Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पशुधनाच्या सुरक्षेसाठी राज्यात “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान

November 12, 2022
in सरकारी बातम्या
0
Radha Krishna Vikhe Patil

मुक्तपीठ टीम

लम्पीसारख्या संसर्गजन्य रोगापासून पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यात “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाविषयी मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीस  पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सह सचिव मानिक गुट्टे, सह आयुक्त डॉ. डी.डी.परकाळे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले,  “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान हे एक क्रांतिकारक अभियान असून एक चळवळ उभी करावी. हे अभियान महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने राबवावे. गोठा स्वच्छ ठेवल्यास लम्पी तसेच इतर संसर्गजन्य रोगांपासून भविष्यातही पशुधन सुरक्षित राहू शकेल. लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात.

राज्यात लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना जबाबदारी सोपवावी. रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबींवर गांभीर्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना देखील मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

रोग नियंत्रणासाठी जिल्ह्याला आणखी एक कोटी रुपये

रोग नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यात आणखी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. औषधी, लसमात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्यांचे गोवंशीय पशुधन मृत्यूमुखी पडले आहे त्या  पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. मदतीपासून वंचित असलेल्या पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.


Tags: RadhaKrishna Vikhe Patilपशुधनाच्या सुरक्षापशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलमाझा गोठास्वच्छ गोठास्वच्छ गोठा" अभियान
Previous Post

राज्यात ५३ मॉडेल आयटीआयसह वर्ल्ड स्किल सेंटर, एकात्मिक कौशल्य भवन

Next Post

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Next Post
मा.उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक -1 (1)

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!