मुक्तपीठ टीम
आप्पा म्हणजेच निलेश भगवान सांबरे, पाच वर्षाआधी कोणालाही माहीत नसलेले हे नाव आज ठाणे, पालघर तसेच कोकणात अनेक घरा घरात पोहचताना दिसत आहे. मुळात त्यांनी नावावरून ओळख व्हावी अशी कधी अपेक्षाच केली नाही, नेहमी प्राधान्य दिलं ते प्रामाणिक कार्याला. ते त्यांचं निस्वार्थी काम करत गेले आणि त्यांचं नाव आपोआप लोकप्रिय होतं गेलं.
मुळात सामान्य कुटुंबात राहणारे निलेश सांबरे हे तसे सामान्य कुटुंबातील. लहानपणापासूनच हुशार. शिक्षणाची आवड असलेले. त्यांच्या लहानपणी छोट्याश्या खेड्यात ते शिकले. पुढे कॉलेजसाठी भिवंडीला जात असताना त्यांनी स्वप्न पाहिले की कधीतरी भिवंडीतून मुलं माझ्या गावी शिकण्यास येतील. या स्वप्नासाठी त्यांनी अपार कष्ट केले. स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना यश मिळत गेले. एका शेतकरी पुत्रानं परिश्रमाच्या बळावर प्रामाणिकपणाची कास न सोडता रस्ते बांधकाम व्यवसायात एक अग्रगण्य कंपनी म्हणून जिजाऊचं नाव मोठं केलं.
आज त्यांनी सुरू केलेल्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा व्याप आपल्या कल्पनेपलीकडील आहे. असामान्य गोष्ट सामान्य माणूस विश्वास, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर कशी शक्य करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे निलेश सांबरे उर्फ आप्पा.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतकरी विकास व सामाजिक क्षेत्रात कोकणाच्या ५ जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत आहे. आता ठाणे शहरातही काम सुरु झाले आहे. या भागातील एकही विद्यार्थी आर्थिक कमतरतेमुळे शिक्षणापासुन वंचित राहु नये, एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीच्या कारणामुळे दगावला जाऊ नये हे संस्थेचं उद्दीष्ट म्हणजे अप्पांची आंतरिक तळमळ आहे. कुपोषण आणि आर्थिक मागासलेपणा याबाबत कोकणातील जनतेची नेहमी हेळसांड होते. यापुढील ५ वर्षात कोकणातील ५ ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी तयार करुन कोकणामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या अधिकाऱ्यांकडून आपला विकास घडवण्याचं स्वप्न अप्पा पाहतात, तेव्हा तो जिजाऊचाही मंत्र बनतो. कोकणातील शेतीच्या विकासासाठी पाणी आवश्यक आहे. येथे पाऊस भरपूर, पण पण पाण्याची सोय नाही. त्यामुळे नद्याना बंधारे बांधत बारमाही शेतीची सोय, तसेच दुग्ध व्यवसायास चालना, फळबागांच्या माध्यमातून उत्पन्नाचं एक वेगळं माध्यम तयार करण्याची योजना आहे. त्यामुळे कोकण सुजलाम सुफलाम बनू शकतो. तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडाला कुपोषणाचा शाप आहे. तो दूर सारत कुपोषणमुक्त कोकण घडविण्यासाठी निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु आहेत.
संस्थेचे सर्व उपक्रम मोफत
भगवान महादेव सांबरे हॉस्पीटल, झडपोली पालघर येथे ऑपरेशनची सुविधा असलेले जवळपास १०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल. २४ तास मोफत हॉस्पिटल सुविधा महिला व बालकासाठी विशेष कक्ष, कार्डिॲक रुग्णवाहिकेसहित, एक्स-रे, सोनोग्राफी, डायलीसिस इ. अत्याधुनिक वैद्यकिय सेवा उपलब्ध. आता महिलांच्या प्रसुतीसाठी, तसेच नवजात अर्भकांसाठीही खास कक्ष उघडण्यात आले आहेत.
१०० दिव्यांग मुले दत्तक – ओमकार अंध व मतीमंद मुलांची निवासी शाळा, झडपोली.
पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी झडपोली (विक्रमगड) येथे भावनादेवी भगवान सांबरे सी.बी.एस.ई. स्कुल व विशेष विज्ञान शाखा, महाविद्यालय JEE आणि NEET परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडुन तज्ज्ञ प्राध्यापक वर्गामार्फत करुन घेतली जाते.
१५० MPSC/UPSC विद्यार्थी दत्तक घेण्यात आले आहेत. ओंमकार MPSC/UPSC अकॅडमी, झडपोली तसेच बाहेरही संस्थेच्या मदतीने विद्यार्थी तयारी करत असतात. त्यातील अनेकांची निवड पूर्व परीक्षांमधून पुढच्या टप्प्यात झाली आहे.
ओंमकार MPSC/UPSC अकॅडमीच्या माध्यमातुन १०० हून अधिक विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये दाखल झाले आहेत. UPSC Mains परिक्षेपर्यंत एका विद्यार्थ्यांची झेप. कल्पेश जाधव यांची तहसीलदार, नितीन कांतीलाल हरड यांची नायब तहसीलदार पदी निवड तसेच ललीत चिंतामण मौळे, यांची STI (राज्य कर निरीक्षक अनुसूचित जमातीमधुन राज्यात प्रथम) अधिकारीपदी निवड झालेली आहे. कृष्णा मारुती फडतरे यांची उप शिक्षणाधिकारी पदी निवड तसेच इतर विद्यार्थ्यांची सेल टॅक्स, कृषी सेवक, ठाणे न्यायालय, मंत्रालय, रेल्वे प्रशासन येथील कार्यालयात अधिकारी पदावर निवड झालेली आहे.
संपूर्ण कोकणातील विद्यार्थी मोठ्या अधिकारी पदापर्यंत पोहचावेत यासाठी ४०पेक्षा जास्त वाचनालये सुरु करण्यांत आली आहेत. (पालघर – तलासरी, मोखाडा, जव्हार, डहाणु, बोर्डी, कासा, झडपोली, मनोर, खानिवली, वाडा, कुडुस, उचाट, सोनाळे, ठाणे – भिवंडी, अंबाडी, पडघा, शहापुर, डोळखांब, वासिंद, सरळगाव, मुरबाड, ठाणे आणि अन्य)
रायगड-पेन आणि माणगाव, रत्नागिरी-खंडाळा व रत्नागिरी, सिंधुदुर्ग – सावंतवाडी, येथे ६ वाचनालये सुरु आहेत.
सुमारे २५०० विद्यार्थी या वाचनालयांचा लाभ घेत आहेत.
दरवर्षी किमान १०० मुलांच्या उच्चशिक्षणासाठी (अभियांत्रिकी व वैद्यकिय शिक्षणासाठी) संस्थेकडुन आर्थिक मदत व उत्तम महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रयत्न केले जातात.
महिलांना आजारामध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने १३०० महिलांना कॅन्सर प्रतिबंधक लस देण्यात आली. आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये महिलांचे कॅन्सर तपासणीसाठी ७० शिबीरे घेण्यात आली त्यातुन रुग्ण आढळल्यास तात्काळ टाटा हॉस्पीटलमध्ये पुढील उचार सुरु केले.
अनेक गरीब आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत देण्यात येते. तसेच वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात पालघर व ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकडो आरोग्य शिबिरांमधून गरजूंना आरोग्य तपासणी, उपचार अशी सेवा पुरवण्यात येते. त्यामधून आजवर दोन लाखांपेक्षा जास्त गरजूंना औषधे व १० हजारांपेक्षा जास्त डोळ्यांच्या व तेवढ्याच इतर सर्व रोगांवरील शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच १५ हजार रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले आहे. अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कानाच्या मशीन्स देण्यात आल्या आहेत. आजवर शेकडो कॅन्सरग्रस्त रुग्णांना टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्यात आला आहे.
पालघर व ठाणे जिल्ह्यातील तरुणांना पोलिस व सैनिक भरतीसाठी झडपोली येथे १२ महिने प्रशिक्षण केंद्र सुरु असते. आजवर अनेकांची निवड झाली.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडु तयार करण्यासाठी २ खेळाडु मनाली जाधव आणि गौरी जाधव (कुस्तीपटु) सह्याद्री रेसलिंग स्कूल, पुणे येथे प्रशिक्षण घेत आहेत व २५ खेळाडु कविताजी राऊत फॉउंडेशन, नाशिक येथे तज्ञ प्रशिक्षकांकडे खेळाडुंना नियमित कोचिंग सुविधा उपलब्ध. खेळाडुंचा सर्व खर्च संस्थेकडुन केला जातो. झडपोली येथे संस्थेचे सुसज्ज मैदान व कबड्डीसाठी मॅट विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.
जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील शेकडो कबड्डी, कुस्ती, खो-खो, ॲथलेटिक्स आणि मॅरेथॉन खेळाडुना १२ महिने प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी २ सप्टेंबर रोजी कोकणातील सर्वात मोठी कोकण वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात येते.
पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संस्थेच्या व एस्कॉनच्या संयुक्त माध्यमातुन मोफत सेंद्रीय कृषी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये १ हजार शेतकऱ्यांना दरवर्षी दत्तक घेण्याचा मानस असुन आत्तापर्यंत २ हजार शेतकऱ्यांना दत्तक घेऊन रोपे आणि खत वाटप.
रक्तदान शिबीर व रक्तदान अभियान अंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक संस्थेचा सर्वात मोठा उपक्रम १२ जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामीविवेकानंद जयंतीचे औचित्य साधून सर्व MPSC/UPSC ग्रंथालयामध्ये रक्तदान शिबीरं आयोजीत केली गेली.
कोरोनाच्या कालावधीत १८ ठिकाणी रक्तदान शिबीर घेऊन १ हजार ९८० रक्तपिशव्यांचे संकलन व ५०० हून अधिक रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला.
दिनांक २७ जानेवारी २०१९ रोजी ३५ हजार महिलांच्या उपस्थितीत क्रांतीकारी महिलांच्या जयंतीचे औचित्य साधुन कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला.
ठाणे व पालघर जिल्ह्यात स्वयंसेवकांच्या माध्यमातुन संस्कार शिबिरांचे आयोजन करुन संस्कारक्षम सुजन विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न.
निसर्ग संवर्धन व शेतकरी सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी २०१९ मध्ये १ लाख उत्तम दर्जाच्या फळझाडांचे वाटप करण्यात आले. २०२० मध्ये १.५ लाख उत्तम दर्जाच्या फळझाडांचे वाटप…
संपूर्ण कोकणामध्ये ८ रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी लोकार्पण करण्यात आल्या.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये ५ इंग्लिश मिडीयम शाळांची सुरुवात – बाम्हणपाडा (मोखाडा), खोडाला (मोखाडा), चालतवड (जव्हार), झाप (जव्हार), उज्जैनी (वाडा).
सांगली आणि कोल्हापुर येथील पुरग्रस्तांना २ लाख वह्या वाटप, २० हजार ब्लॅकेट वाटप, २रुग्णवाहिका वैद्यकीय टीमसह ५६८० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ४० स्वयंसेवकांच २० दिवस पुरग्रस्त भागात मदतकार्य.
वाडा येथे जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची सुरुवात. शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
११ दिव्यांग मुलींना UPSC परिक्षेच्या तयारीकरिता दिपस्तंभ अकॅडमी जळगाव येथे ११ लाख रुपये प्रतिवर्षी खर्च जिजाऊ संस्था करत आहे.
महिला सक्षमीकरण विभागांतर्गत आशा गृहोद्योगाच्या माध्यमातून लाखो महिलांना भेट देऊन हजारो महिलांना प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण विभागाअंतर्गत १५० पीठगिरणी, ५५० शिलाई मशीन्स, ६ प्रत्रावली मशिन, कॅटरिग सेट, १७० हातगाड्या, उसाचे चरखे, गारमेन्ट फॅक्टरी, नोटबुक फॅक्टरी इत्यादीच्या माध्यमातुन हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
दरवर्षी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागरी, सिधुदुर्ग येथील सर्व शाळांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम २०१९-२० या शैक्षणीक वर्षात १२ लाख वह्यांचे वाटप.
ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईपासुन मुक्ततेसाठी २०० बोअरवेल जिजाऊ संस्थेकडुन मारण्यात आल्या आहेत. ३० जानेवारी २०२० रोजी शहापूर जिजाऊ नगरीत २०० बेडच्या कॅन्सर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि भव्य विद्या संकुलाच भूमिपूजन, लवकरच ही वास्तू तयार होऊन जनसेवेसाठी उपलब्ध होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील १ लाख कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप.
पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर झडपोलीसह 18 ठिकाणी पोलीस भरतीपूर्व व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू….
आज आप्पा पालघर या बहुल आदिवासी जिल्ह्यात अशा लोकांसाठी काम करतात ज्यांचा बाहेरच्या जगाशी महिनोन्महिने संबंध नसतो . जव्हार , मोखाडा सारख्या दुर्गम भागामध्ये आज निलेश भगवान सांबरे हे पोहचलेले आहेत . फक्तच पोहचले नाहीत तर त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी घेतली घेतली आहे.
कोणीही कितीही अडचणीत असो व कुठेही असो नेहमी मदतीसाठी तत्पर. शासनयंत्रणा पोहचण्याच्या आधीच आप्पांची यंत्रणा मदत करून मोकळी झालेली असते. हे या माणसाचे कर्तृत्व आहे.
कोरोना सारख्या महामारीतही रुग्णाची तपासणी पासून येण्याजाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे पर्यंत तसेच किट वाटप पासून धैर्याने या लोकांसाठी आप्पांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊच्या टीमने अविरत कार्य केले.
निलेश भगवान सांबरे उर्फ अप्पा…सतत…अथक…अविरत कार्यरत!
- संस्थापक अध्यक्ष- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
- अध्यक्ष- आदिवासी विकास मंडळ, मुंबई
- माजी उपाध्यक्ष- जिल्हा परिषद, पालघर
- उपाध्यक्ष- आत्मा मलिक ध्यान व क्रीडा संकुल, अंभई
- उपाध्यक्ष- आत्मा मलिक इंजिनिअरिंग कॉलेज व ध्यान क्रीडा संकुल, अघई