मुक्तपीठ टीम
भारतात सध्या संसर्ग पसरवत असलेला कोरोना विषाणूचे नेमके कोणते स्ट्रेन आहेत, ते ओळखण्यात उशीर होत आहे. त्यामुळे धोका जास्त वाढत आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी झालेल्या चर्चेत राजेश टोपे यांनी याबद्दल काहीही कळवले जात नसल्याकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने पाठवले जातात, पण नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल त्याबद्दल काहीच कळवत नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दात बजावले. जर स्ट्रेनबद्दल कळवले गेले तर उपचाराची पद्धत बदलता येईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतात एक लाख १५ हजार रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाच्या देशातील एकूण रुग्णांची संख्या १ कोटी २८ लाखांवर पोहचली आहे. आता भारतापेक्षा जास्त कोरोनाबाधित फक्त ब्राझिल आणि अमेरिका हे दोनच देश आहेत. सध्या पंजाबातील ८० टक्के कोरोना संसर्ग हा ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेनचा असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचे नेमके कोणते स्ट्रेन हे लवकर ओळखणे आवश्यक मानले आहे.
काही तज्ज्ञांच्या मते भारतात वेगाने पसरत असलेला कोरोना हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्ट्रेनमुळे पसरत असण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, सध्या भारतात फक्त कोरोना पॉझिटिव्ह नमुण्यांपैकी फक्त एक टक्का नमुनेच स्ट्रेनच्या जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले जातात. तुलना करता ब्रिटनमध्ये ८ टक्के नमुने तपासले जातात. गेल्या आठवड्यात ३३ टक्के नमुण्यांचे जीनोम सिक्वेसिंग केले गेले.
डॉ. राजेश टोपेंनी मांडली स्ट्रेनबद्दलही कळवले जात नसल्याची तक्रार
अलिकडे काही नवी माहिती समोर येत आहे. आज जी लोक होम आयसोलेशनमध्ये असतात. घरीच असतात. अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. ते अचानक वाईट अवस्थेत रुग्णालयात येतात. आम्हाला एक शंका आहे. स्ट्रेन बदललेत का? काही म्युटेशन आहे का? आपण साऊथ आफ्रिकेचे आहेत, ब्राझिलचे आहेत, युकेच आहेत. आम्ही नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलला जेवढे स्ट्रेन नमुने पाठवले आहेत. त्याबद्दल आम्हाला काही पत्रव्यवहार नाही. आम्ही टेक्निकल लोक नाहीत. तुम्हाला सांगावं लागेल. एनसीडीसीने कळवले पाहिजे की स्ट्रेन कोणता आहे. त्यानुसार आम्हाला इलाजाची पद्धत बदलता येईल.”