Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

जगभरात मंकीपॉक्सचा वाढता धोका, सरकारनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

June 1, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Government of india

मुक्तपीठ टीम

परदेशात मंकीपॉक्सचा संसर्ग वाढत आहे. मांकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता, भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आत्तापर्यंत भारतात या आजाराचे एकही रूग्ण समोर आलेले नाही. असे असतानाही खबरदारीच्या पातळीवर सरकारला दुर्लक्ष नको आहे. यामुळेच या आजाराबद्दल किंवा त्याच्या लक्षणांबद्दल कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

मंकीपॉक्स संसर्गाची प्रयोगशाळेच्या चाचणीनंतरच पुष्टी केली जाईल

  • एखादा रूग्ण आढळल्यास प्रयोगशाळेमध्ये चाचणी केल्यानंतरच मंकीपॉक्स या संसर्गाची पुष्टी करण्यात येणार.
  • यासाठी केवळ पीसीआर किंवा डीएनए चाचणीची पद्धत वापरली जाणार आहे.
  • संशयित प्रकरण आढळल्यास, त्याचा नमुना राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये बनवलेल्या आयसीएमआर-एनआयव्हीच्या प्रयोगशाळेत पाठविला जाईल.
  • मंकीपॉक्समुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महामारीविज्ञान अंतर्गत सर्व व्यवस्था करणे आवश्यक आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काळजी आणि नवीन प्रकरणांची जलद ओळख यावरही भर देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गाचा प्रसार थांबवावा लागेल. यासोबतच संसर्ग रोखण्याच्या आणि नियंत्रित करण्याच्या पद्धतीही तपशीलवार सांगितल्या आहेत. घरीच संसर्ग रोखणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे, किंवा रूग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवणे आणि रुग्णवाहिकेत बदली करण्याच्या धोरणाबाबतही माहिती देण्यात आली आहे. यासोबतच आयसोलेशनमध्ये कोणती खबरदारी घ्यावी हे देखील सांगण्यात आले आहे.

मंकीपॉक्स लक्षणांबाबत खबरदारी

  • मांकीपॉक्स संसर्गाने पीडित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या लक्षणांवर २१ दिवस सतत लक्ष ठेवले पाहिजे.
  • याशिवाय अशा आजारी व्यक्तीची कोणतीही वस्तू वापरणे टाळावे, यासाठी लोकांना जागरूक करण्यावरही भर देण्यात आला आहे.
  • तसेच, जर या आजाराने ग्रस्त व्यक्ती आयसोलेसनमध्ये असेल, तर त्याची काळजी घेताना हातांची स्वच्छता घ्यावी.
  • याशिवाय, योग्य पीपीई किट घालण्याची गरज आहे.

Tags: good newsgovernmentguidelinesIndian Ministry of Health and Family WelfareMonkeypoxmuktpeethचांगली बातमीभारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयमंकीपॉक्समार्गदर्शक सूचनामुक्तपीठसरकार
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE एसटी महामंडळ अमृत महोत्सव | विद्युत बसेसचा लोकार्पण सोहळा I मुख्यमंत्री ठाकरे LIVE

Next Post

घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत गिरणी कामगारांना देण्याची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची सूचना

Next Post
Neelam Gorhe Meeting with All Workers Union" of Sub Mill Workers

घरांची देकारपत्रे १५ जूनपर्यंत गिरणी कामगारांना देण्याची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!