Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सामनाचं रोखठोक: “आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून लॉकडाऊन या सैतानाची!”

April 4, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
saamana (3)

मुक्तपीठ टीम

दैनिक सामनामधील रोखठोक या साप्ताहिक स्तंभात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोरोना, लॉकडाऊन यावर भाजपाकडून सुरु असलेल्या राजकारणाला चांगलेच ठोकले आहे. “विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी व राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत,” याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही, असे त्यांनी लिहिले आहे. “लोकांना टाळेबंदी नको हे मान्य, पण कोरोनाला कसे थोपवायचे?” असा प्रश्न एकीकडे त्यांनी विचारला असला तरी जास्तीत जास्त ठिकाणी लॉकडाऊनबद्दल लोकांमध्ये असलेला विरोधच अभिव्यक्त झालेला दिसत आहे. “आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून लॉकडाऊन या सैतानाची आहे. काही झाले तरी पुन्हा लॉकडाऊन नको अशी लोकांची मानसिकता स्पष्ट दिसत आहे.” ही त्यांची वाक्य तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनसंवादात नाव न घेता टोला मारलेल्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याविषयीचे भाष्यही वेगळे आहे. त्यांच्याविषयी त्यांनी लिहिले आहे, “आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळया पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉकडाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही.”

खासदार संजय राऊत यांच्या ‘रोखठोक’मधील मुद्दे:

आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून लॉकडाऊन या सैतानाची आहे.

  • कोरोनामुळे देशाची गती मंदावली आहे पण राजकारणातले वारे जोरात सुरू आहेत.
  • महाभारताचे युद्ध अठरा दिवसांचे. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान म्हणाले.
  • कोरोना पराभूत झाला नाही पण ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी राजकीय युद्ध सुरूच आहे.
  • आता भीती कोरोनाची नसून लॉकडाऊनची आहे.
  • संपूर्ण देशात पुन्हा एकदा आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • आता भीती ‘कोरोना’ या विषाणूची नसून लॉकडाऊन या सैतानाची आहे.
  • काही झाले तरी पुन्हा लॉकडाऊन नको अशी लोकांची मानसिकता स्पष्ट दिसत आहे.
  • या सगळयाचा सबंध शेवटी नोकरी, रोजगार व आर्थिक उलाढालीशी येतो.
  • लॉकडाऊनचा मार्ग पुन्हा स्वीकारला तर आताच उभा राहू लागलेला उद्योग – व्यापार पुन्हा कोसळून पडेल.

 

लोकांना टाळेबंदी नको हे मान्य, पण कोरोनाला कसे थोपवायचे?

  • कोरोना कुणालाच सोडत नाही. तो भेदभाव करत नाही.
  • तो जात, धर्माची अस्पृश्यता पाळत नाही.
  • कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे याना एकदा सोडून दोनदा कोरोना झाला. श्री. आदित्य ठाकरे हे कोरोनाने संक्रमित झाले. सौ. रश्मी ठाकरे यांना कोरोनामुळे इस्पितळात दाखल व्हावे लागले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाने ग्रासले.
  • महाराष्ट्रात साधारण पचवीस हजार लोक रोज कोरोनाग्रस्त होत आहेत. मुंबईत हा आकडा पाच हजारावर आहे.
  • लोकांना टाळेबंदी नको हे मान्य, पण कोरोनाला कसे थोपवायचे? स्वत:वर निर्बंध घालून शिस्त पाळायला कोणीच तयार नाही.

 

विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी खेळ

  • बेड उपलब्ध नाहीत
  • मुंबईसारख्या शहरातले कोरोना सेंटर्स आज पूर्ण भरले आहेत.
  • नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे.
  • श्रीमंतांच्या खासगी रुग्णालयांतही जागा नाही. असे अभूतपूर्व संकट आज महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.
  • संपूर्ण देशात कोरोनाचा कहर आहे. पण महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्दैव.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारवार सांगत होते, हात धुवा, मास्क लावा, अंतर पाळा. तेव्हा त्यांच्यावर टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार?
  • विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी व राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही.
  • राज्याच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते योग्य आहे, असे विरोधी पक्षाने पुढे येऊन सांगायला हवे होते. त्यात सगळयाचेच हित झाले असते.

महाराष्ट्रात या काळात काय घडले?

  1. लॉकडाऊन शिथिल होताच लोक बिनधास्तपणे बाहेर पडले.
  2. संभाजीनगरात पुन्हा लॉकडाऊन करावे अशी स्थिती निर्माण झाली. त्यास राजकीय लोकांनी विरोध केला, पण लॉकडाऊन करण्याचा निर्णय रद्द होताच खासदार इम्तियाज जलील यांनी हजारो समर्थकांसह रस्त्यावर उतरून जल्लोष केला. हा सामाजिक अपराधात आहे. हल्ला मोहल्ला कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली म्हणून नांदेडच्या गुरुद्वारातून शेकडो शीख तरुण तलवारी घेऊन बाहेर पडले. त्यांनी पोलिसावरच हल्ला केला.
  3. आज लोकल ट्रेन्स खचाखच भरल्या आहेत व लोक मास्कचा नियम पाळताना दिसत नाहीत.
  4. सिनेमा-थिएटर्स बंद आहेत. नाटकांवरही बंधने आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील लाखो लोकांचा रोजगार बंद आहे.
  5. मॉल्स, रेस्टॉरंटवर कडक निबंध आहेत. त्यामुळे हा उद्योग गलितगात्र होऊन शेवटच्या घटका मोजत आहे. लाखो लोक या सेवा उद्योगावर जगत होते. ते मरणपंथालाच लागले.
  6. मुंबई – पुण्यात आयपीएल सामने झाले ते प्रेक्षकांविना त्यावरही मोठा रोजगार उपलब्ध होतो, जो ठप्प झाला.
  7. शाळा बंद आहेत शाळेत जाणे हे एक स्वप्न असायचे. मात्र कोरोनामुळे शाळा आणि अभ्यास घरच्या घरीच झाला. त्यामुळे एक उगवती पिढी शाळेचा आनंद घेण्यास मुकली आहे.
  8. पर्यटन बंद पडले आहे.
  9. साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रास बांध पडला आहे. नाशिकला होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनही पार पडले नाही.
  10. १४० कोटी लोकसंख्येचा हा देश. गर्दी हेच या देशाचे वैशिष्टय. गर्दी हाच जगाचा बाजार.त्या बाजारात कोट्यावधी कुटुंबे जगत बाजारच कोरोना विषाणूने मारला. हे असेच सुरू राहिले तर वेगळ्याचं संकटांना सामोरे जावे लागेल.

गती मंदावली

  • महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे.
  • तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प . बंगालात विधान सभेचे तीन टप्पे पार पडले.
  • हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही.
  • मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. लॉकडाऊनये दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे कोरोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही.
  • पुन्हा लॉक डाऊन नको ही महिंद्रांची भावना चुकीची नाही
  • कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे.
  • पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन काळात लोकांना थाळया व टाळ्या पिटायला लावले.
  • पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही.
  • आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे.
  • पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळया पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉकडाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही.
  • मोदींच्या लॉकडाऊन घोषणेनंतर हाहा:कार माजला होता.
  • पहिल्या लॉकडाऊनला वर्ष झाले. २४ मार्च २०२० च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला.
  • त्यानंतर जे घडत गेले ते धक्कादायक आणि अमानुष होते. हिंदुस्थान को बचाने के लिए, हिंदुस्थान के हर नागरिक को बचाने के लिए, आप सभी को बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पुरी तरह से पाबंदी है!
  • ही घोषणा मोदींनी करताच संपूर्ण देशात हाहाकार माजला. स्वातंत्र्यानंतरचे सगळ्यात मोठे पलायन हिंदुस्थानने याच काळात पाहिले. देशभरात लोक अडकून पडले .
  • ऑटो, सायकल, बाईकने, पायी चालत असा प्रवास लोकांनी दोन दोन हजार किलोमीटर केला.
  • त्या प्रवासात अनेकांनी प्राण सोडले. पुढचे सहा-सात महिने लोकांनी घरातच काढून घेतले.
  • कमाईचे साधन बुडाले. रोजगार संपला, पण भीतीने त्या सगळ्यांना घरात कोंडून ठेवले.
  • त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे. महाभारताची लढाई १८ दिवस चालली.
  • तुम्ही मला २१ दिवस द्या. २१ दिवसांत कोरोनाला हरवू, असे पंतप्रधान म्हणाले होते.
  • आज एक वर्षांनंतरही कोरोनाची लढाई व लॉकडाऊनची भीती कायम आहे.
  • कोरोना हरणार नाही ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी सरकारने शक्ती पणाला लावली .

Tags: BJPcm uddhav thackeraylockdownMaharashtraMamata BanerjeePM Narendra modisaamana
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

हिमंत बिस्व सर्मा…आसाममधील लोकनेता…भविष्यातील अमित शाह?

Next Post
Himant biswa sarma with amit shah

हिमंत बिस्व सर्मा...आसाममधील लोकनेता...भविष्यातील अमित शाह?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!