तुळशीदास भोईटे – सरळस्पष्ट विश्लेषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर जे केले नव्हते ते आज केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची पहिली पाच वर्षे किमान मंत्र्यांसह कारभार केला. या दुसऱ्या टप्प्यात मात्र त्यांनी संख्या वाढवत मंत्रिमंडळ नव्यानेच रचल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी निकष जे वापरले गेले आहेत ते ‘कारभार-जात-उपरे आपलेच’ त्रिसुत्रीचे आहेत.
कारभार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कारकीर्दीच्या पाच वर्षात जे घडले नाही ते दुसऱ्या कारकीर्दीच्या दोन वर्षात घडले. मोदी सरकारची प्रतिमा पणाला लागली. कोरोना संकट काळात तर मोदी सरकार काहीच करु शकली नाही अशी टोकाची टीकाही मोदी सरकारवर झाली. त्यातूनच मग मंत्रिमंडळातून आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धनसारख्या ज्या मंत्र्यांना घरी पाठवण्यात आले त्यांच्या कारभारामुळे मोदी सरकारच्या प्रतिमा ढासळत होती. तसेच ज्यांनी राज्यमंत्रीपदी असताना चांगला कारभार केला, त्या जी किशन रेड्डी, अनुराग ठाकुर यांच्यासारख्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली गेली आहे. बिहार निवडणुकीत भाजपाला नंबर वन पक्ष बनवत एनडीएची सत्ता कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भूपेंद्र यादव यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
हेही वाचा: मोदी सरकारचं सातवं वर्ष पूर्ण होणार, रिकाम्या जागा भरण्यासह फेरबदलांचीही शक्यता
जात
• उघडपणे कधीच कोणी मान्य करत नसले तरी भारतीय राजकारणात जात हा महत्वाचा घटक असतोच असतो. नव्या मंत्र्यांची निवड करताना उत्तरप्रदेशात ओबीसी जातींना जास्त महत्व दिले आहे.
• त्याचे कारण अखिलेश यादवांच्या सपाकडे असलेला यादव जातीची एकगठ्ठा मते फोडता येत नसतील तर किमान इतर ओबीसी जातींना सोबत आणण्यासाठी अपना दलाच्या अनुप्रिया पटेलांना पुन्हा सोबत घेण्याबरोबरच इतर मंत्र्यांच्या निवडीतही हा निकष प्रभावी ठरला असल्याचे दिसत आहे.
• महाराष्ट्रात संजय धोत्रेंना कारभाराच्या मुद्द्यावर घरी पाठवत असतानाच ओबीसी कपिल पाटील, आदिवासी समाजातील भारती पवार, वंजारी समाजातील भागवत कराड आणि मराठा समाजातील नारायण राणे ही नावे निवडून जातीचा समीकरण सांभाळलेले दिसत आहेत.
• मराठा, आगरी, वंजारी, आदिवासी, यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल.
• या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, अशी शक्यता आहे.
उपरे आमचेच
• उत्तरप्रदेशासारख्या निवडणुकीला सामोरे जाणारे राज्य असो वा महाराष्ट्रासारखं ताब्यात घ्यायचं असलेलं राज्य असो.
• जात हा घटकही त्यांच्या प्रादेशिक स्थानाप्रमाणेच महत्वाचा ठरला आहे. आणखी एक निकष महत्वाचा दिसत आहे, तो म्हणजे बाहेरून आलेल्यांना मंत्रीपद देताना एक संदेश देण्याचा प्रयत्नही आहे, तुम्ही भाजपात बाहेरून जरी आलात तरी भाजपाची सत्ता तुमच्यासाठीही आहे.
• मध्यप्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे असो वा महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार. या निवडीतून महाराष्ट्रासारख्या राज्यात कुंपणावर असणाऱ्यांना किंवा बसू पाहणाऱ्यांना ‘येवा भाजप तुमचाच असा’ हा संदेशही स्पष्टपणे दिल्याचे दिसत आहे.
• हा निकष महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाचा ठरु शकतो. कारण महाराष्ट्राच्या आठ मंत्रीपदांपैकी चार म्हणजे निम्मे हे आता आरपीआय म्हणजे दुसरा पक्ष, उरलेले तीन मूळ भाजपाचे नसणारे बाहेरून आलेले नारायण राणे (शिवसेना-काँग्रेस – मस्वाप), कपिल पाटील (राष्ट्रवादी) आणि भारती पवार (राष्ट्रवादी) हे आहेत.
• महाराष्ट्रात जर ऑपरेशन लोटस करायचे ठरले तर तेथे गेल्यावर आपण संघविचारांचे नसलो तरी आपला सत्ता सन्मान राखला जाईल, असा स्पष्ट संदेश दिल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: ज्योतिरादित्य शिंदे मोदी सरकारमध्ये मंत्री बनण्याची शक्यता!
मोदी सरकारचे नवे कारभारी
• नारायण राणे
• सर्बानंद सोनोवाल
• डॉ वीरेंद्र कुमार
• ज्योतिरादित्य शिंदे
• रामचंद्र प्रसाद सिंह
• अश्विनी वैष्णव
• पशुपती कुमार पारस
• किरण रिजिजु
• राजकुमार सिंह
• हरदीप सिंह पुरी
• मनसुख मंडाविया
• भुपेंद्र यादव
• पुरुषोत्तम रुपाला
• जी किशन रेड्डी
• अनुराग सिंह ठाकूर
• पंकज चौधरी
• अनुप्रिया सिंह पटेल
• सत्यपालसिंह बघेल
• राजीव चंद्रशेखर
• शोभा करंदलजे
• भानू प्रतापसिंह वर्मा
• दर्शना विक्रम जार्दोस
• मीनाक्षी लेखी
• अन्नपूर्णा देवी
• ए नारायण स्वामी
• कौशल किशोर
• अजय भट
• बीएल वर्मा
• अजय कुमार
• देवूसिंह चौहान
• भगवंत खुबा
• कपिल पाटील
• प्रतिमा भौमिक
• डॉ सुभाष सरकार
• डॉ भागवत कराड
• डॉ राजकुमार रंजन सिंह
• डॉ भारती पवार
• बिश्वेश्वर तुडू
• शंतनू ठाकूर
• डॉ मुंजापारा महेंद्रभाई
• जॉन बार्ला
• डॉ एल मुरुगन
• डॉ निशीत प्रामाणिक
राजीनामा देणारे मंत्री
1. प्रकाश जावडेकर (माहिती प्रसारण मंत्री)
2. रवी शंकर प्रसाद (केंद्रीय कायदा मंत्री)
3. डॉ. हर्षवर्धन (आरोग्यमंत्री)
4. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (शिक्षणमंत्री)
5. संजय धोत्रे (शिक्षण राज्यमंत्री)
6. अश्विनी चौबे (आरोग्य राज्यमंत्री)
7. देवोश्री चौधरी (महिला व बालविकास मंत्री)
8. सदानंद गौडा (खत व रसायने मंत्री)
9. संतोष गंगवार (कामगार राज्यमंत्री)
10. बाबुल सुप्रियो
11. प्रताप सारंगी
12. रतनलाल कटारिया
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला. त्यांना कर्नाटकचे राज्यपाल केले गेले आहे.