मुक्तपीठ टीम
मार्च महिन्यात एक मैल रुंदीचा विशाल एस्टेरॉइड पुथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. हा एस्टेरॉइड जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या आकारापेक्षा दुप्पट आहे. याचा शोध २० वर्षापूर्वी लागला आहे. त्याचा आकार ३००० फूट इतका सांगितला जात आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या मते ‘एस्टेरॉइड २००१ फो ३२’ चा व्यास ९१५ मीटर आहे. तर २१ मार्चच्या पहाटे ४ वाजता पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.
पृथ्वीला धोका किती?
दरम्यान, हा एस्टेरॉइड पृथ्वीपासून सुमारे २० लाख किलोमीटर अंतरावर असेल. त्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीवर होणार नाही. असे सांगितले जात आहे. २१ मार्च रोजी पुथ्वीच्या बाजूने गेल्यानंतर तो २०५२ पर्यंत पृथ्वीजवळ येणार नाही. परंतु नासाच्या म्हणण्यानुसार, हा एस्टेरॉइड इतर ग्रहांच्या तुलनेत खूप वेगाने पुढे जात आहे. तसेच ताशी १२४००० किलोमीटर वेगाने जाईल.
वैज्ञानिकांनाही फारशी माहिती नाही
खगोलशास्त्रीय शास्त्रज्ञ म्हणतात की, “या एस्टेरॉइडबद्दल सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि, हा एस्टेरॉइड जस जसा पृथ्वी जवळ येईल तसतसा त्याच्या पृष्ठभागावर पडणारा प्रकाशाने त्याबद्दल माहिती मिळू शकेल”.
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, “जेव्हा सूर्याचे किरण एस्टेरॉइड २००१ एफओ ३२ वर पडेल, तेव्हा त्याच्या पृष्ठभागावरील प्रकाश उठून दिसेल. ज्यामुळे या एस्टेरॉइडवरील खनिज स्त्रोतांबद्दल आणि इतर उपस्थित रहस्यांबद्दल माहितीसमोर येऊ शकते”.
आतापर्यंतचा सर्वात मोठा एस्टेरॉइड
नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी पृथ्वीच्या जवळून जाणार्या एस्टेरॉइडपैकी २१ मार्चरोजी पुथ्वीच्या जवळून जाणार हा एस्टेरॉइड सर्वात मोठा असणार आहे.
दुर्बिणीच्या सहाय्याने पाहणे शक्य
- २१ मार्च रोजी जाणाऱ्या एस्टेरॉइडवर प्रकाश पडेल तेव्हा त्याला दुर्बिणी पाहता येऊ शकते. ज्याचे छिद्र ८ इंच असेल. त्याच्या क्रियाकलापांची चाचणी करण्याव्यतिरिक्त, त्याच्या गुप्ततेविषयी माहिती देखील काढली जाईल.
- दरम्यान, यानंरत २०२९ मध्ये, ‘अपोपहिस’ नावाचा एक एस्टेरॉइड पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. ज्याची सर्व शास्त्रज्ञांना प्रतीक्षा असणार आहे.
एस्टेरॉइड म्हणजे काय?
- सूर्याभोवती फिरणार्या छोट्या आकाशीय पिंडांना एस्टेरॉइड म्हणतात.
- ते प्रामुख्याने मंगळ व गुरू दरम्यानच्या एस्टेरॉइडच्या पट्ट्यात आढळतात.
- तसेच पृथ्वीवरुन गेल्याने, त्याचे महत्त्वपूर्ण नुकसान होण्याची शक्यता असते.