मुक्तपीठ टीम
कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक आव्हानांशी झगडणाऱ्या सामान्यांना महागाईच्या आघाडीवर काहीसा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाईचा दर जूनमध्ये ६.२६ टक्क्यांवर आला आहे, त्याआधी मे महिन्यात ६.३० टक्के होता. मात्र, त्याचवेळी जून महिन्यात अन्नधान्य महागाईचा दर किंचित वाढला आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर मेमध्ये ५.०१ टक्के होता, तो जूनमध्ये ५.१५ टक्क्यांवर गेला आहे. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केली आहे.
किरकोळ महागाईसाठी ४ टक्क्यांचे उद्दिष्ट
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किरकोळ महागाईसाठी ४ टक्के मर्यादा निर्धारित केली आहे.
- यात सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन टक्क्यांचा बदल होऊ शकतो.
- अशा परिस्थितीत किरकोळ महागाईने आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या क्षेत्राचा टप्पा ओलांडला, तेव्हा सलग दुसऱ्या महिन्यात ही घटना घडली.
- त्याआधी सलग पाच महिन्यांपर्यंत किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या आत होता.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च २०२०६ मध्ये किरकोळ महागाईचे ४ टक्के (+/- ४%) लक्ष्य ठेवण्याचे उद्दिष्ट्य आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचे लक्ष्य ५.१ टक्क्यावर
• भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२१ या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.१ टक्क्यांपर्यंत आहे.
• त्यानुसार जूनच्या तिमाहीत किरकोळ महागाई ५.२ टक्के, सप्टेंबरच्या तिमाहीत ५.४ टक्के, डिसेंबर तिमाहीत ४.७ टक्के आणि मार्च तिमाहीत ५.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे.