मुक्तपीठ टीम
भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानातील कंदहार भागात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. सध्या रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसोबत काम करणाऱ्या दानिशवर अफगानिस्तानात सुरु असलेल्या हिंसक सत्तासंघर्षाला टिपण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी काढलेली छायाचित्र अख्खी बातमीच नाही तर तेथील परिस्थितीही जिवंतपणे मांडण्याचे काम करीत होती. मृत्यूपूर्वी त्यांनी ट्विट थ्रेडच्या माध्यमातून ते ज्या मिशनचं कव्हरेज करत होते, त्यातील अनुभव सचित्र मांडले होते.
दानिश सिद्दीकी यांचं मृत्यूच्या विळख्यातील मिशन कव्हरेज!
- दानिश सिद्दीकी सध्या रॉयटर वृत्तसंस्थेसोबत काम करत होते.
- अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघारीस सुरुवात करताच अपेक्षेप्रमाणे सत्तेसाठी तालिबान्यांनी हिंसक कारवाया सुरु केल्या.
- अफगाणिस्तानातील हा हिंसक सत्तासंघर्ष कव्हर करण्यासाठी दानिश सिद्दीकी तेथे होते.
- अफगाणी सैन्यासोबत एक मिशन कव्हर करत असतानाच दानिश यांची हत्या झाली आहे.
- दानिश सिद्दीकी यांची हत्या स्पीन बोल्डक भागात करण्यात आली.
- हा भाग अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात येतो.
- गेल्या काही काळापासून याच भागात तालिबानी आणि अफगाण सेनेत तुंबळ लढाई सुरु आहे.
- दानिश सिद्दीकी स्वत: त्या संघर्षाला अनुभवत ती छायाचित्रं टिपत होते. असाच एक संघर्ष टिपत असतानाच दानिश यांना टिपण्यात आलं आहे.
मृत्यू घोंघावत असतानाचं लाइव्ह कव्हरेज…
- दानिश सिद्दीकी यांची अखेरची स्टोरी रॉयटरवर उपलब्ध आहे.
- त्या स्टोरीत त्यांनी कंदहारमध्ये नेमकं काय घडतं आहे याची सविस्तर माहिती दिली आहे.
THREAD.
Afghan Special Forces, the elite fighters are on various frontlines across the country. I tagged along with these young men for some missions. Here is what happened in Kandahar today while they were on a rescue mission after spending the whole night on a combat mission. pic.twitter.com/HMTbOOtDqN— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
- अफगाणिस्तानमध्ये गेल्यापासून सभोताल घडत असलेल्या सर्व संघर्षाची माहिती दानिश सिद्दीकी स्वत:च्या ट्विट अकाऊंटवरुन मांडत होते.
The objective was to extract a wounded policeman trapped by Taliban insurgents on the outskirts of Kandahar city for the last 18 hours. The particular district is contested between the government and the Taliban. pic.twitter.com/97WUTtb8Ze
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
- १३ जुलैला रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ११ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यांनी आठ ट्विटमध्ये सभोतालचा थर्रार सचित्र मांडला.
I could feel the tension in the air as ASF were expecting an imminent attack from the Taliban. There was sporadic machine gun fire but all hell broke loose as the Humvees reached the extraction point. pic.twitter.com/TqnnqiuTUr
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
- आपल्या अखेरच्या स्टोरीत आणि ट्विट थ्रेडमध्ये दानिश सिद्दीकी यांनी जे मांडलं आहे ते त्यांनी प्रत्यक्ष त्या संघर्षाचा साक्षीदार म्हणून अनुभवलं.
Rocket propelled grenades (RPG) and other heavy weapon were used by the Taliban against the convoy resulting in the destruction of 3 Humvees. Gunners atop the Humvees swivelled wildly, aiming fire at suspected Taliban fighters who were hard to see. pic.twitter.com/tLppGPrcfL
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
- १३ जुलैलाच अफगाण-तालिबान लढाई कव्हर करताना सिद्दीकी हे अफगाण सेनेच्या गाडीत होते.
The Humvee in which I was travelling with other special forces was also targeted by at least 3 RPG rounds and other weapons. I was lucky to be safe and capture the visual of one of the rockets hitting the armour plate overhead. pic.twitter.com/wipJmmtupp
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
- त्या गाडीवर तालिबान्यांनी रॉकेटनं हल्ला केला. त्यांनी तेही टिपले आणि तो व्हीडीओही ट्विट केला.
The attack continued as Afghan Special Forces retreated after successfully carrying out the extraction. Caught in the middle of this ambush were several Afghans who were trapped while one of them was this boy. pic.twitter.com/rBm60wSUSV
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
- त्या जीवघेण्या रॉकेट हल्ल्याबद्दल सिद्दीकी यांनी लिहिले, “माझं नशिब चांगलं की मी सुरक्षित आहे. एका रॉकेटला मी आमच्या आर्मर प्लेटवर आदळताना टिपू शकलो.
Got a 15 minute break during almost 15 hours of back to back missions. pic.twitter.com/Y33vJYIUlr
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
- ११ वाजून ५३ मिनिटांनी त्यांनी त्या मालिकेतील शेवटचे ट्विट केले, Here is the full story असं लिहित त्यांनी रॉयटर वेबसाइटवरील संबधित स्टोरीची लिंक ट्विट केली. ते त्यांचं शेवटचं ट्विट ठरलं.
Here is the full story. https://t.co/g3yIl9XhsA
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात कर्तव्य बजावताना शहीद!