Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तरुण पदवीधरांसाठी परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिपची संधी

March 26, 2021
in featured, करिअर
0
moea

मुक्तपीठ टीम

परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्याकरिता इंटर्नशिप धोरण जाहीर केले आहे. अलिकडेच ऑगस्ट 2016 मध्ये मंत्रालयाच्या इंटर्नशिप धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रित करणे, इंटर्संना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांमध्ये पात्रता आणि या उमेदवारांमध्ये विविधता वाढवणे, लैंगिक समावेशकता निर्धारित करणे, हा आहे.

 

विविध मोहीमा व अभियानात इंटर्नशिप करणारे तथा विदेशात कार्य करणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या नीती धोरणांमध्ये हा आढावा घेताना कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी घेतलेले आणि 31 डिसेंबर रोजी 25 वर्षापेक्षा कमी वय असणारे भारतीय नागरिकांसाठी एम ई ए मुख्यालयात इंटर्नशिप खुली असेल.

 

कमाल मर्यादा आणि कालावधी
प्रत्येक वर्षी इंटर्नशिपची संधी सहा महिन्याच्या दोन सत्रांमध्ये दिली जाईल. जानेवरी ते जून आणि जुलै ते डिसेंबर असे हे सत्र असतील. प्रत्येक सत्रामध्ये या मंत्रालयामार्फत कमाल 3 जाईल. प्रत्येक आंतरवासितांसाठी सदर कार्यक्रम तीन महिन्यांचा असेल.

 

विविधता
देशातील सर्व भागातल्या लोकांपर्यंत मंत्रालय आणि विदेश धोरण घेऊन जाण्याच्या उद्देशाने या इंटरर्नशिपमध्ये जास्तीत जास्त विविधता असावी यासाठी लक्ष दिले जाईल. यामध्ये मुख्यतः लिंग, वंचित घटक, भौगोलिक आधीवास आणि नागरी तथा ग्रामीण अशा दोन्ही भागाच्या प्रतिनिधित्वावर भर दिला जाईल. आकांक्षी जिल्हा सुधार कार्यक्रम (टी ए डी पी) जिल्हा अंतर्गत युवकांना या निवड प्रक्रियेत प्राधान्यक्रम दिला जाईल.

 

निवड
सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन www.internship.mea.gov.in या संकेत स्थळावर असेल आणि आवेदन, छाननी, निवड, विभागांचे वितरण, सूचना, विस्तार, प्रमाणीकरण हे सर्व मंत्रालयाच्या इंटर्नशिप पोर्टलवर पाहण्यास मिळेल. प्रत्येक उमेदवाराला या पोर्टल वर नोंदणी करावी लागेल आणि सदर निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवेश प्रमाणीकरण करावे लागेल.
सदर निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात होईल. प्राथमिक छाटणी आणि व्यक्तिगत मुलाखती. या प्रक्रियेमध्ये “कोटा कम वेटएज” प्रणालीचा उपयोग होईल. ज्यामध्ये 14 राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील अर्जदारांना खालील तक्त्याप्रमाणे प्रत्येक सत्रात विचार केला जाईल.

 

सत्र राज्य केंद्र शासित प्रदेश
पहिले सत्र (जानेवारी ते जून) आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्र अंदमान आणि निकोबार द्वीप, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली तथा दमण आणि दीव, दिल्ली

 

दुसरे सत्र
(जुलाई ते डिसेंबर) मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिलनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल जम्मू आणि काश्मीर, लक्षदिप पुडुचेरी

 

वरील कोष्टकानुसार प्रत्येक सत्रामध्ये सदर १४ राज्यांतून प्रत्येकी दोन इंटर्न असतील. त्याचप्रमाणे चार केंद्रशासित प्रदेशांतून दोन जण घेतले जातील. तीस टक्के ते पन्नास टक्के महिला उमेदवार असतील. शैक्षणिक कामगिरीवर प्राधान्यक्रम ठरविला जाईल आणि यासाठी प्लस टू (+२) आणि पदवी परीक्षेत मिळविलेल्या टक्केवारीचा व गुणांचा विचार केला जाईल.
उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन भरावे लागतील. त्यानंतर राज्यनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. सदरची यादी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेग- वेगळी असेल. यावेळी प्लस टू आणि पदवी परीक्षांमधील शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर उमेदवारांना निवडले जाईल. टी ए डी पी जिल्ह्यातील अर्जदारांना प्राधान्यक्रम दिला जाईल. मुलाखतीसाठी बोलविले जाणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या अंतर्वासीतेसाठी घेतल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या तुलनेत तीन पटीने जास्त असेल.
गुणवत्ता यादी अनुसार निवडलेल्या उमेदवारांना दूर दृश्य संवाद प्रणाली अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने व्यक्तिगत मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या निवड प्रक्रियेतून कमाल 30 उमेदवारांची निवड करून त्यांना इंटर्नशिप देऊ केली जाईल. जर निवडलेल्या उमेदवारांना मधून कोणी इंटर्न साठी तयार नसेल तर गुणवत्ता यादीतील त्यांच्यानंतरच्या उमेदवारांना सदर इंटर्नशिप देऊ केली जाईल.

 

मानधन आणि हवाई तिकीट
प्रत्येक इंटर्नला दर महिन्याला येण्याजाण्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल. ही रक्कम हे ‘इकॉनोमिक क्लास’ साठी असेल आणि ती उमेदवार राहात असलेल्या राज्याच्या राजधानीपासून दिल्ली पर्यंत असेल किंवा त्याचे आधिवास राज्य किंवा तो ज्या महाविद्यालय किंवा विद्यापिठात शिकतो आहे तेथून दिल्लीपर्यंत असेल. दिल्लीमध्ये इंटर्नशिप कालावधीत राहण्याच्या तसेच जेवणाचा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.

इंटर्न्ससाठी जबाबदारी
या इंटर्नशिप कार्यक्रमा अंतर्गत भारत सरकारच्या विदेशी धोरणं ठरवणे तसेच त्यांची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेसंबंधी परिचय देण्यात येईल. सर्व आंतर्वासिताला विशेष विषय देऊन विभाग प्रमुख त्यावर काम करण्यासाठी मार्गदर्शन करतील. आंतरवासितांना संशोधन करावे लागेल, अहवाल लेखन, विकास संबंधी विश्लेषण, किंवा विभागप्रमुखांनी दिलेल्या इतर काम करावे लागेतील.
इंटर्नशिप कालावधी संपतांना प्रत्येक प्रशिक्षणार्थीला केलेल्या कार्याबद्दल सविस्तर अहवाल द्यावा लागेल आणि आवश्यक असल्यास सादरीकरण ही करावे लागेल. या इंटर्नशिप काळात जो काही अभय-संशोधन केला जाईल, तो विदेश मंत्रालयाची बौद्धिक संपत्ती म्हणून गणली जाईल आणि आंतरवासितांना मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याचा उपयोग करता येणार नाही. इंटर्नना विदेश मंत्रालयाशी संबंधित कोणत्याही माहितीबद्दल गोपनीयता पाळावी लागेल,

 

इंटर्नशिपसाठी कडक धोरण
विदेश मंत्रालयाच्या इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निवड ही पूर्णपणे आवश्यक सुरक्षा नियमांच्या समाधानपूर्वक पालन करण्यावर आधारित असेल. मंत्रालय द्वारा कोणत्याही क्षणी कोणतेही कारण न देता इंटर्नशिप रद्द केली जाऊ शकते. याबद्दल मंत्रालयाने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. एखाद्या इंटर्नला सदर कार्यक्रम सोडून जायचे असल्यास एक आठवडा आगोदर मंत्रालयाला सूचित करावे लागेल.


Tags: internshipministry of external affairsmuktpeethyouth
Previous Post

“अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही” – चंद्रकांत पाटील

Next Post

महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Next Post
Cm uddhav thackeray 26-3-21

महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!