मुक्तपीठ टीम
हायवेवरून प्रवास करण्यासाठी कॅश किंवा फास्टॅगद्वारे सरकारला टोल भरावा लागतो. ज्यासाठी टोल बूथवर थांबावे लागते आणि काहीवेळा लांब रांग किंवा तांत्रिक समस्येमुळे ही वेळ मर्यादा आणखी वाढते. पण आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय अशी संकल्पना आणणार आहे, ज्याअंतर्गत फास्टॅगची गरज भासणार नाही आणि टोलसाठी कोणत्याही लाईनमध्ये थांबणार नाही. त्या संकल्पनेचे नाव ‘ग्रीनफिल्ड स्कीम’ असे आहे. आता रांग न लावता टोल कसा भरावा ते जाणून घेऊया…
ग्रीनफिल्ड योजना आहे तरी काय?
- ग्रीनफिल्ड योजना ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची एक योजना आहे.
- या अंतर्गत महामार्गावरून प्रवास करताना त्या किलोमीटरसाठी तेवढाच टोल भरावा लागेल.
- यासाठी हायटेक हायवे संकल्पना सुरू करण्यात येत आहे.
- तेथे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
- ही संकल्पना राजस्थानच्या ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेपासून सुरू होणार आहे.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टम म्हणजे काय?
- ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टमला ANPR म्हणतात.
- या प्रणालीअंतर्गत प्रत्येक पॉइंटवर नंबर प्लेट रीडर आणि हायटेक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
- वाहन एंट्री पॉईंटवर पोहोचताच, वाहनाची नंबर प्लेट ट्रेस केली जाईल आणि त्याचा तपशील सेंट्रल कमांड सेंटरला दिली जाईल.
- वाहन जिथून बाहेर पडते त्या ठिकाणावर वाहनाचा नंबर ट्रेस केला जाईल आणि त्या आधारावर वाहनातून कर वसूल केला जाईल.
शुल्क किती असेल?
- सध्या वाहनधारकाकडून १.१० पैसे ते १.७० पैसे प्रति किलोमीटर टोल कर आकारला जातो.
- नवीन प्रणालीनुसार अद्याप रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही.
- हे शुल्क केवळ मूळ किंमत असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शुल्क कसे भरायचे?
- ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर सिस्टम अंतर्गत, वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि त्यानंतर फास्टॅगमधूनच पैसे कापले जातील.
- पूर्वी टोल बूथवर थांबून रोख किंवा फास्टॅगमधून पैसे कापून घ्यायचे, परंतु आता ते किलोमीटरच्या आधारावर कापले जाणार.