मुक्तपीठ टीम
डिसेंबर २०२३पर्यंत राम मंदिरचे बांधकाम होणार पूर्ण होणार आहे. त्यामुळे २०२४मध्ये रामलल्लाचे दर्शन भव्य मंदिरात घेणे शक्य होणार आहे. सध्या अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिराच्या उभारणी प्रगतीपथावर आहे. मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. या पायाच्या बांधकामात सिमेंटचाही अत्यल्प वापर करण्यात आला आहे. यामध्ये आयआयटी मद्रासने तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करण्यात आला आहे.
मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराचा पाया १२ मीटर खोल आहे. तर गर्भगृहात १४ मीटरच्या दगडी पायामध्ये एकही लोखंडी तार वापरण्यात आलेली नाही. यात ९८ टक्के घनतेवर काँक्रीट कास्ट आहे. त्याचे थर १-१ मीटर आहेत. गर्भगृहात ५६ तर बाहेर ४८ थर आहेत. हे काम नऊ महिन्यांत पूर्ण झाले आहे, ही माहिती विहिपचे नेते आणि राम मंदिर विश्वस संस्थेचे चंपत राय यांनी दिली आहे.
राम मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर…
- अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिराच्या उभारणीची प्रगती आणि सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी विश्व हिंदू परिषद संत आणि धार्मिक नेत्यांची भेट घेत आहे.
- नोव्हेंबर २०२१ पासून ते देश आणि राज्यातील संतांना वैयक्तिक आणि सामूहिक भेटत आहेत.
- वृंदावनात येण्यापूर्वी त्यांनी वाराणसी, अयोध्या, नैमिषारण्य, बिथूर, सुकर क्षेत्र, सोरोन इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या होत्या.
- ३ फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यातही ते संतांची भेट घेणार आहेत.
- बांधकामाची प्रगती पाहण्यासाठी सर्व संत आणि महात्म्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण
- रामलल्ला आता लाकडी मंदिरात असून २८ वर्षांपासून तंबूत विराजमान असल्याची माहिती मिळाली.
- मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले. मंदिरातील पाया १२ मीटर खोल आहे, तर गर्भगृहात १४ मीटरच्या दगडी पायामध्ये एकही लोखंडी तार वापरण्यात आलेली नाही.
- या पायाच्या बांधकामात सिमेंटचाही अत्यल्प वापर करण्यात आला आहे.
- यामध्ये आयआयटी मद्रासने तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करण्यात आला आहे.
- यात ९८ टक्के घनतेवर काँक्रीट कास्ट आहे. त्याचे थर १-१ मीटर आहेत.
- गर्भगृहात ५६ तर बाहेर ४८ थर आहेत. हे काम नऊ महिन्यांत पूर्ण झाले.
भिंत बांधण्यासाठी जोधपूरहून दगड मागवले जातील
- पुढील आठवड्यापासून मजला वाढवण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले.
- मजला उंच करण्यासाठी, ग्रॅनाइट दगडाचे ५x३x२.५ फूट आकाराचे १७ हजार ब्लॉक बसवले जातील.
- हा मजला सुमारे साडेसहा मीटर उंच केला जाईल.
- हे काम ६ महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर जूनपासून मंदिर उभारणीचे काम सुरू होणार आहे.
- प्रवासी सुविधांसह मंदिराचे क्षेत्रफळ १८ एकरमध्ये असेल, असे सांगितले.
- २.७५ एकरमध्ये हे मंदिर बांधण्यात येणार आहे. यानंतर साडेसहा एकर जागेवर ९ मीटर उंचीची भिंत बांधण्यात येणार आहे.
- भविष्यातील भूकंप आणि महापूर लक्षात घेऊन त्याची बांधणी केली जात आहे.
- संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी १७ लाख घनफूट दगड लागणार आहे.
- यात कर्नाटकातील ग्रॅनाइट, बनशी पहारपूर (बयाणा) येथील मंदिराचे दगड आणि मकरानाची चौकट असेल.
- जोधपूरहून भिंत बांधण्यासाठी दगड आणण्याचा विचार सुरू आहे. एका दिवसात ५० हजार दर्शनार्थी मंदिरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
- त्याचबरोबर सणासुदीच्या दिवसांत २ ते २.५ लाख लोक येऊ शकतात. मंदिराच्या उभारणीत भावी यात्रेकरूंच्या संख्येची काळजी घेतली जात असल्याचे विहिंप नेत्याने सांगितले.
मथुरेतील श्री कृष्ण जन्मस्थानावरून सुरू असलेल्या गदारोळात विहिपच्या रणनीतीबद्दल विचारले असता चंपत राय म्हणाले की, आता पावसाळा येईल, चिखल होण्याची भीती आहे, एक पाय मजबूत झाल्यास दुसरा पाय तयार करण्यात येईल. आता राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊ द्या, मगच पावले उचलली जातील, असे त्यांचे म्हणणे होते.