मुक्तपीठ टीम
देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधीत घटकांशी चर्चा करून मूल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली.
देशपातळीवर एकसूत्रता व समानता यावी यासाठी एकच मुल्यमापन प्रक्रिया असावी अशी आग्रही मागणी राज्यसरकारने केली होती. यानुसार सर्वसमावेशक विश्वसनीय व सातत्यपूर्ण मुल्यमापण धोरण लक्षात घेऊन बारावी परीक्षेचे नवीन मूल्यमापन धोरण जाहीर करण्यात आले आहे.
सदर मुल्यमापन करत असताना शालेय / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर एक परीक्षा समितीची स्थापना करून मूल्यमापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी शाळेने सर्व प्रकारचे अभिलेख व माहिती जतन करून ठेवावी. निकालपत्र तयार करत असताना कोणत्याही प्रकारची खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री यांनी दिले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी वर्षभर उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी ऑनलाइन, ऑफलाईन अध्यापन करत असताना गृहकार्य, स्वाध्याय, प्रकल्प, सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा इत्यादी विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन / ऑफलाईन मूल्यमापन केलेले आहे.
शासन निर्णय दिनांक ०८ ऑगस्ट २०१९ नुसार सन २०१९-२० पासून इयत्ता ११ वी व सन २०२०-२१ पासून इयत्ता १२ वी साठी सुधारित मूल्यमापन योजना लागू करण्यात आली आहे. सदर मूल्यमापन योजनेनुसार इयत्ता १२ वी साठी लेखी परीक्षा व तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येते व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय २००/१५०/१०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येते. मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दि.२९ जून २०२१ रोजी शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता १० वीची परीक्षा विविध परीक्षा मंडळांमार्फत (बोर्ड) आयोजित करून संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता ११ वीचे वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी चे उपरोक्त मूल्यमापन हे कोविड-१९ प्रादुर्भावाच्या परिस्थितीपूर्वी करण्यात आलेले आहे व विद्यार्थ्यांच्या उपरोक्त संपादणूकीचे विश्वासार्ह अभिलेख अनुक्रमे संबधित परीक्षा मंडळांकडे तसेच कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर उपलब्ध आहेत. याचा विचार करून शासन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मधील मूल्यमापन तसेच इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी मध्ये वर्षभरातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विविध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) सन २०२१ चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेत आहे. ही अपवादात्मक परिस्थितीतील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठीची तात्पुरती व्यवस्था आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) चा निकाल तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्वच उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता १२ वी च्या मूल्यमापन प्रक्रियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही. त्यामुळे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा सन २०२१ साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शासन निर्णय दि.०८ ऑगस्ट २०१९ मधील विषयनिहाय लेखी व तोंडी/प्रात्यक्षिक/ अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत. त्यातील तोंडी/ प्रात्यक्षिक/ अंतर्गत मूल्यमापन यासाठी मंडळाच्या सूचनांप्रमाणे आयोजित परीक्षांमध्ये विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम मूल्यमापनात घेण्यात यावेत.
गुण विभागणी तोंडी/प्रात्यक्षिक/ लेखी विषय विषय द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्भुत आहे.
विद्यार्थ्याची इ. १० वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक , इयत्ता ११ वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व इयत्ता १२ वी चे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येतील. उपरोक्तप्रमाणे लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी ३० टक्के गुण इयत्ता १० वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक, ३० टक्के गुण इ. ११ वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व ४० टक्के गुण इयत्ता १२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापन यानुसार भारांश विचारात घेऊन दिले जातील. इयत्ता १० वी साठी भारांशानुसार प्राप्त गुण निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जातील.
इयत्ता १२ वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.
उच्च माध्यमिक शाळांनी/ कनिष्ठ महाविद्यालयाने विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार वर्षभर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेले गुण तसेच सदर गुण किती पैकी आहेत ( सदर विषयासाठी एकूण किती गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आयोजित केले) इत्यादी तपशील संगणक प्रणालीत भरण्याची सुविधा असेल.
सदर विषयनिहाय प्राप्त गुण संगणक प्रणालीत सदर गुणांचे संगणक प्रणालीमधून रूपांतर करून सदर गुण विद्यार्थ्यास संगणक प्रणालीद्वारे प्रदान केले जातील.
मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता १२ वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे.ज्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन पूर्ण केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण संगणकीय प्रणालीत भरण्यात यावेत.
अपवादात्मक परिस्थितीत ज्या उच्च माध्यमिक शाळांनी तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन आयोजित केले नसेल त्यांनी प्रचलित पद्धतीने/ अन्य पर्यायी पद्धतीचा वापर करून ऑनलाईन/अन्य शक्य पर्यायी पद्धतीने मूल्यमापन आयोजित करून विद्यार्थ्यांना गुणदान करावे व सदर गुण संगणक प्रणालीमध्ये नमूद करावेत.
श्रेणी विषयांचे मूल्यमापन
श्रेणी विषयांसाठी विहित पद्धतीने व यावर्षी मंडळाने दिलेल्या विशेष मार्गदर्शक सुचना विचारात घेऊन गुणदान करून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी, संगणक प्रणालीमध्ये नमूद कराव्यात.
उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणाऱ्या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे (Class Improvement Scheme) सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रविष्ट असलेल्या 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती
काही विषयांसाठी प्रविष्ट पुनर्परीक्षार्थी (नियमित व खाजगी पुनर्परीक्षार्थीअसेल. सदर इयत्ता १० वीच्या सरासरी गुणांवरून, इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या इयत्ता १० वीच्या भारांशानुसार गुण संगणक प्रणालीद्वारे रूपांतर करून विद्यार्थ्यास प्रदान केले जातील.
सदर गुणांची मंडळ स्तरावर पडताळणी करण्यासाठी सदर विद्यार्थ्याने इयत्ता १० वी उत्तीर्ण केलेल्या परीक्षेचा महिना, वर्ष व बैठक क्रमांक नोंदवावा. सदर विद्यार्थी एकापेक्षा अधिक वेळा मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ट झाला असल्यास सूट मिळालेल्या प्रत्येक विषयासमोर त्या परीक्षेचे महिना, वर्ष व बैठक क्रमांक नोंद करावा.
इयत्ता १२ वी च्या ज्या विषयांसाठी १०० गुणांचे तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / तत्सम मूल्यमापन निर्धारित केले आहे अशा विषयांसाठी इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी चे गुण विचारात घेतले जाणार नाहीत.
इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याचे इयत्ता १० वी च्या परीक्षेच्या मूळ गुणपत्रकावरून सर्वोत्तम गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण (१०० पैकी) काढण्यात यावेत.राज्य मंडळाच्या यापूर्वी इयत्ता १२ वी च्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची सरासरी काढण्यात यावी.
सदर विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी इयत्ता १२ वी परीक्षेसाठी प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या बाबतीत सदर परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक भरण्याची सुविधा असेल. विद्यार्थी एका पेक्षा अधिक वेळा मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ट झाला असल्यास विषयनिहाय वर्ष व बैठक क्रमांक नोंद करण्याची सुविधा असेल.यामध्ये शाळांनी माहिती भरल्यानंतर सदर विद्यार्थ्यास इयत्ता १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची सरासरी संगणक प्रणालीमार्फत गणन करून निश्चित करण्यात येईल.इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या इयत्ता १२ वीच्या भारांशानुसार म्हणजेच ८०/५०/४०/३०/३५/२५ गुणांसाठी उपरोक्त नमूद इयत्ता १२ वीच्या सरासरी गुणांचे संगणक प्रणालीमधून रूपांतर करून संगणक प्रणालीद्वारे विद्यार्थ्यास सदर गुण प्रदान केले जातील. मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता १२ वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे.ज्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन पूर्ण केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण संगणकीय प्रणालीत भरण्यात यावेत.अपवादात्मक परिस्थितीत ज्या उच्च माध्यमिक शाळांनी तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन आयोजित केले नसेल त्यांनी प्रचलित पद्धतीने/ अन्य पर्यायी पद्धतीचा वापर करावा इयत्ता १२ वी च्या ज्या विषयांसाठी १०० गुणांचे तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / तत्सम मूल्यमापन निर्धारित केले आहे अशा विषयांसाठी इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी चे गुण विचारात घेतले जाणार नाहीत.
इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याचे इयत्ता १० वी च्या परीक्षेच्या मूळ गुणपत्रकावरून सर्वोत्तम गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण १०० पैकी प्रमाणे काढण्यात यावेत.
इयत्ता १२ वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुणअशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयाने विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प वा तत्सम मूल्यमापन यापैकी एक किंवा अधिक बाबींच्या आधारे मूल्यमापन करून विद्यार्थ्यास गुणदान करावे. सदर विषयनिहाय प्राप्त गुण संगणक प्रणालीत भरल्यानंतर तक्ता -५ मध्ये नमूद इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या इयत्ता १२ वीच्या भारांशानुसार म्हणजेच ८०/५०/४०/३५/३०/२५ गुणांसाठी सदर गुणांचे संगणक प्रणालीमधून रूपांतर करून सदर गुण विद्यार्थ्यास संगणक प्रणालीद्वारे प्रदान केले जातील.
मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता १२ वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे.
ज्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन पूर्ण केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण संगणकीय प्रणालीत भरण्यात यावेत. अपवादात्मक परिस्थितीत ज्या उच्च माध्यमिक शाळांनी तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन आयोजित केले नसेल त्यांनी प्रचलित पद्धतीने/ अन्य पर्यायी पद्धतीचा वापर करून ऑनलाईन/अन्य शक्य पर्यायी पद्धतीने मूल्यमापन आयोजित करून विद्यार्थ्यांना गुणदान करावे व सदर गुण संगणक प्रणालीमध्ये नमूद करावेत.
ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा अधिक श्रेणी विषयांसाठी सूट मिळालेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी विहित पद्धतीने व यावर्षी मंडळाने दिलेल्या विशेष मार्गदर्शक सुचना विचारात घेऊन गुणदान करावे व विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी, संगणक प्रणालीमध्ये नमूद कराव्यात.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे या उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणाऱ्या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे (Class Improvement Scheme) सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील.
कोरोनाच्या काळात विद्यार्थी व शिक्षक यांनी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू ठेवली. अव्याहतपणे नवनवे प्रयोग करून शिक्षकांनीही केलेल्या कार्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.