किशोर पवित्रा भगवान गणाई / प्रतिमा आणि प्रतिभा
अशा सोनूची चित्रकला पाहीली का ?
तो त्यांना भेटला व
त्याने त्यांना त्यानेच काढलेलं एक चित्रं भेट दिलं
वॉटरकलर मधील त्याने काढलेलं चित्रं त्यांच्यावरच काढलं होतं की ते विमानात चढताहेत
चित्रं पाहून त्यांचे डोळे विस्फारलेच
कधी चित्राला कधी त्याला ते बघत राहिले
त्याच्यातला आत्मविश्वास त्यांना भावला
त्यांनी त्याच्या हातात ब्लँक चेक दिला
व म्हंटले लिही हवी तेवढी रक्कम
तो नम्रपणे म्हणाला नाही ,”मी हे चित्रं तुम्हाला पैशासाठी नाही दिलं “
मी तुम्हाला हे भेट दिलंय ,त्याची किंमत नकोय मला
ते म्हणाले मग मी तुझ्यासाठी काय करू शकतो ?
तो म्हणाला जमलेच तर तुमच्या ताज मध्ये माझ्या चित्रांचं प्रदर्शन लावायला परवानगी द्या
होय ते ताज चे मालक रतन टाटा होते
व चित्रकार होता सोनू ….. Nilesh Mohite
टाटांना त्याचा स्वाभीमानी बाना आवडला…भावला
सोनू कडे ती जादू आहे
लव @ फर्स्ट साईट अशी अवस्था होते
एक बडे राजाने दुसरे छोटे राजा के साथ राजा जैसा व्यवहार किया
त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले , डन !
आणि यस, उद्या तो दिवस आलाय
ज्यावेळी सोनुच्या चित्रांचे प्रदर्शन ताज मध्ये होणार कळलं तसा मी
युरेका ! युरेका किंचाळलोच
खरं तर हे होणार हे मला काय सर्वच मैत्रकुलवासियांना माहीत होतंच पण तरीही ज्या दिवशी कळले माझ्या सोनूच्या …. Nilesh Mohite च्या चित्रप्रदर्शनाला प्रसिद्ध उद्योगपती #रतनटाटा यांनी २४ सप्टेंबरला जगप्रसिद्ध ताज हॉटेलची गॅलरी उपलब्ध करून दिली व त्याला ते स्वतःयेणार आहेत म्हंटल्यावर मला जाम जाम आनंद झाला (माझे त्यांच्याशी कितीही मतभेद असले तरी त्यांच्या दिलदारपणाचे मला कौतूक आहे ) कारण सोनुचे स्वतःचे स्वप्नं पुर्ण होत आहे.
सोनू व त्याच्या चित्रांबद्दल या आधी मी अनेक वेळा दहाबारा वर्ष लिहतो आहे त्यामुळे आपल्या अनेकांना त्याची गोष्टं माहीत आहे
सोनू म्हणजे चित्रकलेतील आधुनीक एकलव्य तो दहावी नापास झाला म्हणून जेजे सारख्या ठिकाणी त्याला ॲडमीशन मिळाले नाही ,अनेक वेळा जेजेच्या तात्कालीन महान लोकांना याचा अपवाद करून यास ॲडमीशन द्यावे म्हणून ठणाणा केला ,एक वेळ विनोद तावडेंनी इंटरेस्ट घेतला पण होता पण कलम कसायांनी घोडा घातला व ते आडवे आले व सगळे फिस्कट्या या साऱ्यांनी सोनू निराश जरी होत होता तरी त्याने हातपाय गळू दिले नाही तो त्याच्या गल्लीतून गेल्यावर एका डेड एन्डला येणाऱ्या छोटुकल्या घरात मोठमोठ्या कॅनवॉस वर वॉटरकलर ,पेन्सील वगैरेंनी भव्य डोळे दिपवणारी चित्रं काढत होता ,जो जो ते पाही तो स्तिमीतच होई ,पहातच राही
धुणीभांडी करणाऱ्या आईला रात्रशाळेत शिकून तो लहानपणापासून काहीना काही काम करून मदत करत होता , त्यामुळे अभ्यासाकडे हवे तसे लक्ष देता आले नाही व शेवटी त्याने शिक्षण सोडले.
घरची जबाबदारी त्याला लवकर घ्यावी लागली त्यात त्याचे लवकर लवमॅरेज झालेय ,आता त्याला एक छान पिल्लू आहे
एवढे सारे असून त्याने चित्रकलेचा नाद काही सोडला नाही ,घरच्यांनीही त्याच्या केलेला कायम मदत केली ,दुसरे कोण असते तर त्याची हि मोठमोठी चित्रं त्यांनी ठेवली नसती.
माझी बहीण Vandana Rokade एका कलाब्याच्या संस्थेत सोशल वर्कर होती तेथे पथनाट्य बसवायला गेलो असताना सोनू व टीमची ओळख झाली व त्याच्या स्केचेस व त्याच्या रेषा पाहून मी प्रभावीत झालो व नातं कधी घट्ट झालं कळलं नाही हे नातं पुढे Jyoti Badekar ने बांधले ,जनता दलाची मुंबईची महासचिव झाली, त्या निमित्ताने कुलाब्यातील लोकांचे प्रश्नं आणण्यात व सोडवण्याचं सोडवण्यात सोनूची चांगली मदत झाली ,त्यातून त्याच्या चित्रकलेला आयाम मिळावा म्हणून ती धडपड करू लागली ,त्यात माझा यार दिलदार भाऊ Dr Jitendra Jadhav याची फार मोठी मदत झाली व आजचा दिवस त्यामुळे दिसतो आहे.
विद्यार्थी भारतीच्या एका शिबीरात सोनू त्याचा परममित्रं राका राकेश राजेश्री रघुनाथ सुतार व Sachin Sutar यांना घेवून आला व त्यांनी मुंबईच्या दुसऱ्या टोकावर भातपाड्यात रत्नांची खाणच उघडली ,या टोकावर पण एकसोएक रत्नं होती नाही असे नाही पण तीकडे सोनूला हवं तसं लक्ष देता नाय आलं.घर चालवण्यासाठी काम करणं व जेंव्हा जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा चित्रं काढणं व कोणी कोणत्याही अडचणीत आला की त्याच्या मदतीला धावून जाणं हे चालुच होतं ,आपली साधना काही केल्या त्याने सोडली नाही
त्याच्या तपश्चर्येस …ज्ञानसाधनेला आज एकार्थाने फळ मिळालं.
सोनू भयानक लाजरा बुजरा आहे ,तो सहज कोणात लगेच मिक्स होत नाही पण तुमचं एकदा त्याच्याशी नातं जुळलं की तो एकदम भडभडा बोलू लागतो पण ज्यावेळी हातात ब्रश घेतो त्यवेळी त्याची तल्लीनता बघण्यासारखी असते बहुतांशी वॉटर कलर मध्ये त्याने काम केले आहे व ते काय ताकदीचे आहे फोटो मध्ये जरूर तुमीच पहा मुंबईत त्याने अनेक भिंती रंगवल्यात पण त्या कॉन्ट्रंक्ट मध्ये एकतर फार कमी पैसे मिळतात दुसरे लोक त्यातही कमी पैसे देतात व तोही वेळेवर देत नाहीत त्याने नाती तुटताता व म्हणून नात्यांना जास्त महत्वं देणाऱ्या सोनूने ती कामंच घेणे सोडले अनेक थोरामोठ्यांना त्याने त्यांची रेखाचित्रं करून दिली ,दिवस भर काम करून जेवढे पैसे मिळत नाहीत त्याच्या पेक्षा खुप चांगले पैसे चित्रकलेत मिळत असले हे जरी किती खरं असलं तरी त्यात सातत्य नाही ,खुप पैसा लागतो व या देशात अनेकांची चित्रकाराचा मरून जाते ,या देश काही फ्रान्स नाही जेथे कलाकारांची कदर होते .सुमारांच्या मांदियाळीत हुजरेगीरी करून चमकदार काम करणाऱ्यांची रेलचेल असताना सोनू सारख्याची पारख रतन टाटांनी केली व त्यास त्यांचे आभाळ सहज दिले त्या करता टाटा यांनी जे काही केले त्यास माझा त्रिवार सलाम व सोनूच्या मेहनतीस फळ यावं या करता खुप खुप सदिच्छा दिल्या. तुझ्यातला पिकासो व व्हिंसेंट व्हेन गॉग आता भरारी मारो स्वप्नांवर प्रेम असलं व त्याचा ध्यास असला की आपलं आभाळ कोणीच डीलीट करू शकत नाही याचे जीतेजागते उदाहरण तू बनणार ही मला खात्री आहे चित्रकलेच्या दुनियेत सुद्धा सगळंच ऑल इज वेल नाही पण तरीही तू त्या अवकाशात ध्रूवतारा बनणार ही पण मला खात्री आहे.