Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

Don’t Underestimate! रामदास आठवलेंनी चक्क इंग्रजीचे ‘प्रकांड पंडित’ शशि थरूरांना दाखवल्या त्यांच्या इंग्रजीतील चुका!

February 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Athwale & tharoor

मुक्तपीठ टीम

आपल्या महाराष्ट्रातील नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणजे एक मोकळा ढोकळा माणूस. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष असणारे आठवले शीघ्रकवी असल्याने अनेकदा त्यांना चेष्टेचा विषय ठरवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, यावेळी त्यांनी ट्विटरवर जे इंग्रजीचे क्लास घेतलेत त्यामुळे इंग्रजीचे प्रकांड पंडित असणारे काँग्रेस नेते शशि थरुर यांचा सारखा उचभ्रू Elite उघडा पडला. आठवलेसरांनी चक्क थरुरांच्या ट्वीटमधील इंग्रजीच्या चुका दाखवल्या. थरुरांनीही त्या मान्य केल्या!

थरूर यांचे ट्वीट

  • थरूर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक फोटो ट्विट केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या मागे रामदास आठवले बसलेले दिसत आहेत.
  • थरूर यांनी लिहिले की, मंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव सारे काही सांगत आहेत.
  • अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्र्यांच्या दाव्यांवर त्यांच्या आघाडीचाही विश्वास बसत नाही,” असे थरूर यांनी म्हटले.

 

Nearly two-hour rely to the Bydget debate. The stunned & incredulous expression on Minister @RamdasAthawale’s face says it all: even the Treasury benches can’t believe FinMin @nsitharaman’s claims about the economy & her Budget! pic.twitter.com/wOGY7TJYg8

— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 10, 2022

 

रामदास आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर

  • या ट्वीटला केंद्रीय मंत्री आठवले यांनी उत्तर दिले आहे.
  • “प्रिय शशी थरूर जी, असे म्हणतात की अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणारच.
  • इथे ‘Bydget’ नाही तर BUDGET होईल आणि rely ऐवजी ‘reply’ होईल! पण आम्ही समजू शकतो!” असे आठवले यांनी म्हटले आहे.
  • रामदास आठवलेंची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहे.

 

Dear Shashi Tharoor ji, they say one is bound to make mistakes while making unnecessary claims and statements.

It’s not “Bydget” but BUDGET.

Also, not rely but “reply”!

Well, we understand! https://t.co/sG9aNtbykT

— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 10, 2022

थरूर यांनी मान्य केल्या चुका!

  • रामदास आठवले यांनी पकडलेल्या चुका थरूर यांनी मान्य केल्या.
  • पण थरूर यांनी सीतारामण यांनाही चिमटा काढला.
  • टायपिंगमधील चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
  • पुढे सुनावले “बेफिकीरपणे टायपिंग करणे हे खराब इंग्रजीपेक्षा मोठे पाप आहे..!”
  • जेएनयूमधील एकाला तुमच्या शिकवणीचा फायदा होऊ शकतो, असे थरुर यांनी म्हटले.

 

I stand corrected, Ramdas ji. Careless typing is a bigger sin than bad English!
But while you’re on a roll, there’s someone at JNU who could benefit from your tuition…..

— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 10, 2022

 

थरुरांच्या इंग्रजीतील चुका पकडणं मोठी कामगिरी!

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांनी वापरलेले इंग्रजीतील लांबलचक शब्द कधीकधी पट्टीच्या इंग्रजी भाषातज्ज्ञांनाही बुचकळ्यात टाकतात.
  • पण गुरुवारी थरूर यांच्या ट्विटरवर इंग्रजीतील अनेक चुका पकडल्या गेल्या.
  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्या सोप्या इंग्रजीतील चुका पकडल्यानं ते प्रचंड हिट ठरले!

Tags: englishNIRMALA SITARAMANramdas athwaleShashi Tharoortwitterइंग्रजीट्विटररामदास आठवलेशशि थरूर
Previous Post

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर येथे ७५ जागांसाठी भरती

Next Post

“किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल”

Next Post
Chandrakant Patil

"किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!