शुध्दोधन कांबळे
कोरोना नंतर बाॕलीवुडला प्रेक्षकांची बदललेली taste कळालीच नाही, सध्या contact चा जमाना नसून content चा जमाना आहे हे अजून त्यांना उमगलच नाही. कितीही boycott trend येऊ दे किंवा nepotism चा issue असू दे , जर चांगली कहानी आणि सुंदर presentation असेल तर या गोष्टी गौण ठरतात. अजूनही ते “समशेरा” बाल(बावळट म्हणायला हवं) चिञपट बनवितात. लाल सिंगची चड्डी फाॕरेस्ट गम्प च्या third class copy ने उरविली. फाॕरेस्ट गम्प अस्तित्ववादी तत्त्वज्ञान सांगत जीवनातील साधारण ते आसाधारण प्रवास मांडतो तर लालसिंग bollywood च्या टीपीकल प्रेम कहानीत फसतो. कोरोनामुळे OTT ला चांगले दिवस आले, तिथे प्रेक्षकांना chice मिळाला, जगातील उत्कृष्ट सिनेमे आणि वेबसिरीज हिंदीत पाहायला मिळाले. परंतु बाॕलीवुडचा कोरोना आणखी संपलेला नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यावरील मास्क आजून निघाला नाही. लालसिंग सोबत रक्षाबंधनही फ्लाॕप झाला , याचा अर्थ boycott हे खरे कारण नाही तर कमजोर सिनेमा हे बाॕलीवुडच्या आपयशाचे खरे कारण आहे. आता प्रेक्षक वल्ड सिनेमा पाहतोय, साऊथ सोबत स्पर्धा लागली आहे, साऊथचे सादरीकरण जबरदस्त असते तिथे कथा कच्ची आसली तरी presentation मुळे चिञपट चालतो.
खान मंडळीने सन्मानपूर्वक रिटायर व्हावे, ते नुसते नायकच नाही तर निर्माता बनूनही पैसे लाटाण्यासाठी प्रयत्न करतात. वेबसीरीज हा सद्याचा नवा ट्रेंड आणि काही सेंकदाचा व्हीडीओ बनवून लक्ष वेधणारे सामान्य कलाकार यामुळे चिञपटाचे पहिल्या सारखे आकर्षण राहीले नाही. तरीही चिञपट इंडस्ट्री बंद नाही पडणार, उलट भारतात चांगले सिनेमे बनतील आणि आपण जागतिक सिनेमावर छाप पाडू, फक्त आपला सिनेमा कुठल्याही “फाईल्स” मध्ये सिमीत नाही झाला पाहिजे. हिटलरशाही मध्ये पण चार्ली चॕपलीन सारखे daring बाज कलाकार होते, ते कायम राहतील.प्रेक्षकांची ठराविक लोकांना target करण्याची मानसिकता जास्त दिवस टिकून राहणार नाही. कला आणि कलाकार बंधने टाकून थांबत नाही उलट दबाव आणि नियंत्रणातून चांगलीच कलाकृती बाहेर येते, हा इतिहास आहे.
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत. फोन. 9421294442)