मुक्तपीठ टीम
ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात वेगवेगळे संभ्रम पसरत आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये एक तर टोकाची भीती, नाही तर टोकाची बेफिकिरी अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे त्याविषयी वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळालेली महत्वाची माहिती मांडत आहोत. त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो लसीकरणाचा. लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोक या परिस्थितीतही अधिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यासाठी असा कोणताही संसर्ग हा जीवघेणा ठरण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
ओमायक्रॉन व्हेरियंटसंबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
१. ओमायक्रॉन व्हेरियंटवर लस प्रभावी ठरणार का?
- लस प्रभावी ठरणार नाही याचा कोणताही पुरावा नाही.
- तसेच, विषाणूच्या स्पाइक जनुकामध्ये काही उत्परिवर्तन झाल्यामुळे, लसीचा प्रभाव कमी असल्याचे समोर आले आहे.
- तरीही ज्यांना लस मिळाली आहे ते जास्त सुरक्षित आहेत. जर एखाद्या नागरिकाचे लसीकरण झाले नसेल किंवा डोस शिल्लक असेल तर नक्की घ्या.
२. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का?
- ओमायक्रॉनची उत्पत्ती दक्षिण आफ्रिकेतून झाली आहे. परंतु ती अनेक देशांमध्ये पसरत आहे.
- याची लक्षणे असल्याने ते इतर अनेक देशांमध्ये पसरू शकते.
- परंतु, अजूनही या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आणि पातळी स्पष्ट झालेली नाही.
- दुसरीकडे, डेल्टा प्रकार भारतात व्यापक असल्याने आणि लसीकरण वेगाने होत असल्याने, असा अंदाज आहे की याचा प्रभाव कमी राहील.
- अधिक वैज्ञानिक पुरावे समोर येत असल्याचे सांगत मंत्रालयाने या अंदाजात ‘पण’ जोडले आहे.
३. सध्याची चाचणी ओमायक्रॉनला ओळखू शकेल का?
- आरटीपीसीआर ही कोरोनासाठी सर्वात शक्तिशाली चाचणी पद्धत आहे.
- हे विषाणूचे स्पाइक (एस), एन्कॅप्स्युलेटेड (ई) आणि न्यूक्लियोटाइड (ई) यांसारखी जीन्स कॅप्चर करून संसर्गाची पुष्टी करते.
- तसेच, ओमायक्रॉनच्या एस जनुकात लक्षणीय बदल झाले आहेत.
- यामुळे काही प्रकरणांमध्ये संसर्ग ओळखणे कठीण होऊ शकते. तसेच, ओमायक्रॉनची पुष्टी करण्यासाठी जनुकांचे अनुक्रमण सुरू आहे.
४. बचावासाठी काय करावे?
- मास्क वापरणे, जर लस किंवा डोस शिल्लक असेल तर तो नक्की घ्याच.
- सोशल डिस्ट्नसिंगचे पालन करा आणि खोल्या किंवा कार्यालय हवेशीर ठेवा.
- सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, सतत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत, त्यावर लक्ष ठेवा.
- सोशल मीडियावरील व्हायरल माहिती तपासूनच विश्वास ठेवा.