मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या आज पुन्हा कमी झाली. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणखी दिलासा देणारा ठरला. दिवसभरात कोरोना निदान झालेले २० हजार २९५ नवे रुग्ण आढळले. तर ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.४६ टक्के झाला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात २०,२९५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३१,९६४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५३,३९,८३८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.४६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४४३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- राज्यात आज एकूण २,७६,५७३ सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४६,०८,९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,१३,२१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २०,५३,३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०८,७६६ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०२,९६८ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,९६८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०२,५६८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ०१,८०० (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,२२५ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण २० हजार २९५
महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २०,२९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,१३,२१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका १०३८
- ठाणे १७६
- ठाणे मनपा १३७
- नवी मुंबई मनपा १०७
- कल्याण डोंबवली मनपा १९५
- उल्हासनगर मनपा ४१
- भिवंडी निजामपूर मनपा ९
- मीरा भाईंदर मनपा ९८
- पालघर ३१९
- वसईविरार मनपा १९४
- रायगड ५३३
- पनवेल मनपा १२१
- ठाणे मंडळ एकूण २९६८
- नाशिक ६४८
- नाशिक मनपा २७६
- मालेगाव मनपा १६
- अहमदनगर १२४६
- अहमदनगर मनपा ७८
- धुळे ३२
- धुळे मनपा १०
- जळगाव १९२
- जळगाव मनपा ४१
- नंदूरबार २९
- नाशिक मंडळ एकूण २५६८
- पुणे ग्रामीण १२५९
- पुणे मनपा ५८९
- पिंपरी चिंचवड मनपा ४४२
- सोलापूर ८७२
- सोलापूर मनपा ३७
- सातारा २१७७
- पुणे मंडळ एकूण ५३७६
- कोल्हापूर १६११
- कोल्हापूर मनपा ५०७
- सांगली १०६३
- सांगली मिरज कुपवाड मनपा २०९
- सिंधुदुर्ग ५६२
- रत्नागिरी ६६३
- कोल्हापूर मंडळ एकूण ४६१५
- औरंगाबाद २६८
- औरंगाबाद मनपा ७५
- जालना १९६
- हिंगोली ५६
- परभणी १५९
- परभणी मनपा २३
- औरंगाबाद मंडळ एकूण ७७७
- लातूर १६३
- लातूर मनपा १५
- उस्मानाबाद २७८
- बीड ५२१
- नांदेड ३४
- नांदेड मनपा १२
- लातूर मंडळ एकूण १०२३
- अकोला १५१
- अकोला मनपा १०९
- अमरावती ३८३
- अमरावती मनपा ९८
- यवतमाळ ४३१
- बुलढाणा ५८४
- वाशिम १९७
- अकोला मंडळ एकूण १९५३
- नागपूर १४०
- नागपूर मनपा २४३
- वर्धा २२१
- भंडारा १३८
- गोंदिया ५९
- चंद्रपूर ७०
- चंद्रपूर मनपा २३
- गडचिरोली १२१
- नागपूर एकूण १०१५
- एकूण २० हजार २९५
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३८९ ने वाढली आहे. हे ३८९ मृत्यू, नाशिक-५३, पुणे-५०, ठाणे-४०, भंडारा-३५, अहमदनगर-२४, लातूर-२४, औरंगाबाद-२१, रत्नागिरी-१७, सोलापूर-१५, पालघर-१४, सातारा-१४, रायगड-१२, वर्धा-९, कोल्हापूर-८, नागपूर-८, नंदूरबार-८, बुलढाणा-७, चंद्रपूर-७, गडचिरोली-५, जालना-४, नांदेड-३, परभणी-३, सांगली-३, उस्मानाबाद-२, गोंदिया-१, जळगाव-१ आणि सिंधुदुर्ग-१असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.