मुक्तपीठ टीम
कोरोना साथीच्या संकट काळात इस्त्रायलमधून एक चांगली बातमी आली आहे. इस्त्रायली शास्त्रज्ञांनी उंदरांचे आयुष्य २३ टक्क्यांनी वाढवण्याचा एक मार्ग शोधला आहे. जर हे संशोधन माणसांसाठीही उपयोगी ठरले तर, मानवी जीवन १२० वर्षांपर्यंत वाढू शकेल. संशोधनादरम्यान, वैज्ञानिकांनी एसआयआरटी६ नाव असलेल्या प्रोटिनचा पुरवठा वाढवून २५० उंदरांच्या आयुष्यात २३ टक्के वाढ करण्यात यश मिळवले.
सर्वसाधारणपणे एसआयआरटी६ प्रथिनामुळे वृद्धत्व येण्याची प्रक्रिया मंदावते. नेचर कम्युनिकेशन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, एसआयआरटी६ प्रथिनांनी समृद्ध असलेल्या जनावरांना कर्करोगाचा धोका कमी असतो. बार इलन विद्यापीठाचे प्राध्यापक हॅम कोहेन म्हणाले, “जीवनमानात बदल होणे फार महत्वाचे आहे. जर जसा विचार आहे तसे घडले तर मानवी जीवनमान वाढेल. आपण १२० वर्षे जगू शकू.”
उंदरांप्रमाणेच वाढू शकते मानवी जीवन
१. आम्ही उंदरांमध्ये पाहिलेले बदल माणसांवर लागू होऊ शकतात.
२. कोहेन यांची लॅब अशी औषधे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे जी, मानवी शरीरात एसआयआरटी६ नावाचे प्रथिन सुरक्षितपणे वाढवू शकतात.
३. २०१२मध्ये प्राण्यांमधील प्रथिनांची पातळी वाढवणारे प्रयोग करणारे कोहेन हे पहिले संशोधक होते.
४. त्यावेळच्या त्यांच्या प्रयोगामुळे त्या प्राण्यांचे आयुष्य वाढले.
५. २०१२मध्ये नर उंदरांचे आयुष्य १५ टक्क्यांनी वाढले होते, परंतु मादी उंदरांवर त्याचा काही परिणाम झाला नाही.
६. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, एसआयआरटी६ प्रोटीनचे प्रमाण वाढविल्याने नर आणि मादी दोन्ही उंदरांचे आयुष्य वाढले आहे.
७. संशोधनात नर उंदरांच्या आयुष्यात ३० टक्के आणि मादी उंदरांच्या आयुष्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
८. शास्त्रज्ञांना असे आढळले की, वृद्धत्त्व आलेल्या उंदरांमध्ये उर्जा निर्मितीची क्षमता कमी होते.
९. वृध्द उंदरांनी एसआयआरटी६ प्रथिनामुळे जास्त प्रमाणात ऊर्जा सहजतेने संग्रहित केली.
१०. एसआयआरटी६ प्रथिने वाढविण्यासाठी तंतोतंत औषध तयार करण्यात सक्षम होईल.
पाहा व्हिडीओ: