मुक्तपीठ टीम
भारतीय हवाई दलाकडून फ्लाइंग ब्रॅन्च आणि ग्राऊंड ड्युटीमध्ये (टेक्निकल अँड नॉन-टेक्निकल) कमिशन ऑफिसर म्हणून भरतीसाठी वर्षातून दोनदा एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट आयोजित केली जाते. २०२१च्या दुसऱ्या भरतीसाठी आता सुरुवात होईल. भारतीय हवाई दलाकडून जारी एएफकॅट बॅच ०२/२०२१ अधिसूचनेनुसार जुलै २०२२मध्ये सुरु होणाऱ्या कोर्सेससाठी ३३४ जागा आहेत. त्यासाठी प्रवेश परीक्षा २०२१चे आयोजन करण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १ जून २०२१ पासून ते ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) फ्लाइंग ब्रॅन्च या पदासाठी गणित व भौतिकशास्त्र या विषयात किमान ६०% सह १२ वी उत्तीर्ण असावा. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
फ्लाइंग ब्रॅन्च या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २४ असावे तर, ग्राऊंड ड्युटी या पदासाठी वय २० ते २६ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
उमेदवार afcat.cdac.in किंवा careerindianairforce.cdac.in च्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतील.
अधिक माहितीसाठी
भारतीय वायू सेनेच्या अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वरून माहिती मिळवू शकता.