मुक्तपीठ टीम
संकट आलं की खचायचं कशाला? वडिलांच्या निधनानंतर पुण्यातील मृदुला शिळीमकरनं भावासोबत हायवेवर भाजीचा धंदा सुरु केला. त्याचवेळी ती बीबीए पदवीचं शिक्षण घेतेय. कष्टानं शिकून मोठं व्हायचं तिचं स्वप्न प्रेरणादायी.
आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला मेहनतीने आणि परिश्रमाविना मिळू शकत नाही. परिश्रमामुळे प्रगतीचा मार्ग सुखर पार पडू शकतो. आपल्याला आपल्या आयुष्यात इतरांवर अवलंबून राहायचे नसेल तर त्यासाठी स्वतः कष्ट केले पाहिजे. अशीच गोष्ट आहे पुण्यातील मृदुला शिळीमकरची….जी आपल्या भावासोबत हायवेवर भाजीचा धंदा करतेय. त्यावेळीच ती बीबीए पदवीचंही शिक्षणही घेतेय…
मृदुला कांचन शिळीमकर, पुण्यातील केळवडे येथिल रहिवासी. भाजीचा तसा छोटासा व्यवसाय…ती सध्या बीबीएच्या पहिल्या वर्षी आहे. मृदुलाचे कुटुंब शेतकरीच आहे. वडिलांचं निधन झाल्यामुळे आईला हातभार लावण्यासाठी ती आणि तिचा भाऊ भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. मृदुलाला पुढे फायनान्स घेवून बॅंकिंग करायचे आहे. मार्केटिंगमध्ये तिचं कौशल्य पण जास्त आहे.पण फायनान्समध्ये ज्ञान असल्यामुळे फायनान्समध्ये स्पेशलायझेशन करायचे आहे. पुढे अकाउंटमध्येही ज्ञान असल्यामुळे ती अकाउंटिंग करणार आहे.
मृदुलाच्या वडिलांना जाऊन तरी चार-पाच वर्ष झाली असतील. पण मृदुलाची शिकण्याची जिद्दही अफाट आहे. ते म्हणतात ना मनात इच्छा असेल, परिश्रमाची जोड असेल तर यश मिळतच…तसचं पुढे मृदुलालाही तिच्या भावी आयुष्यात यश मिळेल.
मृदुलाला सध्या करत असलेल्या भाजीच्या व्यवसायामध्ये अनेक अनुभव मिळत आहे. इन्वेस्टमेंट करून प्रॉफिट कसा कमवायचा हे तिला चागलंच कळलं आणि आणखी एक महिला व्यावसायिक म्हणून व्यवसाय कसा हातळायचा हे कळलं. लोकांते अनुभव कळले.लोकं कशी असतात तिला यातून कळले. म्हणजे या व्यवसायामध्ये जग सुद्धा तिला बघायला मिळालं. मृदुलाला या व्यवसायात प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, कॉलेजमध्ये शिकताना ज्ञान हे पाठ्यपुस्तकातून मिळते, सर्व जे आहे ते तोंडी शिकायला मिळतं प्रत्यक्ष अनुभव तर मिळत नाही.पण या व्यवसायातून ती प्रत्यक्ष माणसांशी संवाद साधते. त्यामुळे व्यवसाय कसा चालवायचा हे तिला कळलं. यामध्ये आता खरेदीदाराला आपल्या उत्पादनासाठी कसं पटवायचं, आपल्या वस्तूचे वैशिष्ट्य कशी सांगायची. आपले उत्पादन त्यांना का घ्यावसं वाटलं पाहिजे याचा प्रत्यक्ष अनुभव तिला इथे मिळतो. कॉलेज सध्यातरी ऑनलाइन चालू आहे. प्रॅक्टिकल वैगेरे सध्या होत नाहीयेत.पण कॉलेजचं तसं म्हणायला गेलं तर एवढं काही याचा संबंध नाही आहे.जे काही असेल ते प्रॅक्टिक इथेच तिचे चालू आहे.
मृदुलाच्या जीवनातलं एकचं ध्येय आहे जे तिला जास्तीत जास्त कमवायचं आहे आणि नफा मिळवायचा आहे. तिची जी आताची परिस्थिती आहेना ती तिला बदलून चांगली करायची आहे. तिला पुढे जाऊन ५० हजाराच्या वर कमवायचं आहे. यासाठी ती शिक्षण चांगलं घेणार आहे. तिचे कॉलेजपण चांगले आहे,म्हणजे त्यांकडून थोडीशी मदतही मिळते. ती मदत कंसेशन दिली आहे. घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कॉलेजच्या फीमध्ये कंसेशन तिला दिलं आहे.आणि तिने जर योग्य शिक्षण घेत चांगले गुण मिळविले तर पुढे तिला कॉलेजमधून प्लेसमेंटपण मिळेल. जेवढं आता तिने ठरवलंय. म्हणजे बॅंकिंग करून पुढे ती सरकारी बॅंकेत नोकरी करणार आणि त्यातून जो पगार मिळणार आहे त्यातून ती तिचा व्यवसाय करण्याचे तिने ठरवलं आहे. व्यवसाय करायचा हे तिचे ध्येय आहे.
समाजाती इतर मुलींच्या घरच्यांनी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही पाहिजे असं मृदुलाने इतर मुलींना उद्देशून सांगितले आहे. स्वतंत्र्य व्यक्तिमत्व हे प्रत्येक मुलीचं असलं पाहिजे. एक मुलगी तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकायच्या किंवा घरातच ठेवायची असं नाही. आजकालच्या मुली सगळ्या स्वतंत्र्य आहेत. त्यांनी त्यांचा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना निर्णय घेण्यासाठी संधी द्यावी हीच मृदुलाची इच्छा आहे. आणि प्रत्येक पालकांना तिला एकच सांगायचं आहे त्यांचा निर्णय त्यांना घेऊद्या कारण त्यांचं भविष्य त्यांच्या हातात आहे, असं मृदुलाने समाजातील पालकांसाठी संदेश दिला आहे.