मुक्तपीठ टीम
भारतीय लष्करासाठी एक नवा मार्ग सुरू होत आहे. भारत सरकार भारतीय लष्करातील भरतीसाठी नवीन प्रक्रिया आणण्याची योजना आखत आहे. ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी तरुणांची लष्करात भरती होणार आहे. पंतप्रधान मोदी याबाबत घोषणा करतील.
या योजनेसंदर्भात तिन्ही दलांचे प्रमुख संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लष्कराशी संबंधित महत्त्वाकांक्षी योजना समोर येण्याची शक्यता आहे. तिन्ही सेवांमध्ये सुधारणा ‘टूर ऑफ ड्यूटी’ जाहीर केली जाईल.
‘टूर ऑफ ड्युटी’ योजना काय आहे?
- आता चार वर्षांची कंत्राटी सेवा संपल्यानंतर १००% सैनिकांना कार्यमुक्त केले जाईल.
- त्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीनंतर, त्यातील २५ टक्के सैनिकांना परत बोलावून पुन्हा सैनिक म्हणून दाखल केले जाईल.
टूर ऑफ ड्यूटी/ अग्निपथ योजनेविषयी सविस्तर माहिती..
- टूर ऑफ ड्यूटी/ अग्निपथ योजनेअंतर्गत, लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन सेवांमध्ये भरतीच्या नवीन योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
- ज्या अंतर्गत १०० टक्के भरती झालेल्या सैनिकांना चार वर्षांनी सेवेतून मुक्त केले जाईल आणि त्यानंतर २५ टक्के सैन्यांना पूर्ण सेवेसाठी पुन्हा भरती केले जाईल.
यापूर्वीच्या प्रस्तावानुसार तीन वर्षांच्या सेवेनंतर काही टक्के सैनिकांना कार्यमुक्त करण्याची चर्चा होती. याशिवाय उर्वरित सैनिकांना पाच वर्षांनी सेवेतून कार्यमुक्त करण्याची चर्चा होती. यानंतर २५ टक्के सैन्यांना पूर्ण सेवेसाठी पुन्हा भरती केले जाईल अशी चर्चा होती.
सैन्यात भरतीसाठी नवीन योजना आखली आहे. सरकार नव्या ‘टूर ऑफ ड्युटी’ योजनेची घोषणा करणार आहे. त्याला ‘अग्निपथ’ असे नाव देण्यात आले आहे. नव्या योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना ‘अग्नवीर’ म्हटले जाईल. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत सैनिकांची भरती १० ते ४ वर्षांसाठी असेल. चार वर्षे पूर्ण झाल्यानंर त्यांना १० लाख रुपये करमुक्त होतील. अग्निवीरांना त्यांच्या सेवेबद्दल प्रमाणपत्र आणि पदविकाही देण्यात येणार आहेत.
अग्निवीर भरतीसाठी मर्यादा काय असणार?
- १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील.
- भरतीतील उर्वरित पात्रता आताच्या प्रमाणेच राहतील. त्यात कोणताही बदल अपेक्षित नाही.
- भरती झालेल्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
- उर्वरित ३.५ वर्षे ते सेवेत असतील. सध्या एका सैनिकाचे कार्य १७ ते २० वर्षे आहे.
- चार वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यापैकी २५ टक्के जवानांना महिनाभरानंतर पुन्हा सैन्यात सामावून घेतले जाईल.
‘अग्निवीरांना’ विमा मिळणार का?
चार वर्षांच्या सेवेदरम्यान एखाद्या अग्नीवीराचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू झाल्यास, विम्याची रक्कम कुटुंबाला दिली जाईल. ही रक्कम ४८ लाख रुपये असेल. याशिवाय उर्वरित सेवेचा पगारही नामनिर्देशित व्यक्तीला दिला जाईल. सेवेच्या कालावधीत अपंगत्व किंवा शारीरिक अक्षमता आढळल्यास, जवानाला एक वेळची आर्थिक मदत दिली जाईल.