देत आहे. पहिल्या मेट्रो मार्गांच्या स्थानकांवर सौर ऊर्जा निर्मितीतून काही गरज भागवली जात आहे. नव्यानं धावू लागलेल्या मेट्रो मार्ग २ आणि ७ साठीही सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे
#TeamAlstom achieved yet another milestone that will help us realize our #sustainability goals. Thameem Kamaldeen, Signalling Director, Alstom India inaugurated & commissioned a ’50kW Rooftop Solar Plant’ at our project office for #MumbaiMetro Lines 2 & 7.#NatureConservationDay pic.twitter.com/74KHnxewgr
— Alstom India (@AlstomIndia) July 28, 2022