मुक्तपीठ टीम
२०१९ मध्ये नेरळ-माथेरान सेक्शनवर २० हून अधिक ठिकाणी झालेला अभूतपूर्व पाऊस आणि नुकसानीनंतर मध्य रेल्वेने या मार्गावर ट्रॅक आणि राइड सुधारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांची कामे हातावेगळी केल्यामुळे नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी ‘टॉय ट्रेन’ शनिवारी, २२ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. पर्यटकांसाठी माथेरान टेकड्यांचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी कुरुडवाडी कार्यशाळेने २०१९ मध्ये ‘विस्टाडोम कोच इन हाऊस’ विकसित केला आहे.
मध्य रेल्वे नॅरो गेजच्या विभागासाठी नवीन डिझाईन‘ डेमू’ प्रकारच्या सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेनसाठी ‘आयसीफ’सोबत चर्चा करत आहे. या विभागावर सलून बुक करण्याबाबतही विचार केला जात आहे. सेक्शनमध्ये चांगल्या राइडसाठी सुधारित ‘डीएचएम’ (दार्जिलिंग हिमालयन रेल्वे) ट्रॉली आणि ड्राफ्ट गियर व्यवस्थेसह डब्यांची नवीन रचना मिळविण्याचीही म. रेल्वेची योजना आहे.
रुळाच्या एका बाजूला डोंगर आणि दुस-या बाजूला खोल दरी यामुळे खडतर प्रदेश असूनही ट्रॅक मजबूत करण्यासाठी आवश्यक स्लीपर आणि इतर साहित्य हलवण्याचे अवघड काम मध्य रेल्वेने पार पाडले. रेल्वेच्या कर्मचा-यांनी पाळ्यांमध्ये रात्रभर काम केले आणि तटबंदी मजबूत केली. ट्रॅकच्या खाली रिटेनिंग वॉल, गॅबियन प्रोटेक्शन आणि स्टोन पिचिंगचे ग्राउटिंग, ट्रॅकच्या बाजूला क्रॅश प्रतिबंधक बॅरियर, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बाजूच्या नाल्यांची, अतिरिक्त बॉक्स ब्रिज आणि पाईप ब्रीजची तरतूद केली.
आतापर्यंत २० किमीच्या १४ किमीचे जुने स्टील स्लीपर कॉंक्रिट स्लीपरने बदलले आहेत. सध्याच्या पुलांच्या मजबुतीकरणासोबतच ३० नवीन पूल बांधण्यात आले आहेत. २ किमी बाजूचा नाला बांधल्यामुळे आता पावसाचे पाणी रुळावरून वाहून जाण्याऐवजी प्रवाहित होण्यास मदत होईल. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी या विभागाची पाहणी करुन विविध कामांचा आढावा घेतला.
नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा
- नेरळ-माथेरान डाऊन गाड्या : (दररोज) ५२१०३ नेरळ ०८.५० वा. निघून माथेरानला ११.३० वा. पोहोचेल. ५२१०५ नेरळला दु. १४,२० वाजता निघून माथेरानला सायं. ५ वा. पोहोचेल.
- माथेरान – नेरळ अप गाड्या (दररोज) : ५२१०४ माथेरान १४.४५ वाजता निघून नेरळला १७.३० वाजता पोहोचेल. ५२१०६ माथेरानहून १६.२० वाजता निघून नेरळला रात्री १९ वाजता पोहोचेल.
- ५२१०३/ ५२१०४ ३ द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावेल. ५२१०५/५२१०६ ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावेल.
(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)
५२१५३ अमन लॉज. ०८.४५ वा. निघून माथेरानला ०९.०३ वा., ५२१५५ अमन लॉज १०.४५ वा.सुटून माथेरानला ११.०३ वा, ५२१५७ अमन लॉज 12 वाजता सुटून माथेरानला १२.१८, ५२१५९ अमन लॉजहून 14.05 वा. सुटून माथेरानला दु. १४.२३ वा., ५२१६१ अमन लॉजहून १५.४० वा. सुटून माथेरानला १५.५८ वा., ५२१६३ अमन लॉज १७.४५ वा. निघून माथेरानला सायं. १८.०३ वाजता पोहोचेल.
माथेरान – अमन लॉज शटल सेवा
५२१५४ माथेरान ८.२० वा, सुटून अमन लॉजला 08.38 वा., ५२१५६ माथेरान १०.२० वा. सुटून अमन लॉज १०.३८ वा., ५२१५८माथेरानहून ११.३५ वा.निघून अमन लॉज ११.५३ वा., ५२१६० माथेरानहून दुपारी १३.४० वा. निघून अमन लॉज १३.५८ वा., ५२१६२ माथेरानहून दु. १५.१५ वा. निघून अमन लॉजला दु. १५.३३ वा. आणि ५२१६४ माथेरानहून सायं. १७.२० वा. निघून अमन लॉज येथे सायंकाळी 17.38 वाजता पोहोचेल.
सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील. ठाणे जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी ह्यू मॅलेट यांनी १८५० मध्ये शोधून काढलेले माथेरान तेव्हापासून निसर्गप्रेमींसाठी आनंदाचे ठिकाण आहे. माथेरान म्हणजे ‘माथ्यावरचे जंगल’ म्हणजे ८०० मीटर उंचीवर निस्तेजपणे पसरलेली, सावलीच्या झाडांनी लपलेली एक लहरी टेकडी आहे. रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली झाली.