मुक्तपीठ टीम
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या सूर्यदत्त नॅशनल स्कूल आणि सूर्यदत्त फिटनेस अँड स्पोर्ट्स अकादमीच्या संयुक्त विद्यमाने मेगा आंतरराज्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ९६ शाळांतील ५०० विदयार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. ही स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली.
स्पर्धेकरीता ग्रँड मास्टर अभिजित कुंटे, राजेंद्र कोंडे, बुद्धिबळपटू आणि सचिव पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळ, सत्येन पटेल कार्यकारी संचालक सह्याद्री इंडस्ट्रिज व अध्यक्ष लक्ष्य अकॅडेमि, नितीन शेणवी मुख्य पंच, श्रीमती जुइली कुलकर्णी सहायक पंच, व्यावसायिक आणि उत्साही बुद्धिबळपटू अंकित नवलखा, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष व अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन, सुषमा एस. चोरडिया, उपाध्यक्षा, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन, स्नेहल नवलखा, सहयोगी उपाध्यक्षा, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, श्रीमती शीला ओक, मुख्याध्यापिका, सूर्यदत्त नॅशनल स्कूल उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल मान्यवरांनी सर्वांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. विविध शाळांचे विद्यार्थी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करताना आनंदित झाले होते. त्यांचा उत्साह आणि क्रीडा भावनेचे साक्षीदार होणे, हे आश्चर्यकारक होते. संस्थेचा बन्सीरत्न हॉल, बावधन येथे हा कार्यक्रम पार पडला.
सूर्यदत्त नॅशनल स्कूल (SNS) बावधन येथे आहे. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या शाळेचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणातील उत्कृष्टता केंद्र बनण्याचे उद्दिष्ट आहे, इथे लहान वयातच मुलांच्या सर्वांगीण विकासाची बीजे पेरली जातात. २०१६ मध्ये, SNS ला त्यांच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सामर्थ्य आणि क्षमता अधोरेखित करून, “पुण्यातील प्रीमियर आगामी CBSE शाळा” चा दर्जा देण्यात आला. व्यवस्थापन च्या वतीने दरवर्षी विदयार्थ्यांच्या बौद्धिक आणि क्रियाशील विकासासाठी असे उपक्रम आयोजित केले जातात. या स्पर्धेत ७ फेऱ्या झाल्या आणि ही स्पर्धा स्विस लीग फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. श्री नितीन शेणवी यांनी मुख्य पंच म्हणून तर श्रीमती जुइली कुलकर्णी यांनी सहाहयक पंच म्हणून कामगिरी पार पाडली .
ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले यश आणि अपयश खेळाच्या दोन बाजू आहेत. अपयशाला न घाबरता, न डगमगता यशासाठी प्रयत्नशील रहा. कोणताही खेळ असो खेळताना अपयश येईल. त्यातून शिका. प्रयत्न करत रहा. उत्तुंग यश मिळविण्याचा प्रयत्न करा. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्वच पातळीवर विजयाचा झेंडा फडकवा.
प्रा. डॉ संजय बी चोरडिया म्हणाले, बुद्धिबळ खेळण्याने मानसिक एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते, वाचन आणि गणित कौशल्ये वाढतात, तर्कबुद्धी, टीकात्मक विचार आणि सर्जनशीलता वाढते. सकारात्मक विचार, शिस्तप्रियता, वेळेचे नियोजन, मानसिक आनंद यासारख्या बाबी वाढीस लागतात. बुद्धिबळात लक्ष, दृढनिश्चय आणि सरावाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त किमान एका खेळाचा सराव करावा. तसेच खेळाडूंनी बुद्धिबळ खेळताना दाखविलेली उत्कटता आणि उत्तुंगता शैक्षणिक क्षेत्रात दाखविण्याचे आवाहन त्यांनी केले. यातूनच पुढे नवीन ग्रँड मास्टर्स तयार होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती स्नेहल नवलखा, सहयोगी उपाध्यक्षा , सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट म्हणाल्या की, सूर्यदत्त नॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक वाढीसाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करते. हे उद्दिष्ट साध्य करण्यात खेळाची भूमिका खूप महत्त्वाची आहे बुद्धिबळ खेळल्याने समस्या सोडवणे, निर्णय घेणे, गंभीर विचार करणे, नियोजन करणे आणि सर्जनशील विचार करणे देखील सुधारते. बुद्धिबळ प्रशिक्षण आणि सराव सामान्य संज्ञानात्मक क्षमता आणि शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास देखील मदत करतात.शाळेत बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग ही चालवले जातात.
श्रीमती शीला ओक, मुख्याध्यापिका, सूर्यदत्त नॅशनल स्कूल यांनी नमूद केले की उत्कृष्टतेच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या विकासाला गती देण्याच्या प्रयत्नात SNS ने आपल्या शिक्षणाच्या मुख्य क्षेत्राव्यतिरिक्त इतर अनेक आघाड्यांवर काम केले आहे. नेतृत्व कार्यक्रम, कम्युनिटी आउटरीच, डिझाइन आणि इनोव्हेशन आणि संघ व क्रीडा विकास हे आमच्या खास क्षेत्रांपैकी आहेत.
प्रा. डॉ. संजय बी चोरडिया, संस्थापक अध्यक्ष व अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि श्रीमती सुषमा एस चोरडिया, उपाध्यक्षा, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
बक्षीस वितरण समारंभात स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री राजेंद्र कोंडे, बुद्धिबळपटू आणि सचिव पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळ, ग्रँड मास्टर श्री अभिजित कुंटे, श्री सत्येन पटेल कार्यकारी संचालक सह्याद्री इंडस्ट्रिज व अध्यक्ष लक्ष्य अकॅडेमी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते विजेत्यांना व सहभागी विदयार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
गट व विजेते खालील प्रमाणे :
७ वर्षांखालील गटातील विजेते :
- १ ) तीर्थ कोद्रे
- २) विराट धनंजय दोडके
- ३) शाल्वी सचिन चासकर
१० वर्षाखालील गटातील विजेते :
- १) कवीश लिमये
- २) गर्व देवनानी
- ३) ऐरव निलेश कामत
१५ वर्षांखालील गटातील विजेते :
- १) श्लोक शरणार्थी
- २) अक्षय बोरगावकर
- ३) आर्यन विजय गोडबोले
२० वर्षांखालील गटात विजेते :
- १) विरेश शरणार्थी
- २) यश वाठारकर
- ३) ओम नागनाथ लंकाने
सेंट विन्सन्ट हाय स्कुल, बाळ शिक्षण मंदिर इंग्लिश मेडीयम स्कुल, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, सेंट मेरीज स्कुल, सिटी इंटरनॅशनल स्कुल ,एअर फोर्स स्कूल अशा नामांकित शाळातून विदयार्थी आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५१०००/- रुपयांची रोख पारितोषिके ,सुवर्ण ट्रॉफी , प्रशस्तीपत्र देण्यात आली . सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र आणि मेमेंटो दिली गेली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
- १) १६ ते २० वयोगटातील विजेत्यांसह जुईली कुलकर्णी, नितीन शेणवी, सुषमा चोरडिया, राजेंद्र कोंडे, अभिजित कुंटे, प्रा. डॉ. संजय चोरडिया व स्नेहल नवलखा आदी उपस्थित
- २) ७ वर्षाखालील वयोगटातील विजेत्यांसह जुईली कुलकर्णी, नितीन शेणवी, सुषमा चोरडिया, राजेंद्र कोंडे, अभिजित कुंटे, प्रा. डॉ. संजय चोरडिया व स्नेहल नवलखा आदी उपस्थित
- ३) १० वर्षाखालील वयोगटातील विजेत्यांसह जुईली कुलकर्णी, नितीन शेणवी, सुषमा चोरडिया, राजेंद्र कोंडे, अभिजित कुंटे, प्रा. डॉ. संजय चोरडिया व स्नेहल नवलखा आदी उपस्थित
- ४) विजेत्यांसह जुईली कुलकर्णी, नितीन शेणवी, सुषमा चोरडिया, राजेंद्र कोंडे, अभिजित कुंटे, प्रा. डॉ. संजय चोरडिया व स्नेहल नवलखा आदी उपस्थित
- ५) बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.