मुक्तपीठ टीम
भारताचा उल्लेख हा अनेकदा जगाचा औषध पुरवठादार म्हणून केला जातो. अगदी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही भारताने अमेरिकेला औषधं पुरवली होती. मात्र, आता भारतातच लसींची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे. असं का झालं त्याची कारणं देशातील लालफितशाहीत आणि सत्ताधारी नेत्यांच्या अतिआत्मविश्वासात आणि त्यामुळे उद्भवलेल्या नियोजनाच्या गोंधळात असल्याचे सांगितले जाते.
देशातील नेते – अधिकारी भविष्याचा वेध घेण्यात अयशस्वी-
- वैद्यकीय तज्ज्ञांच्या परखड सल्ल्यांना महत्व देण्यापेक्षा मन राखण्यासाठी बोलणाऱ्यांना दिलेले महत्व भोवत आहे, असंही सांगितले, जाते. त्यामुळेच ज्येष्ठ विषाणू शास्त्रज्ञ डॉ. जमील यांनी राजीनामा दिला.
- त्यामुळे लसीकरण किती गतीनं करावं लागेल त्याचं नियोजन झालं नाही.
- कोरोनाची दुसरी लाट किती उसळेल याच्या आकलनात भारतातील सत्ताधारी नेते आणि अधिकारी अपयशी ठरले.
- जगाच्या तुलनेत भारतात लसींना चाचण्यांनंतर मंजुरी मिळण्याची गतीही कमी होती.
- रशियासारख्या देशांनी डिसेंबरमध्येच लस बनवून आपल्या नागरिकांना देण्यास सुरवात केली, भारतात दावे झाले, पण गती मिळाली नाही.
- त्यानंतर भारतात लवकरात लवकर लस संशोधन, चाचण्या, मंजुरीसाठी दबाव वाढला.
- जानेवारी २०२१ मध्ये भारताने दोन लस मंजूर केल्या, परंतु देशी आणि परदेशी बाजाराच्या अनुसार लसीचा पुरवठा करण्याची त्यांचे नियोजन होऊ शकले नाही.
उत्पादना संबंधित समस्या-
- भारतात कोरोना लस बनविणार्या दोन मोठ्या कंपन्या भारतात आहेत.
- सीरम आणि भारत बायोटेकच्या दोन लसींवरच भारताचे काम चालेल असे मानले गेले.
- त्यामुळे रशियाची जगातील पहिली लस स्पुतनिक – व्ही भारताला सहज मिळणे शक्य असूनही भारताने प्रयत्न केले नाहीत.
- स्पुतनिक व्हीच्या भारतातील वापरासाठीही आवश्यक मंजुरीही काही दिवसांपूर्वी देण्यात आली.
- अमेरिकेतील लसींनाही भारतात मंजुरी देण्यात आली नव्हती.
- यामुळे भारताने भारताने जगभरातील कंपन्यांना लसींच्या उत्पादनासाठी आमंत्रित करूनही प्रत्यक्षात भारतात लस उत्पादन एका मर्यादेच्या पलिकडे गेले नाही.
- या दोन्ही कंपन्या आणि भारत सरकारला वाटले की दुसर्या कोरोनाच्या लसीला मंजूरी ते कोरोना लसींचे पुरेसे डोस तयार करतील.
- मात्र, लस उत्पादनाची क्षमता वाढविणे दोन्ही कंपन्यांसाठी कठीण असल्याचे सिद्ध झाले.
- त्यातच व्यावसायिक निर्यातीबरोबरच भारताने वॅक्सिन डिप्लोमसीच्या नावाखाली लसींचा मोठा साठा जगभरातील अनेक देशांना देशापेक्षाही स्वस्त दरात पुरवला.
लस टंचाई दूर करण्यासाठी उपाय कोणते?
- भारतात सध्या उत्पादन होत असलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचे उत्पादन वाढवणे. त्यासाठी संबंधित कंपन्यांना वेगानं आवश्यक परवानगी देणे.
- परदेशातील स्पुतनिक प्रमाणेच अमेरिकतेली आणि इतर देशांमध्येही मान्यता मिळालेल्या लसींच्या भारतातील उत्पादनासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांना सवलती देऊन प्रोत्साहित करणे.
- चीनच्या लसीव्यतिरिक्त इतर लसींविषयी अद्याप तक्रारी आलेल्या नाहीत, त्यामुळे इतर लसींना त्वरित चाचण्या आणि मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
- सर्वात महत्वाचं, कोविशिल्डचे उत्पादक असणाऱ्या सीरमचे कार्यकारी संचालक जाधव यांनी दाखवलेल्या सरकारी कामकाजातील त्रुटी गंभीरतेने घेतल्या जाव्यात, लसींची उपलब्धता लक्षात घेऊनच लसीकरणाचा वयोगटांनुसार कार्यक्रम जाहीर करावा.
- लसींच्या दोन डोसमधील कालावधी हा लसींच्या उपलब्धतेनुसार सारखा बदलला जाऊ नये. त्यामुळे अधिच लसींविषयी संशय घेणाऱ्यांना अफवा पसरवण्यास संधी मिळते. त्यामुळे लसी उपलब्ध झाल्या तरी लसीकरण पूर्ण होणे शक्य होणार नाही. धोका कायम राहिल.