मुक्तपीठ टीम
वृद्ध आई वडिलांसाठी श्रावण बाळाने कावड बनवली होती. ठाण्यातील मॉडर्न श्रावण बाळ असा गौरवाने उल्लेख होणारे श्याम बेडेकर यांनी कावड गाडी बनवली आहे. ठाणे न्यूजमेकरने दिलेली ही माहिती म्हणजे सर्वात चांगली बातमी. त्यामुळेच आम्ही ती दयानंद नेनेंच्या सौजन्याने मुक्तपीठ गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात सादर करीत आहोत.
ठाण्यातील श्याम बेडेकर यांच्या मातोश्री सुद्धा वृद्धापकालीन व्याधींनी अंथरुणाला खिळलेल्या. त्यांची आणि समाजात इतर वृद्ध लोकांची होणारी कुचंबणा पाहून त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं केले पाहिजे जेणेकरून त्यांना थोडाफार आत्मनिर्भर होता येईल या भावनेतून श्याम बेडेकर यांनी सामान्यपणे वृद्ध लोकांना होणाऱ्या व्याधींचा अभ्यास केला. त्यांची शारीरिक क्षीणता, झिजलेली पायाची हाडं आणि गेलेली ताकद यामुळे होणार्या समस्यांवर विचार केला. त्यांच्यासाठी दोन खास खुर्च्या बनवल्या. श्याम बेडेकरांनी त्या खास खुर्च्यांना कावड गाड्या असे नाव दिले आहे.
आज येथे आपण त्या अविष्काराची माहिती घेणार आहोत. श्याम बेडेकर हे मूळचे बडोद्याचे. ते टेक्सटाईल इंजिनिअर आहेत. वेगवेगळ्या समाजोपयोगी गोष्टींचा आविष्कार करणे त्यांचा छंद आहे. स्त्रियांना लागणारे सॅनिटरी पॅड ची निर्मिती स्वस्तात करता येईल असे खास मशीन त्यांनी बनवले आहे. तसेच वापरलेल्या सॅनिटरी पॅड ची व्यवस्थित आणि स्त्रियांना embarassment न होता dispose करता येईल असा incinerator त्यांनी बनवला आहे. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आपल्या पहिल्या कावड खुर्ची बद्दल बोलताना श्याम बेडेकर म्हणाले:
मी वृद्धांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यानुसार एक व्हिल चेअर बनवली. या व्हिलचेअरमध्ये वर आणि खाली घेण्याची सुविधा आहे. त्यासाठी हायड्रॉलिक तंत्राचा वापर केला आहे. बिछान्याला खिळून असलेले वृद्धांना स्वत:च्या पायावर उभे राहणे अवघड असते, त्यांच्यासाठी ही व्हिलचेअर खूप उपयोगी आहे. या व्हिलचेअरने ते सभोताली फिरु शकतात. हालचाली करणे शक्य होते. त्यामुळेच बेडकरांनी या व्हिल चेअरला कावड खुर्ची असे समर्पक नाव दिले आहे.
बेडकर यांची पत्नी स्वाती बेडेकर म्हणतात की, त्यांच्या सासूबाई खूप दिवस अंथरुणातच आहेत. उभे राहण्याची शक्यता अजिबातच नाही. अशा वृद्धाना अंथरुणाला खिळून राहणे ही एक मोठी शिक्षा असते. सासूबाईंना मोबाइल करण्यासाठी उचलून खुर्चीत बसवणे वगैरे खूप करून पाहिले. पण दोन तीन माणसे असल्याशिवाय ते जमत नव्हते. केअरटेकर बाईला तर बिल्कुलच जमायचे नाही. नवरा नाविन्याचा शोध घेणारा संशोधक वृत्तीचा असल्याचा मला आणि सासूबाईंना झालेला फायदा पाहा. बाजारातल्या तयार मिळणाऱ्या व्हील चेयर्स खूप हलक्या असतात, स्टेडी नसतात. पुन्हा त्यात बसायला उठून उभे राहून मग बसावे लागते. ही श्यामने तयार केलेली खुर्ची पहा, बेडवर सीट ठेवायची. त्यावर उठून बसले की आपोआप उचलली जाते(जॅकच्या सहाय्याने) आणि खुर्ची पलंगापासून दूर करून फिरायला जाऊ शकते. परत ठेवताना तशीच अलगद सीट पलंगावर ठेवता येते. एकटे माणूस सहायक असेल तरी हे सहज करता येते. अर्थात इतर बरेच काही ही खुर्ची करू शकते. खास म्हणजे एक वेगळी सीट आहे जिच्यामुळे कमोड पर्यंत जाणे सुदधा शक्य होते. एका जागी बसल्याने रुग्णाला नैराश्य येते, चिडचिड होते! हा वृद्ध लोकांना आत्मनिर्भर करायला खूपच चांगला उपाय आहे. घरातल्या इतर माणसांना सुध्धा मग सोपे होते. वृद्ध आईवडिलांसाठी श्रावण बाळाने कावड केली होती. या मॉडर्न श्रावण बाळाने गाडी बनवली. अशी उपकरणे बाजारात खूपच महाग मिळतात. इतर कोणाला जरूर असेल, खास काही बनवून हवे असेल, माफक पैशात असे काही बनवून देता येते, स्वाती बेडेकर सांगत होत्या.
एखादी प्रेमाने केलेली गोष्ट नेहेमीच इतरांचे प्रेम जिंकण्यास पात्र ठरते. केवळ सहा आठवड्यांच्या अवधीमध्ये श्याम बेडेकर यांचे केलेले innovation (आविष्कार) भारतात सर्वदूर पसरले. कावडगाडी अनेक लोकांपर्यंत पोचली सुद्धा आणि रोजच पाठवणे सुरू आहे.
खूप लोकांनी खूप मोलाचे सल्ले दिले. अनेकांनी त्यांची खास गरज सांगितली. निवृत्त अथवा दुखापत झालेल्या सैन्य अधिकारार्यांनी त्यांना पुन्हा फिरता येऊ लागेल ही आशा उमलल्याचे सांगितले. दिव्यांग मुलांच्या पालकांना त्यांना हलनचलन करता येईल ही इच्छा व्यक्त केली. अंथरुणाला खिळलेल्या प्रत्येकाने, खास करून वयोवृद्ध माणसांनी या कावड गाडीत एक आशेचा किरण पाहिला जेणेकरून त्यांना एक सोपे आणि आत्मनिर्भर आयुष्य जगता येईल.
या सर्वांच्या इच्छा आकांक्षांना जमेल तसे या कावडीमध्ये सामावण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. लहान मोठे पलंग, खुर्ची, मोटार येथे कुठेही बसता आणि उचलले जाता येईल अशी उंची आणि रचना, चारही चाकांना ब्रेक, सहजपणे उचलले जावे यासाठी हायड्रॉलीक सिस्टिम, पेशंट घरंगळुन पडू नये यासाठी सीट बेल्ट आणि कमोड वर बसता येईल अशी एक खास वेगळी सीट अशा अनेक सुविधा कावड गाडीत करून ती सर्वांना उपयुक्त अशी बनवली आहे.
अनेक वृद्धध लोकांची सोय म्हणून ती त्यांना घरपोच मिळेल आणि बॉक्स उघडून लगेच सहज वापरता येईल अशी व्यवस्था केली. गेले काही दिवस इतर सर्व काम बाजूला सारून कावड गाडी ज्यांना हवी आहे त्यांच्यापर्यंत पोचवणे हेच कार्य प्रकर्षाने केले. यातून काही जणांच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि ओठांवर हसू यावे – श्याम बेडेकर आपले मनोगत व्यक्त करत होते. लोकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि गरज यामुळे वेळ आली होती ती एक दुसरी गाडी बनवण्याची.
श्याम बेडेकरांचा नवा आविष्कार!
- कावड गाडी बनवली तेव्हा कित्येक अंथरुणावर असलेल्या वृध्दानंसाठी ती वरदान ठरली.
- अनेक जण जे तरुण होते, सर्विसेस मध्ये होते पण काही अपघातामुळे ज्यांना एक जागी बसून राहावे लागत होते त्यांनी खूप फोन केले.
- त्यांची समस्या विचारात घेऊन काही बनवता येईल का अशी विचारणा केली.
- अशा लोकांना ज्यांना अंथरुणातून बाहेर येऊन उठून उभे राहायचे आहे, थोडेसे चालावे अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी ही नवी Stand-in Wheelchair.
- लहान मुले ज्या आत्मविश्वासाने baby walker मध्ये बसतात, उभे राहतात, चालतात आणि मग धावतात सुद्धा!
- त्याच आत्मविश्वासाने या गाडीत बसा आणि हळूहळू उठून उभे राहायचा प्रयत्न करा. थोडे थोडे चाला, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बना!
- तुमच्या पायाला झालेलया दुखपतीचा हा कायमचा इलाज आहे!
श्याम बेडेकर यांचे ठाण्यात साकेत कॉम्प्लेक्स मध्ये घर आहे आणि त्यांचे ठाण्यात ये जा चालू असते.
गरजू लोकांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधावा. श्याम बेडेकर यांच्याशी 9824074940 या नंबरवर संपर्क साधता येईल.
पाहा व्हिडीओ: