मुक्तपीठ टीम
लढाऊ विमानांमध्ये तांत्रिक बिघाडानंतर जर ते नियंत्रणातच राहत नसेल तर स्वत:चे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा वायूसैनिकांना अधिकार असतो. मात्र, काही वायूसेना अधिकाऱ्यांनी कमालीचं शौर्य दाखवलंय. काहींनी स्वत:चे जीव धोक्यात घालत विमान मानवी वस्तीपासून दूर नेले. तरीही बाहेर उडी न मारता विमानही सुरक्षित तळावर आणून देशाचेही शेकडो कोटी वाचवले. अशा वायू सेना वीरांचा आज राष्ट्रपतींकडून शौर्य चक्राने सन्मान करण्यात आला.
कॅप्टन परमिंदर अँटील यांना शौर्य चक्र प्रदान
ग्रुप कॅप्टन परमिंदर अँटिल (26686) फ्लाइंग (पायलट) जानेवारी २०२० पासून Su-30 MKI स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर आहेत.
२१ सप्टेंबर २०२० रोजी, Su-30 विमानाच्या पुढच्या कॉकपिटमध्ये उड्डाणा दरम्यान, त्यांना गुरुत्वाकर्षण शक्ती वेगाने +9G ते -1.5G पर्यंत वेगाने बदलत असल्याचा अनुभव आला, तसेच विमान अनियंत्रित सूचकांसह डावीकडे झुकत होते . अत्यंत उच्च ‘जी’ स्थितीमुळे निर्मण झालेल्या ‘ब्लॅक-आउट’ परिस्थितीवर मात करत त्यांनी विमानाचे हेलकावे स्वतःच नियंत्रित केले आणि आपल्या शस्त्र प्रणाली ऑपरेटरची सुरक्षा देखील तपासली. विमानाचे नियंत्रण करताना, संभाव्य बाहेर पडण्याच्या स्थितीत जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रापासून विमान दूर नेले.
त्यांनी उड्डाण सावरण्याची सुरवात केल्यावर, विमानाला पुन्हा एकदा दुर्दैवी दोलायनांचा सामना करावा लागला, विमानाच्या नियंत्रणासह पायलटद्वारे नियंत्रण कॉलमवर मोठ्या प्रमाणावर दाब आवश्यक होता. त्यांनी आपले उच्च तंत्रज्ञानाचे ज्ञान वापरून काही अपारंपरिक प्रयत्न केले. त्यांच्या निर्णयामुळे आणि कुशल हाताळणीमुळे, हेलकावे खाणे कमी झाले आणि विमान सुखरूप परत आले.
या जीवघेण्या परिस्थितीत वैमानिकांनी आपला संयम राखला, अनुकरणीय धैर्य दाखवले आणि तत्परता दाखवली. त्यांच्या उत्कृष्ट पायलटिंग कौशल्यांमुळे शेकडो कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित केली आणि जमीन आणि मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळले. या अपवादात्मक शौर्य, उच्च व्यावसायिकता आणि एरोस्पेस सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रुप कॅप्टन परमिंदर अँटिल याना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे.
विंग कमांडर वरूण सिंह यांना शौर्य चक्र प्रदान
विंग कमांडर वरुण सिंग (२७९८७) फ्लाइंग (पायलट) लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) स्क्वाड्रनमध्ये पायलट आहेत.
१२ ऑक्टोबर २० रोजी, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम (FCS) आणि प्रेशरायझेशन सिस्टीम (लाइफ सपोर्ट एन्व्हायर्नमेंट कंट्रोल सिस्टीम) मध्ये मोठ्या सुधारणा केल्यानंतर, ते मुख्य तळापासून दूर LCA मध्ये प्रणालीच्या चाचणीसाठी उड्डाण करत होते.
उड्डाणा दरम्यान, कॉकपिट दाब उच्च उंचीवर अयशस्वी ठरला. त्यांनी ते योग्यरित्या ओळखले आणि लँडिंगसाठी कमी उंचीवरून उतरण्यास सुरुवात केली. उतरताना, फ्लाइट कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड झाला आणि यामुळे विमानाचे नियंत्रण पूर्णपणे निसटले. हे अभूतपूर्व आपत्तीजनक अपयश होते जे कधीही घडले नव्हते. साधारण स्थितीत उंचीचा वेगाने तोटा होत विमान वर खाली हेलकावे घेत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती .
अत्यंत जीवघेण्या परिस्थितीत अत्यंत शारीरिक आणि मानसिक तणावात असूनही, त्यांनी अनुकरणीय संयम दाखवला, आणि विमानाचे नियंत्रण पुन्हा मिळवले, ज्यातून उल्लेखनीय उड्डाण कौशल्य दिसून आले. त्यानंतर लगेचच सुमारे १० हजार फुटांवर, विमानाने अनियंत्रित पिचिंगसह संपूर्ण नियंत्रण गमावले. अशा परिस्थितीत, वैमानिकाला विमानातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य होते. स्वतःच्या जीवाला असलेल्या संभाव्य धोक्याचा सामना करत त्यांनी लढाऊ विमाने सुरक्षितपणे उतरवताना विलक्षण धैर्य आणि कौशल्य दाखवले. त्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जात जोखीम घेत विमान उतरवले.
यामुळे स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानातील दोषांचे अचूक विश्लेषण करणे शक्य झाले आणि पुनरावृत्ती झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय करता आले. त्यांच्या उच्च व्यावसायिकता, संयम आणि त्वरित निर्णय घेण्यामुळे, त्यांच्या जीवाला धोका असतानाही, त्यांनी केवळ लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एलसीएचे नुकसान टाळले नाही, तर जमिनीवरील नागरी मालमत्ता आणि लोकसंख्येचे देखील रक्षण केले. या अपवादात्मक शौर्याबद्दल विंग कमांडर वरूण सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे.
विंग कमांडर उत्तर कुमार यांना वायू सेना पदक (शौर्य) प्रदान
विंग कमांडर उत्तर कुमार यांना एअर टू एअर रिफ्यूलिंग इंस्ट्रक्शनल सॉर्टीचे उड्डाण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या मोहिमेदरम्यान, इंधन भरण्याची नळी इतर एसयू -३० एमकेआयच्या पॉडपासून निखळली , तर ड्रोग अजूनही त्याच्या विमानाच्या प्रोबशी जोडलेला होता. सुटलेली नळी विमानाच्या दिशेने चाबूक मारल्यासारखी आपटत होती , त्यामुळे छत आणि एअरफ्रेमचे नुकसान झाले. आणि विमानाला दोलायनांचा सामना करावा लागला. नळी तुटल्यामुळे मुख्य विमानातून इंधन गळती झाली.
अन्य विमानाच्या क्षेत्रात अचानक विमान दोलायनांच्या अज्ञात आपत्कालीन स्थितीचा अनुभव येऊनही , त्यांनी शांतपणे परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि पूर्ण नियंत्रण ठेवले. त्यांनी तत्काळ मदर एअरक्राफ्टच्या कर्मचाऱ्यांना इंधन गळती थांबवण्याची सूचना केली आणि ते सुरक्षित स्थितीत आले. त्यांच्या विमानाच्या उड्डाण नियंत्रण हालचाली प्रतिबंधित असल्याने, पुन्हा सावरण्यासाठी विमान चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव आणि अपवादात्मक उड्डाण कौशल्य आवश्यक होते. त्यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्याची योजना काळजीपूर्वक आखली . कारण कॅनपी अंधारमय झाल्यामुळे उजवीकडे दृश्यमानता अगदी नगण्य होती.
विमान नियंत्रित करता येईल याची खात्री करण्यासाठी त्यांनी उड्डाण करण्यासाठी योग्य वेग पटकन मोजला.त्यांनी उत्कृष्ट उड्डाण कौशल्यांचा वापर केला आणि विमानाला सुरक्षितपणे उतरवण्याच्या दृष्टीने वेगळ्या नियंत्रण सूचना दिल्या. लँडिंगनंतर, तुटलेली नळी अंडरकेरेज डी-दरवाजात अडकलेली आढळली आणि यामुळे आगीचा मोठा धोका निर्माण झाला. जीवाला धोका असलेल्या या स्थितीत दोन्ही वैमानिकांना बाहेर पडावे लागले असते . मात्र त्यांचे अनुकरणीय धैर्य आणि वैमानिक कौशल्य केवळ त्यांच्या विमानाच्याच नव्हे तर इतर विमानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होते.
या अपवादात्मक धाडसासाठी विंग कमांडर उत्तर कुमार यांना वायु सेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले आहे.