मुक्तपीठ टीम
भारतीय लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी आज गुजरात राज्यात सुरतजवळील हाझिरा येथे वसलेल्या एल अँड टीच्या आर्मर्ड सिस्टीम कॉम्प्लेक्समधून १०० व्या के9 वज्रा १५५एमएम/५२ ट्रॅक्ड सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर रणगाड्याला झेंडा दाखवला.
शंभराव्या हॉवित्झरला झेंडा दाखवण्यासह एल अँड टीने मे २०१७ मधे मिळालेल्या सद्य एमओडी कंत्राटाअंतर्गत सर्व हॉवित्झर्सचे वितरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे आणि गुंतागुंतीच्या प्लॅटफॉर्म्सचे वेळेत वितरण करण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. हे कंपनीची कार्यक्रम व्यवस्थापन क्षमता, गुंतागुंतीच्या यंत्रणांचे एकत्रीकरण कौशल्य आणि कंपनीची उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन कौशल्य आणि अंमलबजावणीतील कार्यक्षमतेचे उत्तम दाहरण आहे. माननीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी जानेवारी २०२० मधे एएससी, हाझिरा येथून ५१ व्या के9 वज्राला झेंडा दाखवला होता.
एल अँड टी डिफेन्सने जागतिक स्तरावर झालेल्या स्पर्धात्मक बिडिंगमधे मिळवलेले हे कंत्राट कोणत्याही खासगी भारतीय कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेले सर्वात मोठे कंत्राट असून त्याअंतर्गत कंपनीने ‘के9 वज्रा’ची निर्मिती केली. या कार्यक्रमात एल अँड टी सर्वात मोठी बिडर होती, तर दक्षिण कोरियातील प्रमुख संरक्षण कंपनी आणि जगातील सर्वात उच्च श्रेणीचे हॉवित्झर ‘के9 थंडर’ची ओईएम उत्पादक असलेल्या हान्व्हा डिफेन्स तिची तंत्रज्ञान भागीदार होती. ‘के9 हॉवित्झर’ प्रोग्रॅमअंतर्गत इंजिनियर सपोर्ट पॅकेज (ईएसपी), सुटे भाग, यंत्रणेची कागदपत्रे आणि प्रशिक्षण यांसह १०० हॉवित्झर्सच्या वितरणाचा समावेश होता. त्याशिवाय यामधे मेन्टेनन्स ट्रान्सफर ऑफ टेक्नोलॉजी (एमटीओटी) त्याचप्रमाणे संरक्षण दलाच्या तळावर हॉवित्झर्सच्या संपूर्ण जीवनचक्रादरम्यान मदतीसाठी कार्यशाळा यांचा समावेश होता.
‘मेक इंन इंडिया’ मिशनचा एक भाग म्हणून कंपनीने सुरतजवळील हाझिरा उत्पादन केंद्रामधे ग्रीन- फील्ड उत्पादन, एकत्रीकरण आणि चाचणी सुविधा, आर्मर्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्सची (एएससी) स्थापना केली. जानेवारी २०१८ मधे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे एएससी राष्ट्राला अर्पण केले होते.
याप्रसंगी एल अँड टीचे संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (संरक्षण आणि स्मार्ट तंत्रज्ञान) जे. डी. पाटील म्हणाले, ‘आर्मर्ड सिस्टीम कॉम्प्लेक्समधे शंभराव्या ‘के9 वज्राला’ झेंडा दाखवण्यासाठी व त्याचबरोबर भारतीय सैन्याला उच्च तंत्रज्ञान असलेल्या शस्त्र यंत्रणांच्या वितरणाची सांगता जाहीर करण्यासाठी आमंत्रण देत संरक्षण प्रमुखांनी आमचा सन्मान केला आहे. के9 वज्रासारख्या गुंतागुंतीच्या प्लॅटफॉर्म्सचे उत्पादन भारतीय अर्थव्यस्थेला विस्तृत प्रमाणात लाभ मिळवून देणारे, रोजगार निर्मिती करणे आणि संरक्षण क्षेत्रासाठी भारतातील उद्योग क्षेत्राची यंत्रणा विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. एल अँड टीने मिळवलेला अनुभव, कामाचा इतिहास, कौशल्य, क्षमता आणि पायाभूत सुविधा यांच्या मदतीने भारताचा भविष्यकालीन तोफखाना तसेच सैन्यदलासाठी आर्मर्ड प्लॅटफॉर्म्स देशांतर्गत पातळीवर विकसित करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’
‘शंभराव्या के9 वज्रा हॉवित्झरच्या वितरणासह आम्ही अशाप्रकारचा सेवेत असलेला एकमेव जमिनीवरून वापरण्याचा प्रमुख प्रोग्रॅम वेळेआधी पूर्ण करून या क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. आम्हाला आशा आणि खात्री आहे, की भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत या महत्त्वाकांक्षी कंत्राटाच्या अंमलबजावणीसाठी आर्मर्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्सच्या रूपात राष्ट्रीय मालमत्ता तयार केली असून त्यामुळे अतिशय मेहनतपूर्व बनवलेल्या 1000 पेक्षा जास्त एमएसएमई भागिदारांच्या पुरवठासाखळीला टिकून राहाता येईल.’
‘के9 वज्रा’ यंत्रणा प्रोग्रॅमस्तरावर ८० टक्के देशांतर्गत वर्क पॅकेजेसपेक्षा जास्त आणि ५० टक्के स्वदेशीकरणासह (मूल्याच्या बाबतीत) वितरित करण्यात आल्या आहेत. त्यामधे प्रत्येक यंत्रणेमागे १३,००० प्रकारच्या सुट्या भागांच्या स्थानिक निर्मितीचा समावेश असून त्यासाठी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळ नाडू या राज्यांतील पुरवठा साखळीचा वापर करण्यात आला.
एल अँड टीने या प्रोग्रॅमच्या स्थापनेपासूनच स्वदेशीकरणाला महत्त्व देत कोरियाच्या ‘के9 थंडर’मधील १४ महत्त्वाच्या यंत्रणांच्या जागी देशांतर्गत विकसित करण्यात आलेल्या आणि वापरकर्ता मूल्यांकन चाचणीसाठीच्या ट्रायल गन फील्डसाठी बनवण्यात आलेल्या यंत्रणा वापरून के9 वज्रा ही भारतातील परिस्थिती व गरजांनुसार काम करणाऱ्या भारतीय आवृत्तीला जन्म दिला. या देशांतर्गत विकसित व उत्पादित करण्यात आलेल्या यंत्रणेमधे फायर कंट्रोल सिस्टीम, डायरेक्ट फायर सिस्टीम, अम्युनिएशन हँडलिंग आणि ऑटोलोडिंग सिस्टीम आणि पर्यावरण नियंत्रण व सुरक्षेशीसंबंधित इतर महत्त्वाच्या यंत्रणाचा समावेश आहे.
एल अँड टीने भारतीय परिस्थितीला अनुसरून वैशिष्ट्यांचा समावेश करत विकसित केलेली वज्रा आवृत्ती कठीण आणि विस्तारित फील्ड चाचण्यांदरम्यान भारतीय सैन्यदलाच्या गरजांचे पूर्णपणे पालन करणारी आहे. एल अँड टीने तरुण इंजिनियर्सची टीम तयार करून त्यांना कंपनीअंतर्गत शस्त्र यंत्रणा तज्ज्ञांच्या मदतीने आणि दक्षिण कोरियातील हान्वा केंद्रामधे प्रशिक्षण देत उत्पादन स्वयंचलन, एकत्रीकरण अशा क्षेत्रांत पारंगत केल्याने त्याचा स्वदेशी उत्पादनासाठी मोठा फायदा झाला. त्याचबरोबर टीमने साखळी पुरवठा भागिदारांना आणि एल अँड टीच्या पाच संरक्षण उत्पादन युनिट्सना प्रशिक्षण दिले. या युनिट्सनी पुढे हब अँड स्पोक मॉडेलअँतर्गत १००० साखळी पुरवठा भागिदारांसाठी हब्जची भूमिका निभावली.
पार्श्वभूमी
लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ती ईपीसी प्रकल्प, हाय- टेक उत्पादन आणि सेवा प्रकल्प क्षेत्रांत कार्यरत असून तिचे उत्पन्न 21 अब्ज डॉलर्स आहे. कंपनी 30 देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहककेंद्रीत दृष्टीकोन आणि सातत्याने उच्च दर्जाचा ध्यास यांमुळे एल अँड टीने गेल्या आठ दशकांत बहुतेक व्यवसायांत आघाडीचे स्थान मिळवले व टिकवले आहे.