Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

वॉटरटॅक्सी आणि रोपॅक्स-फेरी सेवा आता मुंबईच्या वाहतुकीचा भाग बनणार

April 10, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
watertaxi

मुक्तपीठ टीम

मुंबई शहराच्या रस्त्यांवर अति झालेले वाहतूकीचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक जलवाहतुकीचा पर्याय निवडला आहे. कोणत्याही जास्त पायाभूत सुविधा आवश्यक नसणाऱ्या जलवाहतुकीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा नक्कीच मिळेल. पर्यावरण स्नेही जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी रोपॅक्स फेरी सेवेचे चार नवे मार्ग तसेच वॉटर टॅक्सीचे बारा नवे मार्ग यावर्षी डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याची योजना आहे.

सध्या भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) या व्यवस्थित सुरू असलेल्या रोपॅक्स सेवेमुळे रस्ते मार्गाने होणारा एकशे दहा किलोमीटरचा प्रवास जलमार्गाने १८ किलोमीटर एवढा कमी झाला आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांचा दररोजचा तीन ते चार तासाचा प्रवासाचा वेळही एक तासापर्यंत कमी झाला आहे. या फेरी सेवेचे प्रचंड फायदे बघता मुंबईतील विविध मार्गांवर अशाच प्रकारच्या सेवा कार्यान्वित करण्याची योजना आहे.

मुंबईसाठीच्या शहरी जलमार्ग वाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी एक बैठक घेतली.  मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मुंबई पोर्टचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाचे अधिकारी तसेच इतर संबंधीत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीतच जलवाहतुकीसाठी डिसेंबरचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.

 

Origin Destination Distance by Waterways

( Time)

Distance by Road

( Time)

ROPAX Terminal

(Ferry wharf)

Nerul

(CIDCO)

24 km

(1 hour)

34 Km

(1.25 Hour)

ROPAX Terminal

(Ferry wharf)

Kashid

(MMB)

60 km

(2hrs)

134 Km

(3hrs 30 mins)

ROPAX Terminal

(Ferry wharf)

Mora

(MMB)

10 Km

(30mins)

60 Km

(1hr 30mins)

Karanja Rewas

(MMB)

3 Km

(15mins)

70 Km

(1hr 30mins)

 

Origin Destination Distance by Waterways

( Time) Max @30kms

Distance by Road

( Time)

Min Time

Domestic Cruise Terminal (DCT) Nerul 19 km

(40 mins)

34 km

(1hr 15 min)

DCT Belapur 20 km

(45mins)

40 km

(1 hr)

DCT Vashi 23 km

( 40 mins)

28 km

(40 mins)

DCT Airoli 34 km

( 1hr 15mins)

34 km

(1hr 15 min)

DCT Rewas

(Ready)

18 Km

(1hr 15 min)

110 km

(2hr 45 min)

DCT Karanja

(Ready)

  1. Km

( 1hr 15mins)

70 km

(2 hrs)

DCT Dharamtar

(Ready)

40 km

(1hr30mins)

83 km

(2hr15 mins)

Domestic Cruise Terminal (DCT) KanhojiAngre Island 19 km

(40 mins)

Belapur Thane 25 km

(20mins)

25km

(1 hr)

Belapur Gateway of India 23 km

(20 mins)

38 km

(1hr 20mins)

Vashi Thane 12 km

(15 mins)

20 km

(45 min)

Vashi Gateway  of India 25 km

(20mins)

28 km

(1hr15mins)

हे नवीन मार्ग पुढील प्रमाणे

कार्यान्वित होणार असलेले रोपॅक्स फेरीचे चार नवे मार्ग आणि वॉटर टॅक्सीचे बारा नवे मार्ग हे मुंबईतील दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. या मार्गामुळे प्रदूषणविरहित, शांत आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे प्रवासाचा खर्च आणि कार्बन पदचिन्हेही लक्षणीयरित्या कमी होतील. मुंबई शहरातील वाढते पर्यटक आणि प्रवासी यांच्या प्रवासाच्या गरजा पुऱ्या करण्याच्या दृष्टीनेसुद्धा ही मोठी उपयुक्त बाब असेल.

नवीन जलमार्ग वाहतूक कार्यान्वित करण्याची योजना म्हणजे जलमार्गाचा यथासांग  उपयोग करून त्यांना देशाच्या आर्थिक विकासात सहभागी करून घेणे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीच्या सहाय्याने टाकलेले नवीन पाऊल आहे, असे बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितले. आता नवीन संधींची दारे उघडतील तसेच अशा रोपॅक्स व वॉटर टॅक्सी सेवांचे नवीन जाळे विविध सागरी राज्यांमध्ये उभारता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले

 

पाहा व्हिडीओ:


Tags: केंद्र सरकारभाऊचा धक्कामांडवामुंबईरोपॅक्स
Previous Post

मराठवाड्यातील सुखना धरणावर परतले पक्षी

Next Post

मार्चच्या महिन्यात डिजिटल व्यवहारांचा नवा विक्रम

Next Post
BHIM

मार्चच्या महिन्यात डिजिटल व्यवहारांचा नवा विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!