उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने, ३० मिनिट स्ट्रेचिंग केल्याने तो फायदेशीर ठरतो. चालण्यापेक्षा स्ट्रेचिंग करणे अधिक प्रभावी आहे. असा कॅनडाच्या एका विद्यापीठाने दावा केला आहे. संशोधनातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, स्ट्रेचिंग आणि चालण्यामुळे उच्च रक्तदाबावर कसा परिणाम होतो.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संशोधनादरम्यान, उच्च रक्तदाब ग्रस्त ४० रुग्णांचे दोन गट तयार केले गेले. एका गटाला चालण्यास आणि दुसर्या गटाला स्ट्रेचिंग व्यायाम करण्यास सांगितले. त्यावेळेस असे दिसून आले आहे की, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी चालण्यापेक्षा स्ट्रेचिंग अधिक प्रभावी आहे.
फिजिकल एक्टिव्हिटी अॅण्ड हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार जेव्हा एखादी व्यक्ती स्ट्रेचिंग करते तेव्हा स्नायूंपासून रक्तवाहिन्यांपर्यंत त्याचा परिणाम होतो. यामुळे रक्त प्रवाह अधिक चांगला होतो.
शरीरातील चरबी कमी करायची असल्यास चालणे हा एक उत्तम पर्याय आहे असा दावा करण्यात आला. कारण संशोधनादरम्यान, असे दिसून आले की, ज्या लोकांनी चालणे हा पर्याय निवडला त्यांचे वजन स्ट्रेचिंगपेक्षा अधिक कमी झाले.
वैद्यकीय न्यूट्रिशनिस्ट डॉ. विश्वरूप राय चौधरी म्हणतात की, रक्तदाब हा एक आजार नाही तर शरीरातील नकारात्मक बदलांचे लक्षण आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन सूत्रे आहेत. प्रथम, दैनंदिन आहारामध्ये ५० टक्के फळे, कच्च्या भाज्या खा, आणि दुसरे म्हणजे, मीठ आणि तेलकटयुक्त पदार्थापासून दूर रहा.
एखाद्या रुग्णाला डॉक्टर दिसताच त्याचा बीपी वाढू लागतो. जेव्हा तो दवाखान्यातून बाहेर येतो तेव्हा बीपी नॉर्मल होण्यास सुरवात होते. वैद्यकीय भाषेत याला ‘व्हाइट कोट सिंड्रोम’ म्हणतात. औषध घेत असलेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये हे सिंड्रोम दिसून आले आहे. अशाप्रकारे त्यांचा बीपी केवळ काही काळासाठी अचानक वाढतो.
उदाहरणार्थ, जेव्हा साप अचानक दिसतो तेव्हा हृदयाची धडधड वाढते तेव्हा देखील बीपी वाढतो. मन आपल्याला अशा परिस्थितीत सतर्क करते. रक्तदाब हा कोणता आजार नाही.