मुक्तपीठ टीम
ऐन सनासुदिच्यावेळी देशभारत वीज निर्मितीत अडथळा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे देशात कोळशाची कमतरता. यामुळे याचा फटका देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. असे असले, तरी मुंबईचा वीज पुरवठा मात्र सुरळीतच राहिल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुंबईला होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यापैकी सर्वाधिक पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू प्रकल्पाने स्वदेशी तसेच आयात कोळशाच्या मिश्रणातून अखंड वीज निर्मिती सुरू ठेवली आहे, तर टाटा पॉवर कंपनीनेही वीजनिर्मिती वाढवली आहे. त्यामुळे कोळसाटंचाई असतानाही मुंबईला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात परिस्थिती बरी
- खणी कर्म संचालक पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले की, राज्यातल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा कोळसा पुरवठा याचे नियंत्रण त्यांच्यामार्फत होते.
- इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात परिस्थिती बरी आहे.
- विनाकारण पॅनिक केले जात आहे.
- गेल्या तीन दिवसापासून पुरवठा पुन्हा सुरळीत होवू लागला आहे.
- कोळशाअभावी काही प्रकल्प बंद ठेवावे लागलेत.
- त्याला कोळशाचे नियोजन म्हणतात.
- सध्या या नियोजनामुळे दीड हजार मेगा वॅटची तुट आहे.
- परंतु सध्या कोळसा पुरवठा सुरळीत होत असल्याने ती तुट भरली जाण्याची शक्यता आहे.
- सध्या तरी पॅनिक व्हावे अशी स्थिती नाही.
- केंद्रीय सचिव रोज दुपारी ४ वाजता आढावा घेत असतात.
- तिथे नोंदवल्या प्रमाणे पुढील २४ तासात कोळसा पुरवला जातो.
- या वर्षी निश्चित यापूर्वी कधी आली नव्हती अशी स्थिती झाली.
- स्टॅाक अतिशय कमी झाला होता.
- त्याचे मुख्य कारण सप्टेबरमध्ये अचानक वीज मागणी वाढली आणि पुरवठा विस्कळीत झाला होता.
- सध्या शासकीय युनिटमधले उत्पादन कमी झाले आहे.
- पण मॅनेज होत आहे.
- सणाचा काळा बघता मागणी वाढली तर लोडशेडिंग होवू शकेल.
- गेल्या तीन दिवसात ८० लाख ते १ लाख १० हजार टन पुरवठा होत आहे.
- तो दीड लाख टन हवा.
- तो सुरळीत झाला तर दिड हजाराची तुट कमी होईल.
महाराष्ट्रात वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
- उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे की, देशभरात निर्माण झालेल्या कोळसा टंचाईमुळे औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे.
- महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले आहेत.
- सध्या राज्याला दोन दिवस वीज पुरवठा होऊ शकेल इतका कोळसा उपलब्ध आहे.
- केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी ऑगस्ट महिन्यात संप केला होता, तसेच त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने कोळसा निर्मितीवर परिणाम झाला.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाची किंमत दुपटीने वाढली आहे, त्याचा एकंदरीत परिणाम औष्णिक विद्युत केंद्रांवर झाला आणि वीजपुरवठा घटला.
- राज्यातील कोळशाचा साठा वाढवा यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.
- महाराष्ट्रात वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असं तनपुरे यांनी म्हटलं
तर राज्यात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागणार
- देशभरात कोशळ्या कमतरता भासत आहे.
- याचाच परिणाम म्हणून ११ ऑक्टोबरला राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद करण्यात आले आहे.
- वीजेची तूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर १२ होयड्रो प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- त्यामुळे वीज निर्मितीची भरपाई होईल.
- या प्रकल्पातून ६० टक्के तुट भरून निघणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.
- जर हीच परिस्थिती राहिली शहरी आणि ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागणार आहे.
- त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा.
मुंबईचा वीज पुरवठा सध्या तरी सुरळीतच राहिल
- मागील महिन्यापर्यंत मुंबईची कमाल वीज मागणी दोन हजार मेगावॉट इतकी होती.
- पण आता ‘ऑक्टोबर हिट’ सुरू झाल्याने दुपारच्या वेळी विजेची मागणी वाढली आहे.
- दिवसभरातील कमाल वीज मागणी दोन हजार ३०० ते दोन हजार ४०० मेगावॉटदरम्यान गेली आहे.
- यामध्ये मुंबईला सर्वाधिक जवळपास एक हजार २०० मेगावॉट वीज पुरवठा अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) या कंपनीकडून होतो.
- त्यापाठोपाठ टाटा पॉवर व बेस्टकडून पुरवली जाणारी वीज प्रत्येकी ६०० मेगावॉट आहे.
- बेस्ट कंपनी वेगवेगळ्या स्रोतांकडून वीज खरेदी करते, तर टाटा पॉवरला त्यांच्या स्वत:च्या ट्रॉम्बे व अन्य प्रकल्पांतून वीज मिळते.
- यादरम्यान, ‘एईएमएल’ने आपला डहाणूचा प्रकल्प कमाल क्षमतेवर चालवत मुंबईचा वीज पुरवठा सुरळीत ठेवला आहे.
- संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एईएमएलच्या डहाणू प्रकल्पाची क्षमता ५०० मेगावॉट आहे.
- हा प्रकल्प सध्या सरासरी ४७० ते ४९५ मेगावॉट वीज उत्पादन करीत आहे.
- ही सर्व वीज ‘एईएमएल’कडूनच त्यांच्या मुंबईतील ग्राहकांना दिली जात आहे.
- या प्रकल्पापुढेही कोळसा टंचाईचे आव्हान आहे.
- पण स्वदेशी व आयात कोळसा यांच्या मिश्रणातून येथील वीज निर्मिती सुरळीत ठेवली जात आहे.
- उर्वरित वीज एक्सचेंजमधून खरेदी केले जात आहेत.’