मुक्तपीठ टीम
हनीट्रॅपच्या घटना वाढताना दिसत आहेत. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, नोकरशहांपासून संपादकांपर्यंत अनेकांना सेक्सच्या जाळ्यात अडकवून खंडणी वसुली करणारे एक रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. मुंबई क्राइम ब्रँचचे प्रमुख मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने अश्लील चित्रफीत तसेच व्हिडीओ कॉल करून त्याद्वारे धमकावून सावजाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्या जाळ्यात अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, तसेच पत्रकारही अडकले आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणात, मुंबईतील एका बड्या सेलिब्रिटीने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. या रॅकेटने उत्तर भारतातही मोठ्या प्रमाणावर वसुली करूनही तेथे मात्र तक्रार झालेली नाही.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेनंतर आरोपींची चौकशी केली असता, त्यांचे लक्ष्य आयएएस, आयपीएस अधिकारीही असल्याचे निदर्शनास आले आहे. या रॅकेटने संपूर्ण देशभरात पॉर्न खंडणी केली होती.
पॉर्न खंडणीचं रॅकेट चालायचं कसं?
- आरोपीची मोडस ऑपरेंडी अतिशय अनोखी होती.
- या रॅकेटने वेगवेगळ्या मुलींच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट बनवले होते.
- पूजा शर्माच्या नावावर तब्बल १७१ बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केले. यानंतर काही प्रोफाइल नेहा शर्माच्या नावाने बनवले.
- यानंतर हे रॅकेट पूजा आणि नेहा शर्मा किंवा अन्य नावाने फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवत असे.
- हळू हळू सावजाशी फेसबुक मेसेंजरवर गप्पा मारण्यास सुरवात करायचे.
- मैत्रीच्या बहाण्याने मोबाईल नंबर मागायचे.
- मैत्री झाल्यानंतर ते समोरचा व्यक्तीचा मोबाईल नंबर मागायचे.
- त्यानंतर व्हाट्सअॅपवर त्यांच्याशी गप्पा मारत.
- त्यानंतर शनिवारी संध्याकाळी ज्याला लक्ष्य करायचे होते त्यांना एक व्हिडिओ कॉल केला जात असे.
- परंतु कॉल करणारा आपला चेहरा दाखवत नसायचा.
- व्हिडीओ कॉलवर अश्लील चित्रफित अथवा एखाद्याची ओळख लपवून विवस्त्र चित्र दाखवायचे.
- अश्लील बोलण्यास किंवा समोरच्याला विवस्त्र होण्यास प्रवृत्त करायचे आणि हा व्हीडीओ कॉल रेकॉर्ड करायचा. रेकॉर्डिग केलेला.
- व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देऊन लाखो रुपये उकळायचे.
पॉर्नच्या धमकीनं खंडणी वसुली
चॅटिंगमध्ये करताना ते धमकी देत असतं की हे आम्ही यूट्यूब चॅनेल आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करीत आहोत. जर बदनामीची धमकी देत ते बँकमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत. ते वारंवार पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करत असे आणि पैसे मागत असे. अशा एका अडचणीत आलेल्या हाय प्रोफाइल व्यक्तिने सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर झालेल्या तपासणीत या हनिट्रॅप रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला.
बँक खात्यात खंडणी जमा
सायबर सेलच्या चौकशीत अशी ५८ बँक खाती उघडकीस आली आहे, जिथे ही रक्कम ट्रान्सफर केली गेली होती. पूजा आणि नेहा शर्मा या कधी कॉलवर बोलत नसे त्या फक्त चॅटींग करायच्या. आरोपींना ठाऊक होते की ते पुरूष असल्याचे कॉलवर कळेल म्हणून ते चॅटिंग करत असे.
पूजा शर्मा, नेहा शर्मा अशी नावे वापरून फसविण्यासाठी तयार केलेली १७१ फेसबुक प्रोफाइल पोलिसांनी ब्लॉक केले. याचप्रमाणे ५ टेलिग्राम चॅनेल्स आणि ५८ बँक खाती देखील ब्लॉक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींनी फसवणूक करण्यासाठी सुमारे ५४ मोबाइल क्रमांकाचा वापर केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्प्ष्ट झाल्याचे उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
- एखाद्या पुरुष सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर स्त्रीचा आमिषासारखा वापर केला जातो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात.
- हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकारी, प्रभावशाली, श्रीमंत पुरुषांना सदर महिलेकडून गोडीगुलाबीने चलाखीने माहितीसाठी वापरून घेतले जाते.
- काहीवेळा पुरुष सहकार्य करत नाहीत तेव्हा मात्र हनी ट्रॅप कटानुसार घडवलेल्या संबंधांचे व्हिडीओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात. इप्सित साध्य केले जाते.
- जागतिक पातळीवर लष्करी हेरगिरी, कॉर्पोरेट हेरगिरी, राजकीय हेरगिरी यात हनी ट्रॅपचा शस्त्रासारखा वापर केला जातो.
- भारतातही राजकीय नेत्यांचे करिअर संपवण्यासाठी किंवा निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करतात.