मुक्तपीठ टीम
डोक्यावर समई घेऊन समई नृत्य. तेही केवळ काही मिनिटे नाही. तर विश्वविक्रम घडवणारे. पुन्हा परभणीसारख्या ठिकाणी. लोककलाकार मधुकर कांबळे यांची कलासाधना आहेच तशी. कोणत्याही प्रतिकुलतेमुळे न डगमगता सतत अथक फुलत राहणारी. त्यामुळे कोरोना संकटातही उपासमारीची वेळ आल्यावरही ते गप्प बसले नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला होता. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळी एक अवलिया मात्र कलेच्या माध्यमातून कोरोना रुग्ण आणि आरोग्य रक्षकांचं मन रिझवत होता. परभणीचे मधुकर कांबळे हे लोककलाकार नृत्य सादर करून बाधीत रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी धडपडत होते. आताही जेथे बोलवले जाते तेथे ते पोहचतात.
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुळगीकर यांनी रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मधुकर कांबळे यांच्या सांस्कृतिक पथकाला शहरातील कस्तुरबा गांधी आणि अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह या ठिकाणी पाठविले होते. कलावंतानी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत विविध हिंदी व मराठी गाण्यांच्या तालावर नृत्य केले. कोरोना सेंटरच्या रुग्णांनी सर्व काही विसरून नृत्याच्या कार्यक्रमातून आनंद घेतला. जे परभणी शहरात झाले तेच नंतर अनेक ठिकाणी होत आहे.
नुकताच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव केला. पण या माणसाची सुरुवात झाली ती विटभट्टी कामगार म्हणून. पण जीवनात प्रतिकुलतेचा रखरखाट असतानाही कलेचं नंदनवन फुलवणारा हा अवलिया वेगळाच!
आज जरी मधुकर कांबळे विश्वविक्रमामुळे ख्यातनाम झाले असले तरी त्यांची सुरुवात काही तेवढी चांगली नव्हती. खूपच प्रतिकुलतेशी ते लढत आले.
विश्वविक्रमी समई नृत्य
- लोक कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न घेऊन कलावंत मधुकर कांबळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली.
- तसेच कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्याची इच्छा समई नृत्य वर्ल्ड रेकॉर्ड करणारे लोक कलावंत मधुकर कांबळे यांनी व्यक्त केली असता त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तात्काळ परवानगी दिली.
- त्यानुसार शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथील कोरोना सेंटरमध्ये मधुकार कांबळे यांनी नृत्य- गितांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचे मनोरंजन करीत मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
- यावेळी रुग्णांनी टाळ्यांच्या गजरात संचाचे स्वागत केले.
- अशा परिस्थितीमध्ये घरची माणस जवळ येऊ शकत नाहीत.
- परंतु अशा वेळी मधुकर कांबळे यांनी आमच्या नृत्य गीतांच्या माध्यमातून जीवनात आनंदाची पेरणी केल्याची भावना रुग्णांनी व्यक्त केली.
- रुग्णाच्या चेहऱ्यावर फुलनारा आनंद, समाधान पाहुण कार्यक्रमाचे सार्थक झाल्याच्या भावना मधुकर कांबळे यांनी व्यक्त केली.
कोण आहेत मधुकर कांबळे?
- परभणी येथील समईनृत्यसम्राट कलाकार मधुकर कांबळे आपल्या समईनृत्य कलेमुळे संपूर्ण महाराष्ट्र कलाक्षेत्रात ओळखले जात आहेत.
- या अगोदर या कलाकाराला अनेक राज्यस्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
- त्यांनी परभणीमध्ये समईनृत्याचा विश्वविक्रम केला आहे.
- यासाठी ‘वर्ल्ड रेकॉर्ड आफ इंडिया’ची टीम परभणीला आली होती.
- परभणी शहरातील मधुकर कांबळे यांना कलेची आवड तशी लहानपणापासूनच होती.
- शालेय वयात शाळेत होणाऱ्या कार्यक्रमांमधून ते आपली कला सादर करत असत.
- त्यानंतर गणेशोत्सव, दुर्गा महोत्सवातही ते आजवर कला सादर करतात.
विटभट्टीत तापले, कलेत चमकले!
- मधुकर काबळेंनी अनेक वर्षे विटभट्टी कामगार म्हणून काम केले
मधुकर यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. - त्यांचे मुळ गाव हे जिंतूर तालुक्यातील बोरी.
- बोरी येथे त्यांच्या कुटुंबाला म्हणावे तसे काम मिळायचे नाही.
- त्यामुळे कामासाठी त्यांच्या कुटुंबाने परभणी शहर गाठले.
- या ठिकाणीही जगण्यासाठी धडपड सुरुच होती . त्यासाठी मिळेल ते काम सर्वजण करायचे.
- मधुकर यांनी अनेक वर्षे विटभट्टी कामगार म्हणूनही काम केले.
- परंतु त्यांच्यातील कलावंत मात्र सदैव जिवंतच होता. त्यानंतर त्यांनी आपल्या कलेलाच कुटुंबाच्या उपजिविकेचे साधन बनवले.
- २००४ मध्ये एका कार्यक्रमात नृत्य करत असताना आनंद लोकनाट्य मंडळाचे मालक हेमंत महाजन यांनी त्यांना पाहिले आणि लोकनाट्य मंडव्यत काम करण्याची करण्याची संधी दिली.
- त्यानंतर मधुकर कांबळे यांनी महाराष्ट्रभर अनेक लोकनाट्य, तमाशा फडांमध्ये अनेक कामे केली.
पाहा व्हिडीओ: