मुक्तपीठ टीम
सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेची खात्री देण्यासाठी त्यांच्यावर हॉलमार्क असणे हे सरकारने बंधनकारक केले आहे. परंतु त्यासाठी आवश्यक तेवढी सुविधा उभारली गेली नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांचे काम खोळंबू लागले आहे, त्यामुळे देशभरातील व्यापारांनी हॉलमार्किंग प्रक्रियेच्या विरोधात आंदोलन केले आहे. महाराष्ट्रभरातील व्यापाऱ्यांप्रमाणेच सुवर्णनगरी जळगावातील व्यापारीही या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनीही दुकाने बंद ठेवली होती.
सोने शुद्धतेच्या खात्रीसाठी हॉलमार्कचा निर्णय
• सोने खरेदीमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्क अनिवार्य केले आहे.
• हा नियम १६ जून २०२१ पासून लागू करण्यात आला आहे.
• जेव्हा सरकारने हॉलमार्क अनिवार्य केले, तेव्हा व्यापारांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
• व्यापाऱ्यांनी मागणी केली की त्यांना हॉलमार्कशिवाय दागिने विकण्यासाठी वेळ द्यावा.
व्यापाऱ्यांचा विरोध कशासाठी?
• सोन्याच्या किरकोळ विक्रेत्यांना हॉलमार्किंग युनिक आयडी (HUID) घेणे अनिवार्य केल्यावर हॉलमार्किंग प्रक्रियेला विरोध सुरू झाला.
• प्रत्येक HUID हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या उत्पादनासाठी सहा अंकी कोड आहे.
• दागिन्यांचा हा एकमेव ओळख क्रमांक आहे ज्याला विरोध केला जात आहे.
• व्यापारंचे म्हणणे आहे की, व्यापाऱ्यांसाठी दागिन्यांच्या प्रत्येक भागावर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर लावणे खूप अवघड आहे.
• सध्या देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्क सेंटर आहेत.
• तर यूआयडीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १० हॉलमार्क सेंटर आवश्यक आहेत.
• जेवढी सुविधा नसल्याने काम खोळंबण्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे.
• त्याचवेळी ते ग्राहक आणि विक्रेता दोघांच्याही गोपनीयतेचे उल्लंघन करते.
• त्यामुळे सरकारने हा नियम मागे घ्यावा.
१ जुलैपासून दागिन्यांवर यूआयडी अनिवार्य
• नवीन नियमानुसार आता १ जुलैपासून प्रत्येक दागिन्यांची युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडी) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
• यामध्ये, ज्वेलर्सचा कोड आणि दागिन्यांच्या ओळखीचा तपशील प्रविष्ट केला जाईल, जेणेकरून दागिने केव्हा आणि कोठून खरेदी केले गेले हे कळेल.
• यासह, दागिने ओळखले जाऊ शकतील आणि दागिने कोणी आणि कोठून खरेदी केले हे देखील समजेल.