मुक्तपीठ टीम
पाकिस्तानने अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या शाहिन-३या बॅलिस्टिक मिसाइल म्हणजेच क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, असा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात यशस्वी झालेली चाचणी पाकिस्तानातीलच लोकाना लक्ष्य करणारी ठरली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांपासून एकमेकांचे अभिनंदन आणि स्तुती करणाऱ्यांचे थोबाडं पाहण्यासारखी झाली आहेत.
जे झालं ते पाकिस्तानच्या नेहमीच्या फजितीच्या परंपरेला साजेसेच आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा मित्र मलेशियाने त्यांचे विमान भाडे न भरल्याने जप्त केले. त्यानंतर पाकिस्तानला इस्लामिक देशांकडून निधी गोळा करण्यासाठी काही मोठं केल्याचे दाखवायचे असावे. त्यामुळेच घाईगडबडीत शाहीनची चाचणी घेण्यात आली. थेट भारतातील चेन्नईपर्यंतच्या भागाला लक्ष्य करण्याचे दावेही करण्यात आले. आता मात्र, जे कळलं ते हसावं असंच आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाली असून ते पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये कोसळले आहे. त्यामुळे बरेच पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानवर नेहमीच बलुचिस्तानला सावत्रपणे वागणून दिल्याचे आरोप होत असतात. आताही जाणीवपूर्वक सदोष चाचणी करून बलुचींना धोक्यात टाकल्याचा आरोप होत आहे.
बलुची नेत्यांनी टरकावला यशाचा बुरखा
बलुचिस्तानाचे रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते शेर मोहम्मद बुगती यांनी ट्विट करून या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Pakistan fired the Shaheen-3 missile which was landed on civilian areas of Dera Bugti’s Matt region.
Caused heavy damage to civilians & their property.Baloch doesn’t matter to Pakistan & they’ve always used the land of #Balochistan as a laboratory.#MissileAttackinDeraBugti pic.twitter.com/uJgxU8eSci
— Mujaid Alam Bakarwal🇮🇳 (@alam_mujaid) January 21, 2021
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ बलुचिस्तान प्रयोगशाळा नाही. नागरिकांवर घेण्यात आलेल्या या क्षेपणास्त्र चाचणीबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तान सैन्याविरूद्ध आवाज उठवावा असे आवाहन केले. या घटनेत पाच जण जखमी झाले असून यात दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे, असा दावा बुगती यांनी स्थानिकांच्या सांगण्यावरुन केला आहे. यात अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.”
शाहीन आहे तरी काय?
पाकिस्तानने शाहीन-३ या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे घेऊन जाण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे. हे क्षेपणास्त्र २,७५० अंतरावर लक्ष्य करु शकते. म्हणजेच भारतात चेन्नईपर्यंतचे क्षेत्र लक्ष्य करण्यासाठी हे पुरेसे आहे. यशस्वी चाचणीनंतर पाकिस्तानचे राष्ट्रपति आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले होते.
सर्वाधिक क्षमतेच्या क्षेपणास्त्राचा दावा
हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणार्या पाकिस्तानची घन-इंधनयुक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. त्याची पहिली चाचणी २०१५ मध्ये झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये सर्व क्षेपणास्त्र प्रणालीपैकी या क्षेपणास्त्राची क्षमता सर्वाधिक आहे. यापूर्वी चाचणी केलेली शाहीन-१ या क्षेपणास्त्राची ९०० किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होता. तर शाहीन-२ हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रांसह १५०० किलोमीटर दूर मारा करु शकतो.