मुक्तपीठ टीम
रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी देशाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. लवकरच दिल्लीच्या रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार धावणार असल्याचा दावा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. १ जानेवारीपासून या ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारची सुरूवात करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी त्यांनी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत कार खरेदी केली असून फरिदाबाद येथील तेल संशोधन केंद्रातून ग्रीन हायड्रोजन घेतले आहे. मात्र, हेच इंधन त्यांना आपल्या महाराष्ट्रातील एक मराठी उद्योजकही पुरवू शकतो. पुण्यातील उद्योजक सिद्धार्थ मयूर यांची H2E Power या कंपनीकडे ग्रीन हायड्रोजन इंधनाचे तंत्रज्ञान आहे.
नव्या इंधनासाठी गडकरींचे प्रयत्न
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सातत्यानं नव्या इंधनासाठी प्रयत्न करीत आहेत. एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, या प्रकारची कार असणे शक्य आहे हे लोकांना दाखवण्यासाठी मी लवकरच ही कार लाँच करणार आहे.
ग्रीन हायड्रोजनचालित वाहन योजना
- सरकार ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहतूक चालवण्याचा विचार करत आहेत.
- कार, बस, ट्रक सर्व काही ग्रीन हायड्रोजनवर चालवायचे आहे.
- त्यासाठी नदी-नाल्यांमध्ये पडणारे घाण पाणी वापरावे, त्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करावे. अशी योजना आखली जात आहे.
कोणतीही गोष्ट वाया जाणार नाही, कचऱ्याचाही केला जाणार वापर
- नितीन गडकरी यांनी नागपुरातील सात वर्षे जुन्या योजनेवर सांगितले की, या योजनेत सांडपाण्याचे पाणी वापरले जाते.
- आता नागपूर आपले सांडपाणी महाराष्ट्र सरकारला विकते, ज्यापासून वीज बनवली जाते.
- या प्रक्रियेतून तो दरवर्षी ३२५ कोटी रुपये मिळवले जाते.
- नितीन गडकरी म्हणाले की, काहीही निरुपयोगी नाही.
- कचऱ्यामध्ये मूल्य जोडल्यास बरेच काही तयार होऊ शकते.
- सांडपाण्याच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करता येतो. यावर आम्ही काम करत आहोत.
- लोकांना सांड पाण्यातून ग्रीन हायड्रोजन तयार करता येईल, असे प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठी उद्योजकाचे आवाहन
उद्योजक सिद्धार्थ मयूर यांची ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपला प्रकल्प महाराष्ट्रातच कार्यान्वित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर महाराष्ट्रातील एसटीच्या सर्व बसना इंधन पुरवठा करणे शक्य होईल. त्यामुळे इंधन खर्च खूपच कमी होईल. तसेच प्रदूषण शू्न्यावर आणता येईल, असेही ते म्हणाले.