मुक्तपीठ टीम
केंद्रातील मोदी सरकारने अखेर तीन नवीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काळे कायदे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कायद्यांना मागे घेण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली आहे. आज सकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मला खेद वाटतो की मी तीन कृषी कायदे समजवू शकलो शकलो नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मला माफ करा: पंतप्रधान मोदी
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, मला खेद वाटतो की मी तीन कृषी कायदे समजवू शकलो नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत केले आणि पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी आज खूप ऋणी आहे. वर्षानुवर्षे देशातील शेतकरी, देशातील कृषी तज्ज्ञ, देशातील शेतकरी संघटना ही मागणी सातत्याने करत आहेत. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, मंथन झाले आणि हे कायदे आणले गेले.
शेतकऱ्यांची आव्हाने जवळून पाहिली
पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या पाच दशकांच्या आयुष्यात आम्ही शेतकऱ्यांची आव्हाने खूप जवळून पाहिली आहेत, जेव्हा देशाने आम्हाला 2014 मध्ये प्रधान सेवक म्हणून सेवा करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही कृषी विकास, शेतकरी कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिले. देशातील लहान शेतकऱ्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही बियाणे, विमा, बाजारपेठ आणि बचत यावर सर्वांगीण काम केले आहे. चांगल्या दर्जाच्या बियाण्यांसोबतच सरकारने नीम कोटेड युरिया, मृदा आरोग्य कार्ड, सूक्ष्म सिंचन यांसारख्या सुविधाही शेतकऱ्यांना जोडल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक पावलेही उचलण्यात आली.
शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच होते
हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा मागे घेण्याच्या घोषणेचे आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. आपल्या संबोधनाच्या सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबद्दल बोलत होते. तुम्ही घरी परत या आणि शेतीच्या कामात सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधानांनी आंदोलक शेतकऱ्यांना केले.
सरकारने विक्रमी खरेदी केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या महामोहिमेत देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले. देशातील शेतकर्यांना, विशेषत: लहान शेतकर्यांना अधिक बळ मिळावे, त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा त्यामागचा उद्देश होता. आम्ही केवळ एमएसपी वाढवली नाही, तर विक्रमी सरकारी खरेदी केंद्रेही निर्माण केली. आपल्या सरकारने केलेल्या मालाच्या खरेदीने गेल्या अनेक दशकांतील विक्रम मोडीत काढले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक पावलेही उचलण्यात आली.