मुक्तपीठ टीम
कोरोना संकट पुन्हा उफाळलंय. सगळीकडे पुन्हा अस्वस्थता पसरू लागली आहे. पण कोरोना संकट ओढवल्यापासून आजवर अनेक असेही आहेत, ज्यांनी या संकटालाही संधीमध्ये बदलत काही वेगळं करून दाखवले आहे. त्यात व्यक्ती आहेत, संस्था आहेत, खासगी कंपन्याही आहेत. मायक्रोसॉफ्टही अशांपैकीच ज्यांनी कोरोना संकटातच तीस कोटी जीवनांमध्ये करिअरच्या नव्या विन्डोज उघडल्या आहेत.
मायक्रोसॉफ्टने कोरोना संकटाच्या काळात २४९ देश आणि प्रदेशातील तीस कोटी लोकांना डिजिटल कौशल्य मिळविण्यात मदत केली आहे. यापैकी ३० लाख लोक आपल्या भारतातील आहेत. जूनमध्ये मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेल्या अडीच कोटींच्या उद्दिष्टापेक्षाही अधिक आहे.
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये कंपनीने जागतिक स्तरावर २,५०,००० कंपन्यांना कौशल्यावर आधारावर नियुक्ती करण्यास मदत केली. कोरोना महामारीच्या या काळात बेरोजगार फॅक्टरी कामगार, किरकोळ मदतनीस आणि ट्रक चालक यांच्यासह लाखो लोक गिटहब, लिंक्डइन आणि मायक्रोसॉफ्टमधील ऑनलाईन अभ्यासक्रमांचा भाग होत आहेत.
मायक्रोसॉफ्ट आशियाचे अध्यक्ष अहमद मजहरींच्या मते, “महामारीच्या काळानंतर्या जगात कौशल्य हे नवीन चलन होईल. गेल्या वर्षभरात आपण पाहिले आहे की जगभरातील सर्वत्र साथीचा रोग होता त्यामुळे महामारी झाली. साथीच्या आजारातून मुक्तता होईल यातून बाहेर पडण्यासाठी कौशल्य आवश्यक आहे.” असे
मायक्रोसॉफ्टने भारत सरकारबरोबर मजबूत डिजिटल स्किलिंग इकोसिस्टम तयार करण्यासाठी आणि उद्योग संस्था आणि अन्य संस्थांबरोबर काम केले आहे. गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने भारतातील नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनबरोबर हातमिळवणी केली. जेणेकरून भारतातील एक लाख तरुण युवतींना डिजिटल कौशल्यासह सक्षम करता येईल.
पाहा व्हिडीओ: