पुष्कर/मुक्तपीठ टीम
फेसबुक-ट्विटर, बातम्या अन सरकारच्या तोंडून आरे विषयक खालील फसवी वक्तव्य आपण ऐकली असतीलच.
- ३१६६ एकरांपैकी केवळ ६२ एकर जागेत होणार मेट्रो कारशेड
- त्यासाठी २७०० झाडे तोडली जाणार आणि तितकीच पूर्ण वाढ झालेली झाडे लावणार
- मेट्रोमुळे इंधन वाहतूक कमी होऊन CO2 चे संतुलन होणार.
- अनेक जागांचा विचार झाल्यावर शेवटी हि जागा निवडली
- हा विरोधकांचा विकासाला विरोध आहे. यातले शेवटचे मुद्दे राजकारण म्हणून सोडू, पण विषय पर्यावरण विषयक खोट्या गोष्टी पसरवण्याचा आहे. वर्षांपूर्वीपासून नैसर्गिक प्रक्रियेतून वाढ झालेल्या वनस्पतींचे ६२ एकर म्हणजे “केवळ”असते का?
भारतात धंदेवाईक राजकारणी लोकांनी राहण्याच्या दृष्टीने कायदे हवे तसे वळवून बिल्डरांच्या घशात घालून वाटेल तशी वृक्षतोड केली.
आधी दादर हे जंगल होते,आत्ताच्या घडीला दादर काय आहे? वाटेल तशी वृक्षतोड करून घरे बांधली, त्याचे परिणाम म्हणजे जमीन जमीन न राहता “डांबरी” सपाट भाग झाला आहे.
फेसबुक-ट्विटर, बातम्या अन सरकारच्या तोंडून आरे विषयक खालील फसवी वक्तव्य आपण ऐकली असतीलच.
१.३१६६ एकरांपैकी केवळ ६२ एकर जागेत होणार मेट्रो कारशेड
२.त्यासाठी २७०० झाडे तोडली जाणार आणि तितकीच पूर्ण वाढ झालेली झाडे लावणार
३.मेट्रोमुळे इंधन वाहतूक कमी होऊन CO2 चे संतुलन होणार.
१👇 pic.twitter.com/vbiuOTTRaV— पुष्कर | Pushkar (@Pushkartweetss) July 5, 2022
कधी मुंबईत दहाच्या सुमारास उत्तर मध्य मुंबईतून उत्तर पश्चिम मुंबई प्रवास केला तर कळेल. समोर दिसणारे हे धुके नसून तो धूर आहे.वर आकाशापर्यंत दृश्यमानता कमी झालेली दिसते. हेच आता आरे मार्गे प्रवास करा समोर सगळे स्वच्छ दिसते.मी बोलतो आहे ते खोटे वाटत असेल तर उद्या सकाळी जाऊन बघा.
२७०० झाडे तोडून तिथे नवीन लावू हा धादांत मूर्खपणा आहे. झाड म्हणजे काय गच्ची वरची कुंडीतली बाग नव्हे.वर जे दिसते ते झाड जरी असले तरी त्याची मुळे किती खोल असतात? त्या मुळांचा उपयोग? वाढलेली झाडे पुन्हा खोलवर शिरायला किती वेळ लागेल याचा काही अभ्यास? की काहीही आले मनात दिले ठोकून.
एक झाड जे ५० वर्ष जुने असते त्याच्या मुळांचा उपयोग सांगतो नीट वाचून घ्या.
- झाडांची मुळे हि नैसर्गिक रेन वॉटर हार्वेस्टर असतात म्हणजे मातीत पावसाचे पाणी शोषून घेण्यास मदत करणारे. भूजल पातळीचे संतुलन आणि वाढ त्यामुळे फक्त तिथेच नव्हे तर आजूबाजूच्या कित्येक किमी परिसरात होते.
- झाडांची मुळे हि हवेचे शुद्धीकरण करणारी थेट परिसंस्था आहे.
- अनेक भू-जीव झाडांच्या मुळांमुळे जगतात पर्यायाने ज्यांच्यामुळे सॉईल फर्टिलिटी टिकते.
- खोल मुळे असलेल्या झाडांची पाने ओलसर असतात जी वातावरणातली धूळ,धूर, परागकण,नायट्रोजन ऑक्साईड,कार्बन मोनोक्साइड,हायड्रो कार्बन, सल्फर डायऑक्साईड, टॉसिक्स त्यांचा अवरोध करतात. जे रिप्लान्टेड झाडांना लगेचच शक्य होत नाही.
- शेवटचे आरे मधली झाडे नैसर्गिक रित्या तयार झालेल्या जंगलातील किमान २०० वर्ष जुनी आहे
मग अशी २७०० झाडे तोडली तर नुकसान किती होईल? त्या ६२ एकरांमुळे जमिनीखालच्या परिणामांना जबाबदार कोण?
दरवेळी पावसाळ्यात मुंबईची होणारी अवस्था आपण बघतोच ती कशामुळे तर“पितामह” झाडे आणि त्यांची मुळे नसल्यामुळे पाणी मुरण्यास वाव नाही हे प्रमुख कारण, एकतर डांबरी रस्ता आणि नाहीतर दगड भरलेले रेल्वे रूळ. त्यापलीकडे महानगर पालिका वगैरे विषय असतातच पण ते विषयांतर होईल.
काही लोकांसाठी ६२ एकर “केवळ” असतील पण त्या खाली असलेली मुळे जेव्हा उखडून टाकली जातील,त्याखालची माती सुकवून त्यावर काँक्रीटचे कारशेड बांधले जाईल पण त्याच्या आजूबाजूच्या किमान ५०-६० किलोमीटर परिघात पुढच्या पावसाळ्यात काय परिस्थिती होईल त्याचा आजच्या परिस्थितीवरून विचार करावा.
सरकार आणि संस्थांच्या ड्रेनेज यंत्रणेवर किती विश्वास ठेवायचा हा आपला आपला प्रश्न. समोरचा सांगतो आणि आपण ऐकून विश्वास ठेवतो हे ज्यादिवशी बदलेल तेव्हा आपला आणि निसर्गाचा गैरफायदा घेणारे एकदिवस त्याच आरेखली गाडले जातील. सरतेशेवटी एकच सांगतो, वृक्ष हि वल्लीच आहे,ती तिची तिचीच तयार होते तेव्हा सोयरी. आपण झाडे लावणे आणि नैसर्गिक प्रक्रियेतून जंगल तयार होणे यात फरक एवढाच,बाकी पुढे जाऊन पक्षी ही सुस्वरे आळवणार नाहीत.