मुक्तपीठ टीम
भारतीय सेना एनसीसी विशेष भरती मोहीम राबवत आहे. सैन्याने एनसीसी प्रमाणमपत्र धारकांकडून भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार असून २८ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
एनसीसी विशेष प्रवेश योजनेच्या ४९ व्या अभ्यासक्रमासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले आहेत. एनसीसी प्रमाणपत्रधारक उमेदवारांची भारतीय सैन्यात अधिकारी पदासाठी निवड केली जाऊ शकते
या पदांवर अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना कमीतकमी बी-ग्रेडसह एनसीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच किमान ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेणे बंधनकारक आहे. एनसीसी प्रमाणपत्र पदवी अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवार २८ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता. तसेच भारतीय लष्कराच्या joinindianarmy.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
प्रशिक्षण दरम्यान उमेदवारांना दरमहा ५६,१०० रुपये पगार देण्यात येईल. त्याचप्रमाणे कमिशन मिळवून लेफ्टनंटच्या पदावर पोहोचल्यावर ५६,१०० ते १,७७,५०० पर्यंत असेल. प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना लेफ्टनंटच्या पदावर शॉर्ट सर्व्हिस कमिशन देण्यात येईल. यानंतर, सेवा पूर्ण होताच त्यांना पदोन्नती मिळेल.
पाहा व्हिडीओ: