मुक्तपीठ टीम
आता शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या योजने मार्फत दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपये. तेही तुमच्या खिशातून एकही पैसा खर्च न करता. जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी संधी आहे. पंतप्रधान किसान मानधन योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकर्यांना याचा लाभ मिळू शकेल. मानधन योजनेसाठी कागदपत्रांची गरज भासणार नाही. त्याच वेळी, त्यात सामील झाल्यावर, खिशातून पैसे न देता वर्षाला ३६००० मिळण्याचे अधिकार असतील. त्यासाठी जास्त काही नाही तर दर महिन्याला वयोमानाप्रमाणे ५५ ते २०० रुपयांचे अंशदान जमा करावे लागेल. त्यानंतर एका ठराविक टप्प्यावर निवृत्ती वेतन मिळू शकेल.
पीएम किसान मानधन योजने अंतर्गत शेतकर्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे. त्यामध्ये ६० वर्षे वयानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन देण्यात येते. जर एखादा शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. कारण अशा शेतकऱ्यांची संपूर्ण कागदपत्रे भारत सरकारकडे आहेत.
पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये अंशदान करण्याचा पर्याय निवडण्याची सूट आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याला कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. जे कोणी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी नसतील ते ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कोण-कोण घेऊ शकतात या योजनेचा लाभ?
१. किसान समाज योजने अंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी त्यामध्ये नोंदणी करू शकतो.
२. ज्या शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त २ हेक्टर शेत जमीन आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
३. शेतकर्यांचे किमान वय २० वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे असेल त्यांना या योजने अंतर्गत ५५ ते २०० रुपयांची मासिक देणगी द्यावी लागेल.
४. वयाच्या १८ व्या वर्षी सामील झाल्यास मासिक अंशदान दरमहा ५५ रुपये असेल.
५. वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत सामील झाल्यास, दरमहा ११० रुपयांचे योगदान द्यावे लागेल.
६. त्याचप्रमाणे वयाच्या ४० व्या वर्षी सामील झाल्यास दरमहा २०० रुपये द्यावे लागतील.
पाहा व्हिडीओ: