मुक्तपीठ टीम
सध्या पर्यावरणविषयक जागरुकता दाखवणं वाढत असलं तरी त्याचवेळी विकासाच्या नावाखाली जंगलं तोडायचा विनाशही आपण अनुभवतो आहोत. यापार्श्वभूमीवर जारी झालेल्या लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट २०२२ने धोक्याची घंटी वाजवली आहे. पृथ्वीसाठी रेड अलर्ट असणारी माहिती या अहवालात आहे. ५० वर्षांपूर्वीच्या तुलनेत पृथ्वीवरील वन्यजीव ६९ टक्के कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या अहवालात मानवी लोकसंख्येचा दबाव, औद्योगिक उपक्रम, जंगलांचा ऱ्हास यामुळे सजीवांचे काय नुकसान होत आहे, याचे मूल्यमापन करण्यात आले आहे. लिव्हिंग प्लॅनेट अहवाल २०२२ मध्ये, ९० शास्त्रज्ञांनी प्रजातींच्या ३२ हजारांहून अधिक प्रजातींचे विश्लेषण केले गेले आहे. गेल्या वेळेपेक्षा ही संख्या ११ हजारांनी अधिक आहे.
पृथ्वी पूर्वीपेक्षा १.२ अंश अधिक गरम झाली आहे. वातावरणातील बदल आणि पृथ्वीच्या तापमानात झालेली वाढ यामुळे वन्यजीवांचेही नुकसान होत आहे. १८व्या शतकातील पूर्व-औद्योगिक क्रांतीच्या तुलनेत सरासरी तापमान ४ अंश सेल्सिअसने वाढले तर ७५% प्रजाती नामशेष होतील, ३ अंश वाढल्यास ५० ते ७५ टक्के, २ अंश वाढल्यास २५ ते ५० टक्के आणि १ अंश वाढल्यास २५ टक्के जीव मरतात.
पक्षी, प्राणी, कीटक…सगळेच भारतात संकटात!
- पृथ्वी पूर्वीपेक्षा १.२ डिग्री सेल्सियस अधिक उष्ण झाली आहे.
- गेल्या २५ वर्षांत ४० टक्के मधमाश्या नामशेष झाल्या आहेत.
- ८४७पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश करण्यात आला.
- ५० टक्के लोकसंख्या कमी झाली आहे.
- भारतातून पक्ष्यांच्या १४६ प्रजाती पूर्णपणे नामशेष होणार आहेत.
- २०३० पर्यंत ४५ ते ६४ टक्के जंगल, हवामान बदल, पाऊस आणि दुष्काळामुळे प्रभावित होतील.
- १९८५ च्या तुलनेत सुंदरबनचे १३७ चौरस किमी क्षेत्र संपले आहे.
- गोड्या पाण्यातील कासवांच्या १७ प्रजाती संपल्या तर उभयचरांच्या १५० प्रजातीही धोक्यात आहेत.
पावसाचा फटका हिमालय आणि जंगलांवर…
- भारताच्या दक्षिणेला असलेल्या जंगलांवर पावसाचा सर्वाधिक विपरीत परिणाम झाला आहे.
- पावसाचा वाईट परिणाम हिमालय आणि त्याच्याशी संबंधित जंगलांवरही दिसून येतो.
- अहवालात नकाशावर हे क्षेत्र लाल आणि अतिनील रंगात चित्रित केले आहे.
- २०२१ मध्ये हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता.
- पृथ्वीवरील ७०% जैवविविधता आणि ५०% गोड्या पाण्याला धोका आहे.
- नैसर्गिक जलस्रोतांमधून ३ पैकी १ मासा इतका पकडला जातो की त्यांची लोकसंख्या पूर्वीच्या पातळीपर्यंत वाढू शकत नाही.
६ मानवी क्रियाकलापांमुळे वन्यजीवांचे मोठे नुकसान
- डब्ल्यूडब्ल्यूएफच्या भारतातील अधिकारी सेजल व्होरा यांनी स्पष्ट केले की, ६ मानवी क्रियाकलापांमुळे वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे.
- यामध्ये शिकार, शेती, जंगलतोड, प्रदूषण, हवामान बदल आणि धोक्यात असलेल्या प्रजातींचा नाजूक वातावरणात समावेश होतो.
- १९८० पासून महासागरातील प्लास्टिकचे प्रमाण १० पट वाढले आहे.
- यामुळे ८६ टक्के समुद्री कासवांसह अनेक जीवांना धोका आहे.
- ९५% पांढऱ्या टीप शार्क नामशेष झाले आहेत.
- किरण आणि इतर शार्क लोकसंख्या ७१ टक्क्यांनी घटली आहे.
- ९०% पाणथळ जमीन पूर्णपणे नष्ट झाली आहे.
- निसर्गाची होणारी हानी थांबवली तर २०५० पर्यंत वन्यप्राण्यांची लोकसंख्या पूर्वीच्या पातळीवर आणता येईल.
- स्थानिक फळे, भाजीपाला, धान्य आणि इतर अन्नपदार्थ वापरून आणि अन्नाची नासाडी न केल्यास आपण वन्यजीवांचे नुकसान ४६ टक्क्यांनी कमी करू शकतो.
डबल्यू डबल्यू एफ इंडियाचे महासचिव आणि सीईओ रवी सिंग यांना स्पष्ट केले की, या द्विवार्षिक अहवालात ८३८ प्रजाती नवीन आहेत. मार्को लॅम्बर्टिनी यांच्या मते, आज पृथ्वी हवामान बदल आणि जैवविविधता नष्ट होण्याच्या ‘दुहेरी आणीबाणी’मधून जात आहे. याचा फटका भावी पिढ्यांना सहन करावा लागणार आहे.