मुक्तपीठ टीम
देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रात या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान तपासण्यात आलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुन्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तन (डबल म्युटेशन) आढळले असल्याचा दावा एका जनुकीय क्रमनिर्धारण तज्ज्ञाने केल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याचवेळी केंद्रीय प्रयोगशाळांमध्ये पाठवलेल्या नमुण्यांबद्दल माहिती मिळत नसल्याची तक्रार मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी केली आहे. याआधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही हीच तक्रार केली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा एका नव्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोरोना का उफाळला ?
- महाराष्ट्रात सरकार आणि सामान्य दोन्ही स्तरांवर कोरोना सुरक्षा नियमांचे पालन झाले नाही.
- राजकीय पक्षांकडून गर्दी जमवणारे कार्यक्रम पहिली लाट संपल्यानंतर जोमात सुरु झाले.
- निष्काळजीपणा दाखवणाऱ्या या कारणांसोबतच आणखीही काही वैज्ञानिक कारणे सांगितली जातात.
- जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांमधील नमुना विश्लेषणाबाबतच्या निष्कर्षाच्या संदर्भात माहितीची कमतरता
- केंद्राकडून नमुना विश्लेषणाबाबतच्या निष्कर्षांच्या संदर्भात संवादाचा अभाव
- पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने तपासलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुन्यांत दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याचे सांगण्यात आले.
- नमुन्यांचे प्रमाण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या संख्येशी तुलना करता खूपच कमी आहे.
- संख्या अतिशय कमी आहे, कारण महाराष्ट्रात दररोज सुमारे दोन लाख चाचण्या घेण्यात येत आहेत. त्या तुलनेत ३६१ नमुने अगदीच किरकोळ आहेत. त्यांच्या भरवशावर निष्कर्ष काढणे अवघड आहे. त्यामुळे
प्रयोगशाळांमधून माहिती मिळत नसल्याची तक्रार
- मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माध्यमांना पुढील माहिती दिली आहे:
- जीनोम सिक्वेंसींग प्रयोगशाळांमध्ये नियमितपणे नमुने पाठवले जात आहेत,
- परंतु आम्हाला त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळत नाही.
- आम्हाला अद्याप माहिती नाही की पाठविलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन होते किंवा ते पूर्वीचे रूप आहे.
- जर जीनोम सिक्वेन्सिंगने नमुन्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तन विषाणू ओळखला तर आम्ही त्याचा प्रसार कमी करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना देऊ शकतो कारण ते विषाणू अधिक संसर्गजन्य आहे.
केंद्रीय प्रयोगशाळांकडून कोरोना स्ट्रेनचे रिपोर्ट येत नसल्याची तक्रार एक आठवड्यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केली होती. वाचा बातमी:
“स्ट्रेन ओळखण्यात उशीर, कोरोना धोका वाढतोय!, केंद्रीय यंत्रणा स्ट्रेनबद्दलही कळवत नसल्याची तक्रार