मुक्तपीठ टीम
चित्रपट आणि खेळ हे बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. आपल्या देशात ज्या प्रकारे सिनेमातील कलाकार आणि खेळाडूंचे चाहते आहेत त्यातून ही वस्तुस्थिती अधोरेखित होते. १७ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खेळांवर आधारित काही चित्रपटांमधून आपल्याला याचे दर्शन घडते. आपल्या देशात विविध खेळ आणि क्रीडा संस्कृती साजरी केली जाते, खेळाचा लोकांच्या आणि समाजाच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे या चित्रपटांमधून उलगडून दाखवले आहे.
खेळ आणि खेळाडू ही मुख्य संकल्पना असलेले माहितीपट आणि लघुपट जाणून घेऊया.
किकिंग बॉल्स
दिग्दर्शक: विजयेता कुमार
दरवर्षी, सुमारे बारा दशलक्ष मुलींची लग्ने वयाच्या अठराव्या वर्षापूर्वी केली जातात; म्हणजे दर मिनिटाला तेवीस मुलींचे लग्न होते. राजस्थानमधील तीन छोट्या गावात, एक स्वयंसेवी संस्था फुटबॉलच्या माध्यमातून हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करत आहे. या दोनशे किशोरवयीन मुली नियमितपणे खेळतात आणि प्रशिक्षण घेतात. आणि वस्तुस्थिती ही आहे की त्यातील जवळजवळ सर्वच बालवधू आहेत. या मुलींचे भविष्य काय आहे, हे कोणालाच माहीत नाही. मात्र सध्या त्या त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत, आत्मविश्वास भरलेला आहे; आणि त्यांना फुटबॉल खेळायला आवडते.
व्हीलिंग द बॉल
दिग्दर्शक : मुकेश शर्मा
व्हीलचेअरवरील चार महिला बास्केटबॉल खेळाडूंच्या जीवन कथांद्वारे, त्यांची खेळा विषयीची आवड जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
फुटबॉल चांगथांग
दिग्दर्शक: स्टॅनझिन जिग्मेट
लाडेड इथल्या सर्वात दुर्गम गावांपैकी एक चांगथांग गावातली आजी आणि नातवाला फुटबॉल खेळायला आवडते. खेळाची आवड असलेल्या मुलांसाठी एक स्पर्धा आयोजित केली जाते.
आय राईझ
दिग्दर्शक: बोरून थोकचोमी
एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या लैश्राम सरिता देवी, एक महिला मुष्टियोद्धा सर्व अडचणींवर मात करून आंतरराष्ट्रीय ख्यातीची स्पोर्ट्स स्टार बनली आहे . आणि महत्वाचे म्हणजे, आई झाल्यानंतर ती पहिली भारतीय व्यावसायिक महिला मुष्टियोद्धा म्हणून प्रसिद्धीझोतात आली.मुष्टियोद्धा म्हणून कारकीर्द घडवत असतानाच ती एक अकादमी देखील चालवते , जी निराधार मुलांना बॉक्सिंगद्वारे ओळख निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देते आणि प्रोत्साहन देते. तिचे ध्येय आणि तिचा लाडका लेक टॉमथिल सोबतचे नाते जपत ती कसा समतोल साधते हे हा चित्रपट दाखवतो.
90 इयर्स यंग
दिग्दर्शक: अथिथ्य कनगराजन
वयाच्या साठाव्या वर्षांनंतर धावण्याच्या जगात प्रवेश करणाऱ्या के. परमशिवम या नव्वद वर्षांच्या धावपटू वरचा हा लघुपटआहे .
लॉंगिंग (तांग)
दिग्दर्शक: बानी सिंग
फाळणीच्या पार्श्वभूमीवर, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या हॉकी संघाने १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. सहा दशकांनंतर, जेव्हा या विजेत्या संघाचा सदस्य नंदी सिंगला वयाच्या ८४ व्या वर्षी पक्षाघाताचा झटका आला, तेव्हा बरे होण्याची त्यांची दृढ इच्छा त्यांच्या मुलीला तिच्या जन्माआधीचा चॅम्पियन म्हणून त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी उद्युक्त करते. आर्काइव्हल फुटेज आणि सहकारी खेळाडूंच्या मुलाखती वापरून, ती हा ऐतिहासिक विजय आणि फाळणीमुळे बदललेले आयुष्य तसेच पाकिस्तानमधील सीमेच्या पलीकडे काही मित्र गमावल्याचे दुःख ती सांगते. वडिलांचा पूर्व इतिहास जाणून घेण्याचा तिचा प्रवास मातृभूमीच्या शोधाकडे वळतो.
PIB MIFF Team | S.Patil/S.Kane/Darshana/MIFF-54
- चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
- #MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
- जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +९१-९९५३६३०८०२ वर कॉल करा. किंवा miff.pib@gmail.com वर आम्हाला मेल करा.
- कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.