मुक्तपीठ टीम
देशातील सर्व भागातून टोलनाके हटवले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुढील एक वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवून, जीपीएसच्या आधाराने टोलवसुली प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
टोलनाके नसणार तर पैसे वजा कसे केले जातील असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर सरकारच्या योजनेनुसार वाहने जेवढी धावतील त्याआधारे वाहनधारकांना टोलचे पैसे मोजावे लागतील. तसेच टोलची रक्कम थेट आपल्या बँक खात्यातून जीपीएसच्या मदतीने वजा केली जातील. तसेच नवीन कंपन्यांची वाहने आता ट्रॅकिंग सिस्टमसह येत आहेत. परंतु जुन्या वाहनांचे काय? तर जुन्या वाहनांमध्येही जीपीएस तंत्रज्ञान बसविण्याची सरकारची योजना आहे. सर्व वाहनांमध्ये ही यंत्रणा बसविली जाणार आहे.
जितका प्रवास तितका टोल
• थेट खात्यातून पैसे वजा केले जातील.
• टोलनाका हटवले जातील पण टोल भरावा लागेल.
• एंट्री पॉइंटवर एक कॅमेरा असेल आणि जीपीएसद्वारे आपण जिथे प्रवेश केला तेथून नोंद सुरु केली जाईल आणि जिथे जात आहोत तिथे टोलचे पैसे वजा केले जातील.
• सद्यस्थितीत, आपल्याला एका टोलकडून दुसर्या टोलकडे जाणासाठी जितकी रक्कम ठरवीली आहे तितकी रक्कम द्यावी लागते.
• परंतु नवीन प्रणालीनंतर, आपण वाहन जितके चालवणार आहोत तितकेच पैसे द्यावे लागतील.
• हे पैसे तुमच्या खात्यातून थेट वजा केले जातील.
• ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम जीपीएसची ही प्रणाली सरकारकडून निवडण्यात आली आहे आणि टोल लिंक बँक खात्यातून आपोआप वजा केली जाईल.
फास्टॅगमुळे होत आहे फायदा
• टोलनाक्यावर टोलवसुली सुलभ व सुरक्षित करण्यासाठी तसेच लांबलचक वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग अनिर्वाय केला आहे.
• सध्या फास्टॅग नसलेल्या कारला दुप्पट टोल भरावा लागत आहे.
• या वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
• तसेच सरकारचा विश्वास आहे की, यामुळे लांबलचक वाहनांच्या रांगेत उभे न राहावे लागल्याने वाहनधारकांना दिलासा मिळेल. तसेच प्रदूषणाची पातळीही कमी होईल.
• फास्टॅग लावल्यानंतर रोख रक्कम देण्याची गरज नाही.
• फास्टॅगच्या वापरानंतर कॅशलेस व्यवहारास चालना मिळाली आहे.
• तसेच यामुळे टोलवरील चोरीही कमी झाली आहे.
पाहा व्हिडीओ: