Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष : सरकार आणि भारतीय दुतावासांचे भरड धान्यांच्या प्रचारासाठी उपक्रम

January 3, 2023
in featured, चांगल्या बातम्या
0
Pulses

मुक्तपीठ टीम

  • मोठ्या प्रमाणावर भरड धान्य लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM)च्या माध्यमातून ते संपूर्ण जगासमोर आणण्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग(DA&FW) चे उद्दिष्ट आहे.
  • केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि भारतीय दूतावास आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या प्रचारासाठी आणि भरड धान्यांच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी वर्ष २०२३ मध्ये संपूर्ण एक महिना  लक्ष केंद्रित करणार
  • भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय आणि छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान राज्यांसाठी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षासाठी (IYM) विविध कार्यक्रम/उपक्रम आयोजित करण्यासाठी जानेवारी २०२३ हा केंद्रित उपक्रमांचा  महिना म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) २०२३ चा प्रस्ताव मांडण्यात आला होता जो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत असताना भारत सरकारला आघाडीवर ठेवण्यासाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरली आहे. भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी देखील भारत हे भरड धान्याचे जागतिक केंद्र असल्याचे दर्शवत, आय वायएम (IYM) २०२३ ला ‘लोक चळवळ’ बनवण्याचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे.

सिंधू संस्कृतीच्या काळात भरड धान्ये ही पिके अन्न म्हणून वापरात आलेली पहिले पीके होती हे अनेक पुराव्यांसह स्पष्ट झाले आहे. सध्या १३० हून अधिक देशांमध्ये भरड धान्ये पिकवली जात असल्याने आशिया आणि आफ्रिकेतील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांसाठी बाजरी हे पारंपरिक अन्न मानले जाते. भारतात, भरड धान्ये ही प्रामुख्याने खरीप पीके आहेत, ज्यांना इतर तत्सम मुख्य पिकां पेक्षा कमी पाणी आणि कृषी निविष्ठांची आवश्यकता असते. भरड धान्ये ही जगभर उपजीविका निर्माण करण्याच्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि अन्न आणि पौष्टिक मूल्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या त्याच्या प्रचंड क्षमतेमुळे महत्त्वाची आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या(UN) अनेक शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDGs) अनुसरून असलेल्या भरड धान्यांच्या प्रचंड क्षमतेला विचारात घेऊन, भारत सरकारने (GoI) भरड धान्यांना प्राधान्य दिले आहे. एप्रिल २०१८ मध्ये, भरड धान्यांचे “न्यूट्री सीरिअल्स” म्हणून पुनर्नामकरण करण्यात आले, त्यानंतर २०१८ हे वर्ष भरड धान्ये राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले, ज्याचा उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन आणि मागणी निर्माण करणे आहे. वर्ष २०२१-२०२६ दरम्यानच्या अंदाज कालावधीत जागतिक भरड धान्य बाजाराचा कंपाउंड     ऍन्युअल ग्रोथ रेट CAGR 4.5% राहण्याचा अंदाज आहे.

६ डिसेंबर २०२२ रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) इटली रोम,येथे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष – २०२३ साठी उद्घाटन समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाला भारतातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.  याच श्रृंखलेत पुढे, ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष (IYM) २०२३’ या वर्षभराच्या उत्सवापूर्वी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने संसद भवनात संसद सदस्यांसाठी खास ‘भरड धान्य भोजन’ आयोजित केले होते.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) २०२३ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि भारतीय भरड धान्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सक्रिय बहु-स्टेकहोल्डर प्रतिबद्धता( सर्व समावेशी) (सर्व केंद्र सरकारची मंत्रालये, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, शेतकरी, स्टार्ट-अप्स, निर्यातदार, किरकोळ व्यवसाय, हॉटेल्स, भारतीय दूतावास इत्यादींना समाविष्ट करण्याचे) धोरण हाती घेतले आहे. मंत्रालये, राज्ये आणि भारतीय दूतावासांनी आयवायएम (IYM)च्या प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी आणि भरड धान्यांच्या ग्राहक, शेतकरी आणि हवामानाविषयक फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी वर्ष २०२३ मध्ये ठराविक महिन्यांची निश्चिती करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रालयांमध्ये,वर्ष २०२३ च्या जानेवारी महिन्यासाठी आयवायएम(IYM) शी संबंधित उपक्रम  भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाकडून सुरू केले जातील. मंत्रालयाने जानेवारीमध्ये १५ दिवसांच्या कालावधीत १५ उपक्रमांची योजना आखली आहे ज्यात व्हिडीओ संदेशांद्वारे  खेळाडू, पोषणतज्ञ आणि फिटनेस तज्ञांना सहभागी करून घेणे, आघाडीच्या पोषणतज्ञ, आहारतज्ञ आणि  नामांकित खेळाडूसह  भरड धान्ये विषयक  वेबिनार आयोजित करणे, फिट इंडिया अॅपद्वारे जाहिरात करणे इत्यादींचा समावेश आहे. इतर मंत्रालये ज्यांनी जानेवारीमध्ये कार्यक्रमांचे नियोजन केले आहे ते म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय जे आंध्र प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये मिलेट फेअर-कम-प्रदर्शनाचे आयोजन करणार आहेत; एफएसएस एआय (FSSAI) पंजाब, केरळ आणि तामिळनाडू इत्यादी ठिकाणी ‘इट राइट मेले’ आयोजित करेल.

राज्यांच्या संदर्भात, छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान या राज्यांना आयवायएम (IYM) संदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी विशिष्ट उपक्रम राबवण्यासाठी जानेवारी महिना निश्चित करण्यात आला आहे. ही राज्ये महोत्सव/मेळे आणि खाद्य महोत्सव, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, जागृती मोहीम, कार्यशाळा/ परिसंवाद, होर्डिंग्ज लावणे आणि राज्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी प्रचार साहित्याचे वितरण इत्यादींसह भरड धान्य केंद्रित उपक्रम राबवणार आहेत. जानेवारी महिन्यात तत्सम उपक्रम राबविणाऱ्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पंजाबचा यांचा समावेश होतो.

जानेवारी २०२३ दरम्यान, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) आणि कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग(DA&FW) बेल्जियममधील ट्रेड शोमध्ये सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग,अपेडा (APEDA), स्टार्ट-अप, निर्यातदार आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) च्या प्रतिनिधींसह एक बहु-भागधारक शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. हे शिष्टमंडळ आरटीई (RTE) आणि आरटीसी (RTC) बाजरी-आधारित उत्पादने, बी2बी (B2B), बी2जी (B2G) परस्परसंवाद इत्यादीद्वारे भारतीय भरड धान्यांची विविधता याविषयी अधिकची माहिती प्रदर्शित करेल.

१४० हून अधिक देशांमधील भारतीय दूतावास २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष(IYM) च्या उत्सवात सहभागी होतील आणि आयवायएम ( IYM) वर भारतीय प्रतिनिधींना सहभागी करून प्रदर्शन, चर्चासत्रे, चर्चा, पॅनेल चर्चा इत्यादीद्वारे इतर कार्यक्रम आयोजित करतील. जानेवारीमध्ये, अझरबैजानमधील भारतीय दूतावास आणि बेलारूसमधील भारतीय दूतावास स्थानिक चेंबर्स, फूड ब्लॉगर्स, खाद्यपदार्थांचे आयातदार आणि स्थानिक रेस्टॉरंट्स इत्यादींच्या सहभागाने बी2बी (B2B) बैठकासारखे उपक्रम राबवणार आहे. भारतीय प्रतिनिधी आणि मिलेट्स डिश यांच्या मदतीने शिजवलेले मिलेट्स डिश प्रदर्शन/स्पर्धा आयोजित केल्या जातील. आणि प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून त्याचे वाटप केले जाईल. अबुजा येथील भारतीय उच्चायुक्तालय आणि लागोसमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (IYM) च्या जागृतीचा एक भाग म्हणून, जानेवारी २०२३ मध्ये मिलेट्स फूड फेस्टिव्हल आणि मिलेट्स फूड तयार करण्याच्या स्पर्धेची योजना आखली आहे. हा मिलेट्स फूड फेस्टिव्हल उच्चायुक्तांच्या आवारात आयोजित केला जाईल. आणि तो या पदार्थांच्या तयारीसाठी नायजेरियन मान्यवर आणि भारतीय समुदायासह निमंत्रितांना स्टॉल प्रदान करेल.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष – २०२३ च्या भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘मिरॅकल मिलेट्स’चे विसरलेले वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी,या कार्यात,एक सहयोगी दृष्टीकोनातून,कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग( DA&FW) आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मीडिया, भारतीय प्रतिनिधी, स्टार्ट-अप समुदाय, नागरी समाज आणि मिलेट्स व्हॅल्यू-चेनमधील इतर सर्वांना पुढे येण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी आवाहन करते आहे.

भरड धान्ये हा देखील जी २० बैठकीचा अविभाज्य भाग आहे आणि यात सहभागी प्रतिनिधींना भरड धान्यांच्या पदार्थांची चव चाखायला देऊन, शेतकऱ्यांच्या भेटीघाटी घडवून आणि स्टार्ट-अप आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) सोबत संवादी सत्रांद्वारे खऱ्या अर्थाने भरड धान्याचा अनुभव दिला जाईल.

आंतरराष्‍ट्रीय भरड धान्ये वर्ष २०२३ साजरे करताना सरकारच्‍या संपूर्ण कार्यपद्धतीचा प्रत्यय खर्‍या अर्थाने येत आहे.


Tags: coarse grainDA&FWgood newsGood news MorningInternational Year of Coarse Grainsआंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगभरड धान्यमिरॅकल मिलेट्स
Previous Post

भाज्यांमध्ये रासायनिक प्रदूषण किती? विद्यार्थ्यानं तयार केलेलं साधन ओळखणार…

Next Post

परवडणाऱ्या दरातील जनऔषधींची ९ हजारांवर दुकाने, वर्षभरात १० हजारांवर नेणार!

Next Post
PMBJP

परवडणाऱ्या दरातील जनऔषधींची ९ हजारांवर दुकाने, वर्षभरात १० हजारांवर नेणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!